दक्षिण मध्य रेल्वे ने मुंबई ला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून मुंबई - काझीपेत- मुंबई मार्गे औरंगाबाद, नांदेड, किनवट, आदिलाबाद विशेष गाडी चालवीत आहे. जानेवारी -२०१६ मध्ये ह्या गाडीच्या सहा फेऱ्या वाढविण्याचे ठरविण्यात आले आहे. या पुढील प्रमाणे--
१. गाडी संख्या ०१०९३ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - ते काझीपेत मार्गे औरंगाबाद, नांदेड, किनवट, आदिलाबाद.
हि गाडी मुंबई येथून दिनांक १, ८, १५, २२, आणि २९ जानेवारी २०१६ रोजी सकाळी ११.३० वाजता सुटेल आणि औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, भोकर, किनवट, आदिलाबाद चंद्रपूर, मार्गे काझीपेत येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १५.०० वाजता पोहोचेल.
२. परतीच्या प्रवासात गाडी संख्या ०१०९४ हि काझीपेत - लोकमान्य टिळक कार्मिनास मुंबई, काझीपेत येथून दिनांक २, ९, १६, २३ आणि ३० रोजी सायंकाळी १७.४५ वाजता सुटेल आणि चंद्रपूर, आदिलाबाद, किनवट, भोकर, नांदेड, परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी रात्री २३.१५ वाजता पोहोचेल.
या गाडीला १८ डब्बे असतील ज्यात - १- द्वितीय वातानुकुलीत, १- तृतीय वातानुकुलीत, ७ - द्वितीय शय्या, ६ - जनरल, २ - लगेज तथा एस. एल. आर. असतील.

No comments:
Post a Comment