Wednesday, 23 December 2015

गावातील शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी प्रत्‍येक नागरीकांनी वेळ द्यावा – जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर



गावातील शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी प्रत्‍येक नागरीकांनी वेळ द्यावा
                        – जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर


[विठ्ठल कत्रे, ता. प्रतिनिधी]
नांदेड 22- आपल्‍या गावामध्‍ये संपूर्णपणे स्‍वच्छता नांदावी यासाठी प्रत्‍येक नागरीकांनी वेळ देऊन योगदान करावे, असे प्रतिपादन जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई भोसीकर यांनी पानभोसी ता.कंधार येथील वैयक्तिक शौचालय बांधकाम केलेल्‍या 28 लाभार्थ्‍यांना प्रोत्‍साहनपर अनुदान वाटपाच्‍या कार्यक्रमात केले.

     कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी गुरु गयबी नागेंद्र भारती महाराज होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे जिल्‍हा कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर, लोहा पोलीस स्‍टेशनचे पोलीस निरिक्षक सुभाष राठोड, सहाय्यक गट विकास अधिकारी सुनिल मुनाळे, प्रचार्य राजेंद्र भोसीकर, मिनी बिडीओ गोविंद मांजरमकर, मिनी बिडीओ अरुण गोडसे, सरपंच सौ.सुवर्णा नाईकवाडे हे होते.
     आज पानभोसी येथे वैयक्तिक शौचालय बांधकाम केलेल्‍या लाभार्थ्‍यांना 3 लक्ष 36 हजार रुपयाचे वाटप यावेळी सौ. भोसीकर यांच्‍याहस्‍ते करण्‍यात आले. यावेळी बोलतांना सौ. भोसीकर म्‍हणाल्‍या, आपल्‍या गावामध्‍ये शाश्‍वत स्‍वच्‍छता नांदण्‍यासाठी प्रत्‍येक नागरीकांनी वेळ दिला पाहिजे. यासाठी नागरीकांनी घर तेथे शौचालय, घर तेथे शोषखड्डा ही संकल्‍पना आपल्‍या गावामध्‍ये राबवली पाहिजे. यासाठी शासन मोठया प्रमाणावर अनुदान उपलब्‍ध करुन देत आहे. या योजनेचा लाभ घेऊन नागरीकांनी आपले गाव स्‍वच्छ व सुंदर बनवावे. उघडयावर शौचास जाण्‍यामुळे महिलांना वेगवेगळया प्रकारच्‍या आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे सर्व टाळण्‍यासाठी आपले गाव स्‍वच्छ व सुंदर बनवा असे आवाहनही यावेळी बोलतांना केले.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवाजीराव भोसीकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक जे.डी.देवकत्‍ते यांनी केले. कार्यक्रमाचे प्रस्‍ताविक गोविंद मांजरमकर यांनी केले. कार्यक्रमाला शाखा अभियंता पाटील, सुपरवायझर सौ.चव्‍हाण, सौ.शिवनंदा नाईकवाडे, माजी सभापती बापुराव पा.गौंड, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष शिवराज गौंड, बालाजी भातमोडे, सौ.मुंडे तलाठी, गंगाधर जोंधळे, शेख बाबुसाब, मन्‍मथ नाईकवाडे, लाभार्थी व गावकरी उपस्थित होते.     

No comments: