बलात्कारासारखा गुन्हा चीन, सौदी अरेबिया, इजिप्त, इराण, उत्तर कोरिया, अफगाणिस्तानसारख्या देशात घडल्यास त्या आरोपीचा तो शेवटचा गुन्हा असतो. भारतात अशी परिस्थिती आहे का? याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर गाजतोय. एक महिला रात्रीच्या प्रवासासाठी कॅब मागवते. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर या महिलेला झोप लागते. त्यावेळी हा कॅब ड्रायव्हर तिच्यावर अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्नात असतो. मात्र त्याचवेळी रेडिओवर बलात्कार प्रकरणी विधान होते. ते वाक्य ऐकल्यानंतर ड्रायव्हरचे धाबे दणाणते आणि तो हा विचार सोडून देतो. लोकांच्या जागरुकतेसाठी हा व्हिडीओ बनवण्यात आलाय.
No comments:
Post a Comment