काचीगुडा – अकोला इंटर सिटी एक्स्प्रेस नारखेड पर्यंत विस्तारित
रेल्वे बोर्डाने आदेश दिल्या प्रमाणे गाडी संख्या १७६३९ – १७६४० काचीगुडा – अकोला- काचीगुडा इंटर सिटी एक्स्प्रेस गाडी दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून नारखेड पर्यंत विस्तारित करण्याचे ठरविले आहे. आठवड्यातले ६ दिवस हि गाडी नारखेड पर्यंत धावेल.
दिनांक १ जानेवारी, २०१६ पासून या गाडीचा क्रमांक हि बदलण्यात आला आहे. आता हि गाडी १७६४१/१७६४२ या नवीन क्रमांकाने धावेल.
हि गाडी अकोल्याच्या पुढे बडनेरा, नवीन अमरावती, हिवरखेड मार्गे नारखेड येथे पोहोचेल.
उरलेला एक दिवस गाडी संख्या १७६३९/१७६४० दर सोमवारी काचीगुडा येथून सुटून अकोल्या पर्यंतच धावेल तर दर मंगळवारी हि गाडी अकोला येथूनच सुटेल.
No comments:
Post a Comment