Wednesday, 30 December 2015

नांदेड महानगर पालिकेचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, आपचे नेते फारुख भाई यांचे एक प्रसिद्धी पत्रक What's Up वर व्हायरल



                दिवाळखोर मनपाचा 'उधळपट्टी' कारभार...
अशोक-शाही म्हणजे, अंधेर नगरी... चौपट राज... 
#JNNURM अंतर्गत काय विकास झाला?: JNNURM चे हजारो कोटी रुपये खर्चूनही नांदेड शहरात आज एक ही प्रभागात धड ड्रेनेजची सुविधा कार्यान्वयित नाहीं, नाल्या आणि रस्त्याची दुर्दशा तर आहेच पण पिण्याच्या पाण्याची सुद्धा मारामारी आहे... डास व घाणीचे चोहीकडे साम्राज्य पसरलंय... डास पळवण्यासाठी प्रत्येक घरात वर्षाला हजारो रुपये खर्च करावे लागतात.. घाणी मुळे पसरलेल्या रोग-राई मुळे खाजगी दवाखाने पोसले जात आहेत... या व अश्या कितीतरी समस्यामुळे सामान्य जनतेला मरण यातना सहन कराव्या लागतात... 

#Bankrupt_NWCMC : कोणीही व कोणतीही समस्या घेऊन गेलेत तर आयुक्तांचे एकच उत्तर: मनपा कडे पैसा नाहीं... एल बी टी बंद झाले म्हणून निधी नाहीं... जे.एन.एन.यु.आर.एम. अंतर्गत सगळ्या शहराच्या ड्रेनेज, नाल्या रस्त्यासाठी पैसा आला आणि काम पूर्ण झाले असा अहवाल पाठवला असताना अर्ध्या नांदेड शहरात ड्रेनेजचे काम पूर्ण होऊन जोडणी झालीच नाहीं हे वास्तव आहे... मग तो पैसा गेला कुठे...? ड्रेनेज आणि नाल्या व रस्त्याच्या कामासाठीच गेल्या सप्टेंबर पासून आम्हाला वारंवार हेच उत्तर ऐकायला मिळतय... मनपा कडे पैसा नाहीं...

#उधळपट्टी_कारभार : जन-सामान्याकडून गेल्या दहा वर्षात घर पट्टी आणि पाणी पट्टीच्या आड आठ ते दहा पटीने कर (टैक्स) वाढवून वसूल करण्यात येतो... यंदा ही घरगुती पाणीपट्टी दीड हजार वरून दोन हजार करण्यात आली आहे. विविध योजनात कोटींच्या कोटी रुपये येतच राहतात... तरी आयुक्त सांगतात की निधी नाहीं... जर खरच निधी नाहीं तर... आयुक्ताच्या उघड 'उधळपट्टी' वर अशोक-शाहीतली सत्ता-सूत्र याची दखल घेणार आहेत की नाहीं? 

#दीड_लाखाचे मोबाइल : एकीकडे पैसा नाहीं ची बोंब करणाऱ्या आयुक्तांनी नुकतेच दीड लाखाचे मोबाइल घेतल्याची माहिती पुराव्यानिशी हाती लागली आहे... एप्पल कंपनीचे दोन मोबाइल ज्यांची किंमत एक लाख तीस हजार च्या वर आहे.. जुने दोन स्मार्ट फोन उपलब्ध असताना, जनतेच्या तिजोरीची दिवाळखोरी निघाली असताना... काटकसरीने राहायचे सोडून... दीड लाखाचे मोबाइल घेण्यात कोणती नैतिकता आहे?? 

#आयुक्ताला लागतो लाखोचा संडास: मनपाच्या इमारतीला तीन-चार वर्ष ही झाले नाहीं... या इमारतीच्या गुत्तेदाराला मेंटनन्सचा ठेका दिला असून ही... आयुक्ताच्या चेम्बर मधल्या संडासवर तीन लाखाची दुरुस्ती दाखवून जनतेच्या पैशांची उधळपट्टी करण्यात आली आहे... 
सामान्य नागरिकांना नवीन संडास बांधण्यासाठी केवळ सतरा हजार देणाऱ्या शासनातील एका सेवकाच्या संडासला तीन लाखाची दुरुस्ती करावी लागते?? व्हा... 

#_3_A /C च्या झोपडीत राहणारा गरीब आयुक्त: आपला सरकारी बंगला रिकामा नसल्याने चिडून बी.एस.यु.पी.च्या झोपडीत राहणारा आयुक्त हा किती 'साधी राहणी.. उच्च विचार' श्रेणी चा गांधीवादी असल्याचा भ्रम सर्व जनतेला झाला होता... परंतु त्या बिएस्युपिच्या झोपडीत तीन-तीन एसी, सोफे, अल्मा-या, टेबल, खुर्च्या, डबल बेड लावून... अव्वल दर्ज्याची रंगरंगोटी करून तब्बल दहालाखाच्या वर खर्च करून फक्त आठ-दहा दिवस त्या झोपडीत राहिलेल्या आयुक्ताने लाखोंचे पूर्ण सामान ही 'रेकोर्ड रूम' ला परत केले नसल्याची माहिती हाती आली आहे...

#मनपा कडे पैसा नाहीची बोंब कुणालाही लपली नाही.. तरी पदाधिकारी आणि नगरसेवकांचा एक 30 - 35 जणांचा समूह म्हणे गव्हर्नन्स अभ्यास दौऱ्या वर जयपूर ला गेला होता. आणि आठ दिवसाच्या या दौर्यात भक्कम वेळ सहलीत खर्च करणाऱ्या 'महाभागांना' विमान यात्रेचे शौक पूर्ण करण्यासाठी जोधपुर ते हैद्राबाद पर्यंत विमान टिकट देण्यात आले आणि या टूर वर तब्बल बारा लाख रुपये खर्च करणायत आले... कुठून आला निधी? 

अंगात श्रीमंतीचा माज चढल्याचे दाखवल्या प्रमाणे उधळपट्टीत वाया केलेला हा पैसा कुण्या पक्षाच्या अथवा अधिकार्याच्या 'बापाची' जहागीर नव्हे... तुमच्या आमच्या कष्टाने कमावलेल्या पैश्यातून दिलेल्या कराचा पैसा आहे... या उधळपट्टीचा लेखा-जोखा महापौर आणि आयुक्ताने दिलाच पाहिजे... 

गुत्तेदारी करणाऱ्या 70 % नगरसेवकांना तर हे विचारण्याचे धाडस होणार नाही परंतु 'काही' प्रामाणिक नगरसेवकांनी तरी किमान तोंड उघडावे ही अपेक्षा आहे. नाहीं तर गल्ली बोळात जाउन जनतेची जागृती करून... जनतेच्या माध्यमातूनच 'मस्त्वालांची' मस्ती आणि उधळपट्टी करणार्यांचे डोके ठिकाणावर आण्याचे काम करावेच लागेल... #आदर्श_अशोकरावचा_आदर्श_आयुक्त

No comments: