Monday, 21 December 2015

नमस्कार लाईव्ह २१-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २१-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- दाऊदच्या बर्थ डे पार्टीवर रॉ, आयबीची नजर 
                    भारताचा मोस्ट वॉंटेड क्रिमिनल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम येत्या २६ डिसेंबरला वयाच्या ६० व्या वर्षात पदार्पण करत आहे. दाऊदच्या ६० व्या बर्थडेसाठी त्याचे विश्वासू छोटा शकील आणि भाऊ अनिस इब्राहिम यांनी जंगी पार्टीचा बेत आखल्याची माहिती आहे. पार्टीचे ठिकाण अद्याप कळले नसले तरी, सध्या आयएसआयच्या छत्रछायेखआली असलेल्या दाऊदचा बर्थ डे पाकिस्तानातच एखाद्या ठिकाणी साजरा होईल असे समजते. दाऊदच्या बर्थडेसाठी ६०० लोकांना निमंत्रित करण्यात आल्याची माहिती असून, भारतातच नव्हे तर, पाकिस्तान, दुबईत कोणकोण निमंत्रित आहेत त्यावर भारतीय गुप्तचरयंत्रणा बारकाईने नजर ठेऊन आहेत.

२- काबूलमध्ये तालिबानचा आत्मघाती बॉम्ब हल्ला, नाटोचे तीन जवान ठार 

३- पॅरिस दहशतवादी हल्ल्याप्रकरणी बेल्जीयम पोलिसांनी पाच संशयितांना घेतले ताब्यात  

४- मध्य इंडोनेशियात लाटांच्या तडाख्यात सापडून प्रवासी बोट बुडाली, ८० बेपत्ता, तिघांचा मृत्यू

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
5- आसाम विधानसभा सभापती प्रणव गोगाई यांनी कॉंग्रेसमधून बंडखोरी करुन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नऊ आमदारांना अपात्र ठरविले 

6- आम्ही ११४ कोटींमध्ये स्टेडियम बांधले, तुम्ही नूतनीकरणावर ९०० कोटी खर्च केले - जेटली 
                     आम्ही सत्तेत असताना ११४ कोटी रुपयांमध्ये ४२ हजार आसनक्षमतेचे स्टेडियम उभारले, तर काँग्रेसच्या काळात स्टेडियमच्या नूतनीकरणावर ९०० कोटी रुपये खर्च झाले असे सुनावत केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांना प्रतुत्यर दिले आहे. दिल्ली डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनमध्ये (DDCA) जेटलींच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत हिवाळी अधिवेशनाचे कामकाज बंद पाडण्यात आले. यावेळी विरोधकांचा समाचार जेटलींनी घेतला.

7- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बुटेल ट्रेनच्या योजनेला राज्य सरकारचा अडथळा, बीकेसीची जागा देण्यास राज्य सरकारचा नकार 


8- हातात बंदूक घेऊन काँग्रेस आमदाराचा ‘ओ मेरी मेहबूबा’वर धर्मेंद्र स्टाईल डान्स 

9- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील १६ लाख पोलीस कर्मचा-यांचे मागितले मोबाईल नंबर 

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
10- पवारांमुळेच भारताला धोनीसारखा कर्णधार मिळाला : फडणवीस 

                   पक्षमर्यादा न ठेवता सर्वपक्षीयांशी चांगले संबंध ठेवणारा नेता म्हणजे शरद पवार होय. पवारांनी यशवंतराव चव्हाणांचा वारसा जोपासला आहे. सर्वच क्षेत्रात पवारांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. इतकंच नाही तर पवारांमुळेच टीम इंडियाला धोनीसारखा गुणी कर्णधार मिळाला, अशी स्तुतीसुमनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उधळली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 75 व्या वाढदिवसाचं औचित्य साधून, विधानसभेत आज अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात आला. त्यावेळी पवारांचं कौतुक करताना मुख्यमंत्र्यांना अक्षरश: शब्द अपुरे मुख्यमंत्री म्हणाले,” पवार साहेंबाना 50 वर्ष झाली तेव्हा याच सभागृहाने अभिनंदन प्रस्ताव मंजूर केला होता. यशवंतराव चव्हाणांनंतर पवार एकमेव नेते ज्यांचा अभिनंदनपर ठराव होतोय. या देशातला पहिला मराठी पंतप्रधान पवारांच्या रुपात मिळेल, असं म्हटलं जायचं. पवार हे सर्व पक्षीयांशी उत्तम संबंध ठेवणारे नेते आहेत”.

11- गोपीनाथ मुंडेंवरील 'संघर्षयात्रा' चित्रपटाला पंकजांचा विरोध 

                भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जीवनावर आधारित ‘संघर्षयात्रा’ चित्रपटाला मुंडेंची कन्या, महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी विरोध केला आहे. मुंडे कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय चित्रपटाची निर्मिती केल्याचं पंकजा यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडे यांनी चित्रपटाच्या निर्मात्यांना काही बदल सुचवले आहेत. बदलांनंतरच चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा होणार आहे. चित्रपट 11 तारखेला प्रदर्शित होणार होता, मात्र काही कारणाने याचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं. मराठीसह हिंदी मालिकांत गाजलेला अभिनेता शरद केळकर या चित्रपटात गोपीनाथ मुंडे यांची व्यक्तिरेखा साकारत आहे, तर श्रुती मराठेने यात पंकजा मुंडे यांची भूमिका केली आहे. या चित्रपटात गोपीनाथ मुंडेंच्या राजकीय कारकीर्दीसह कौटुंबिक जीवनावरही प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. शरद केळकर आणि श्रृती मराठेसह या सिनेमात ओमकार कर्वे याने प्रमोद महाजन यांची तर दिप्ती भागवतने प्रज्ञा मुंडे यांची भूमिका साकारली आहे. गिरीश परदेशी यात प्रविण महाजन यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

12- गँगस्टर अश्विन नाईकसह 4 साथीदारांना पोलिस कोठडी 

                   मुंबईतील कुख्यात गँगस्टर अश्विन नाईकला भोईवाडा कोर्टाने 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एका बिल्डरकडून 50 लाखांची खंडणी उकळल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी कुख्यात गँगस्टर अश्विन नाईकला काल बेड्या ठोकल्या होत्या. त्यानंतर आज त्याला भोईवाडा कोर्टात हजर करण्यात आलं होतं. अश्विन नाईकसोबत त्याच्या चार साथीदारांनाही 24 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रमोद केळुस्कर, जनार्दन सकपाळ, प्रथमेश परब आणि राजेश तांबे असे अश्विन नाईकच्या साथीदारांची नावं आहेत. अंगावरचा शर्ट काढत आमदार प्रणव सिंह दोन्ही हातात बंदुका घेऊन थेट गाण्यावर ठेका धरला. या व्हिडीओत दोन महिलाही आहेत. त्यातील एक महिला प्रणव सिंह यांची पत्नी देवयानी आहे.

13- येत्या मे महिन्यात निघणार म्हाडाच्या 5 हजार घरांची लॉटरी 

                     म्हाडाची घरं घेणार्‍यांसाठी आनंदाची बातमी आहे. मुंबईकरांचं लक्ष लागून राहिलेली म्हाडाच्या मुंबई मंडळाची लॉटरी येत्या मे महिन्यात निघणार आहेत. या लॉटरीमध्ये मुंबईतील सुमारे 1 हजार 84 घरांचा समावेश असल्याची शक्यता असून, पुढील महिन्यात या लॉटरीची अधिकृत घोषणा करण्यात येण्याची शक्यता आहे. मुंबई मंडळासह कोकण मंडळाच्या 4 हजार घरांचीही लॉटरी मे महिन्यात काढण्याचा विचार सुरू आहे. दोन्ही लॉटरी एकत्रित काढल्यास या लॉटरीत मुंबईकरांसाठी 5 हजार घरे उपलब्ध होतील.

14- बीड : शिक्षकांकडून बलात्कार, त्यानंतर पोलिसांकडून विद्यार्थीनीवरच खंडणीचा गुन्हा 
                          प्राचार्य, मुख्याध्यापक पदावर असणाऱ्या महादेव बजगुडे, पवार आणि केशव भांगे नावाच्या तिघांनी आदिवासी मुलीवर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.  महाविद्यालयात प्रवेश देतो, म्हणून तिचा लैंगिक छळ केला गेला आहे. २० ते २२ शिक्षक, साथीदार यात सहभागी होते. हे प्रकरण चव्हाट्यावर येणार, हे लक्षात येताच पीडित मुलीवर खंडणीचा गुन्हाही दाखल करत तिला अटकही करण्यात आली. परंतु तिची मेडीकल चाचणी झाल्यानंतर, ती ३ महिन्यांची गर्भवती असल्याचं सत्य समोर आलं. हे सत्य बाहेर आल्यानंतरही पोलिसांनी तब्बल आठ दिवसांनी मुलीची फिर्याद नोंदवून घेतली. प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सहशिक्षकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय. आपल्या मुलीला अटक केल्यानंतर काहीही कळवण्याचं औदार्यही बीडच्या पोलिसांनी दाखवलं नाही. उलट मुलीचं लग्न झालं आहे, तिच्या नवऱ्यापासूनच ती गरोदर असल्याचं पोलिसांनी भासवल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
15- कर्नाटकात हुबळी येथे पुडूचेरी-दादर एक्सप्रेसचे ट्रेनचा एक डब्बा आणि इंजिन घसरला 

16- कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन कोलकात्यामध्ये भाजपची पश्चिम बंगाल सरकारविरोधात निदर्शने 

17- औरंगाबाद बजाजनगरमध्ये वडगाव-कोल्हाटी ग्रामपंचायतीत शिवसेनाचा विजय, १७ पैकी १५ जागांवर शिवसेना उमेदवार विजयी 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
18- सलमान खान रिक्षाने हॉटेलमध्ये पोहोचला  
१९- आमीरने घरची चर्चा बाहेर बोलायला नको होती : नाना पाटेकर 
                     प्रत्येकाच्या घरात जगभरातील चर्चा होत असतात. पण बाहेर आल्यावर कोणती गोष्ट सार्वजनिकरित्या बोलायची आणि कोणती नाही, हे ज्याचं त्याला कळायला हवं. त्यामुळे आमीर खानने घरातील चर्चा बाहेर बोलून दाखवायला नको होती, असं स्पष्ट मत ‘नटसम्राट’ अभिनेता नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं.तर देशात खूपच सहिष्णुता आहे. देश थोडा असहिष्णू व्हायला हवा, असं दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले. याशिवाय सलमान खान माझा मित्र आहे, त्यामुळे तो सुटल्याचा आनंद असल्याचंही त्यांनी नमूद केलं. पण कोर्टाच्या निर्णयावर भाष्य करणं उचित नसल्याचंही ते म्हणाले.

~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२०- किनवट-माहूर तालुक्यातील शाळेत वाटर फिल्टर बसिण्यात दिरंगाई
http://goo.gl/nlrDtt
~~~~~~~~~~~~~~~
२१- जावेद जाफरीची हिंदू-मुस्लिम कट्टरवाद्यांना सणसणीत कानाखाली
http://goo.gl/9YpQId
~~~~~~~~~~~~~~~
2२- 'फ्रॅन्डी'नंतर नागराजचा सैराट, 'सैराट'चं टीझर रिलीज
http://goo.gl/lDMxfg
~~~~~~~~~~~~~~~
२३- जि.प.प्रा. शाळा बामणी [बू] प्रशालेने अर्जापुर येथे झालेल्या तालुकास्तारिय विज्ञान प्रदर्शनात सलग दुसऱ्या वर्षी सुध्दा तृतीय क्रमांक
http://goo.gl/VEHe4q
~~~~~~~~~~~~~~~
२४- अटकळीत ग्यानेश्वरी पारायण सप्ताह संपन्न
http://goo.gl/m2CAVa
~~~~~~~~~~~~~~~
२५- मुखेड पोलिस प्रशासन व अवैध वाहतुकीच्या विरोधात दोन तास रास्ता रोको
http://goo.gl/FWpyBM
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आनंद ही एक अशी गोष्ट आहे की जी आपल्याकडे नसतानाही ती आपण दुस-याला देऊ शकतो.
[नारायण खिल्लारे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुपचे स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: