नमस्कार लाईव्ह २९-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- पुरातही इंग्लंडचे पंतप्रधान ग्राऊण्ड झिरोवर, कॅमेरुन यांचा पायी दौरा
लंडन : सध्या ग्रेट ब्रिटनला पुराच्या पाण्याचा जोरदार फटका बसला आहे. सर्व महत्त्वाच्या शहरात पुराचं पाणी शिरल्यामुळे इंग्लंडमधलं जनजीवन विस्कळीत झालं असताना इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरुन यांनी एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. आपले सर्व प्रोटोकॉल बाजूला ठेवून कॅमेरुन ग्राऊंड झिरोवर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पोहचले आहेत. यावेळी बचावकार्य करणाऱ्या सैनिक आणि पोलिसांशी स्वतः संवाद साधून कॅमेरुन यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. सर्वसाधारणपणे भारतात पूरपरिस्थितीत सर्व नेते हवाई दौरे करताना दिसतात. पण कॅमेरॉन यांच्या कृतीमुळे एखादा देश प्रगत का होतो याचं उदाहरण पहायला मिळत आहे. दरम्यान भीषण पुरपरिस्थितीमुळे इंग्लंडमधील महत्त्वाच्या शहारांसोबतच ग्रामीण भागांतही अनेकांच्या घरात पाणी शिरलं आहे. त्यामुळे लोकांना सुखरुप स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाने बोटींचा वापर करायला सुरुवात केली आहे. ज्या भागात पुराच्या पाण्याचा वेढा जास्त आहे, त्या भागात लष्काराच्या हेलिकॉप्टरने गरजेच्या वस्तू पोहचवण्यात येत आहेत. अनेक नागरिकांच्या घरात पुराच्या पाण्यामुळे सापासारखे अन्य प्राणी शिरले आहेत. सध्या पूराच्या पाण्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न सुरु आहेत.
२- आयसिसने सेक्स गुलामांवर रेप करण्यावर जारी केला लज्जास्पद फतवा
दहशतवादी संघटना आयएसआयएसने एक वादग्रस्त आणि खूपच लज्जास्पद फतवा जारी केला आहे. एका रिपोर्टनुसार हा फतवा असा आहे की सेक्स गुलाम बनविण्यात आलेल्या महिला आणि तरुणींवर कशा प्रकारे रेप केला जावा, या संदर्भात या फतव्यात माहिती देण्यात आली आहे. इस्लामिक स्टेटचे जाणकाराने फतव्या संदर्भात बोलताना सांगितले की, आयसिसने या फतव्यात दिलेल्या नियम आणि कायद्याची व्याख्या केली आहे. संघटनेनुसार ज्या महिलांना आणि तरूणींना बंधक बनिवल्यानंतर त्याच्या जो व्यवहार केला जातो, त्याबद्दल फतवा काढण्यात आला आहे. या महिलांना सेक्स गुलाम बनिवण्यात येते. त्यांच्याशी रेप करताना नियम आणि कायद्याचे पालन केले पाहिजे असे या फतव्यात म्हटले आहे. अमेरिकेच्या स्पेशल ऑपरेशन फोर्सने या फतव्यासंदर्भात काही दस्तावेज सापडले. यात या गोष्टी समोर आल्या आहेत. फोर्सने आयसिसच्या सिरियातील ठिकाणांवर छापेमारी केली होती. त्यावेळी ही माहिती समोर आली.
१) फतव्यातील काही नियमांनुसार एक पिता आणि मुलगा एकाच सेक्स गुलामासोबत सेक्स करू शकत नाही.
२) आई आणि मुलीचा मालक दोन्ही सोबत सेक्स करू शकतो.
३) पण ज्या सेक्स गुलाम महिला आणि तरूणी जॉइंट ओनर्सशी संबंध ठेवतात. त्याच्यासोबत सर्वजण सेक्स करू शकतात.
३- पाकिस्तान - मारदान जिल्ह्यात नॅशनल डाटाबेस अँण्ड रजिस्ट्रेशन कार्यालयाजवळ झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांचा आकडा १८ वर
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- दोन लाखांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड अनिवार्य
देशातील काळा पैशाला लगाम घालण्यासाठी सरकारने आता दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक केलेय. ही माहिती मंगळावीर संसदेत देण्यात आली. हा नियम १ जानेवारी २०१६पासून अमलात येणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत एका पूरक मागणीवर उत्तर देताना सांगितले की, काळ्या पैशाला लगाम घालण्यासाठी दोन लाखांपेक्षा जास्त पैशांचा व्यवहार करताना आता पॅन कार्ड आवश्यक आहे. याबाबत अधिसूचना जाही करण्यात आलेय. ५० हजारांचे हॉटेल बिल पेड करताना पॅन जरुरी नवीन वर्षात तुम्ही हॉटेलमध्ये गेलात आणि तुमचे बिल ५० हजार रुपयांपेक्षा जास्त झाले तर पॅन कार्ड बंधनकारक असणार आहे. तसेच विदेश यात्रा करणाऱ्यांसाठीही पॅन कार्ड आवश्यक आहे. देशातील काळा पैशावर नजर ठेवण्यासाठी १ जानेवारी २०१६ पासून हा नियम लागू होणार आहे.
५- पोलीस कॉन्स्टेबलच्या प्रॉपर्टीवर धाड; 'करोडपती' असल्याचं उघड
एका पोलीस कॉन्स्टेबलच्या ठिकठिकाणच्या प्रॉपर्टीवर टाकलेल्या धाडीनंतर तो 'करोडपती' असल्याचं उघड झालंय. सोमवारी, लोकायुक्त पोलिसांच्या आदेशानुसार, पोलीस कॉन्स्टेबल पदावर काम असणाऱ्या अर्जुन सिंग याच्या बँक अकाऊंट आणि तब्बल पाच घरांवर छापे मारले गेले. यावेळी, अर्जुन सिंगकडे करोडोंचा मुद्देमाल सापडलाय. अर्जुन सिंग याच्याकडे पाच घरं, सहा प्लॉटस्, तीन लक्झरी कार आणि एक एसयूव्ही सापडली. तर त्याच्या बँक अकाऊंटमध्ये एक रिव्हॉल्व्हर, काट्रेजेस, १३२ ग्रॅम सोनं आणि दोन किलोचे चांदीचे दागिने सापडले. तीन महिन्यांपूर्वीच जबलपूरमध्ये प्रादेशिक परिवहन कार्यालयात अर्जुनची पोस्टिंग झाली होती. पण, त्यानं आपल्या नव्या ठिकाणी उपस्थितीच नोंदवली नव्हती. याबद्दल आरटीओनं भोपाळ ऑफिसकडे एक तक्रारही दाखल केली होती.
६- 'दिल्ली क्रिकेट संघटनेत निवडीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी' - केजरीवालांचा गंभीर आरोप
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी, दिल्ली क्रिकेट संघटनेवर एक गंभीर आरोप केला आहे. डीडीसीएचे पदाधिकारी संघात निवड करण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची मागणी करायचे, असा गंभीर आरोप केजरीवालांनी केला दिल्ली क्रिकेट संघामध्ये मुलाची निवड हवी असेल तर, एक रात्र सोबत करायला या, अशी डीडीसीएच्या पदाधिकाऱ्याने एका वरिष्ठ पत्रकाराच्या पत्नीला ऑफर दिली होती, असा दावा केजरीवालांनी केला आहे. आर्थिक भ्रष्टाचार नाही तर, डीडीसीएमध्ये सेक्स रॅकेटही चालते, असा आरोप केजरीवालांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना भित्रे, मनोरुग्ण म्हटल्याचा आपल्याला अजिबात पश्चाताप नसल्याचेही त्यांनी सांगितले. केजरीवालांनी आरोप केला असला तरी, त्याने त्याचे पुरावे दिलेले नाहीत. तो पत्रकार साक्ष द्यायला तयार आहे, असेही केजरीवालांनी सांगितले.
७- गुजराती लेखक रघुवीर चौधरींना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर
नवी दिल्ली: साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचा असा ज्ञानपीठ पुरस्कार यंदा गुजराती लेखक रघुवीर चौधरी यांना जाहीर झाला आहे. 51 व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी लेखक रघुवीर चौधरी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अधिकृत पत्रकाद्वारे याबाबत माहिती देण्यात आली. गुजराती साहित्यातील प्रसिद्ध लेखक रघुवीर चौधरी यांचा जन्म 1938 मध्ये झाला. त्यांनी आजवर अनेक कविता, नाटक याशिवाय इतर साहित्य प्रकारातही विपुल लेखन केलं. 1977 साली त्यांच्या ‘उप्रवास कथात्रयी’ यासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. साहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या साहित्यिकांना या मानच्या पुरस्काराने गौरविलं जातं. रघुवीर चौधरी यांच्याआधी गुजराती साहित्यिकांमध्ये 1967 साली उमा शंकर जोशी, 1985 साली पन्नालाल पटेल आणि 2001 साली राजेंद्र शाह यांना ज्ञानपीठ पुरस्कार बहाल करण्यात आला होता. 2014 साली ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडेंना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. सरस्वतीची प्रतिमा, प्रशस्ती पत्रक आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरुप असतं.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी केंद्राची 3100 कोटींची मदत
राज्यातील दुष्काळ निवारणासाठी केंद्र सरकारचा निधी जाहीर झाला आहे. सरकारने महाराष्ट्रासाठी 3100 कोटी रुपयांचं पॅकेज मंजूर केलं आहे. दिल्लीत झालेल्या उच्चस्तरिय बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीत आज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील दुष्काळाबाबत केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंह, अर्थमंत्री अरुण जेटली आणि गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात महाराष्ट्राला 3100 कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय झाला. दरम्यान, केंद्र सरकारने राज्यातील दुष्काळासाठी दिलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारने 3100 कोटींचं पॅकेज जाहीर करुन महाराष्ट्राच्या तोंडाला पानं पुसली आहेत, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
९- बाळासाहेबांच्या अखंड ज्योतीचा खर्च केंद्र सरकार उचलणार
शिवसेनाप्रमुखांच्या शिवाजी पार्कवर असलेल्या स्मृतीस्थळावरील अखंड ज्योतीचा खर्च बीपीसीएल कंपनी करणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावरील अखंड ज्योतीचा खर्च महिन्याकाठी सुमारे एक लाख रुपये इतका आहे. त्यामुळे एकीकडे सरकार गॅस सबसिडीत कपात करत असताना सर्वसामान्यांच्या पैशातून ही उधळपट्टी कशाला, अशा उद्विग्न प्रतिक्रिया सर्वच स्तरातून उमटत आहेत. या ज्योतीचा खर्च याआधी मुंबई महापालिकेकडे होता. मात्र तो केंद्र सरकारने उचलावा यासाठी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर सोमवारी या अखंड ज्योतीचा खर्च केंद्र सरकार उचलणार असल्याची घोषणा केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केली.
१०- समृद्ध जीवनच्या महाराष्ट्र, ओरिसातील 58 कार्यालयांवर सीबीआय छापे
‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांना सोमवारी अटक केल्यानंतर आज समृद्ध जीवनच्या महाराष्ट्र आणि ओरिसातल्या 58 कार्यालयांची सीबीआयनं झाडाझडती घेतली आहे. समृद्ध जीवन आणि तिच्या संबंधित कंपन्यांच्या कार्यालयात आज सीबीआयनं धाडी टाकत चिटफंड घोटाळ्यासंदर्भात चौकशी केली आणि कागदपत्रांची छाननी केली. समृद्ध जीवन कंपनीची पुण्यात 40 ठिकाणी, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर मध्ये प्रत्येकी एक आणि ओडिशामध्ये दोन कार्यालयं आहेत. या सर्व ठिकाणी सीबीआयने छापे टाकले आहेत. ‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांना आज उमरगा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. उस्मानाबाद पोलिसांनी सोमवारी त्यांना पुण्यातून ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर मोतेवारांना उस्मानाबादला नेण्यात महेश मोतेवार यांना उस्मानाबादच्या मुरुम पोलिसांनी फरार घोषित केलं होतं. चिटफंड प्रकरणी गुंतवणूकदारांचे पैसे परत न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.
११- पंढरपुर; बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणारी कार पकडली; दोन डॉक्टरांना अटक
पंढरपुरात बेकायदेशीर रित्या गर्भलिंग निदान करणार्या फिरत्या केंद्रावर पंढरपूर पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली असून सोनोग्राफी मशिनसह एक मोटारही जप्त करण्यात आली आहे. पंढरपूर शहरात एका अल्टो मोटारीत गर्भलिंग निदान केलं जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या केंद्रावर छापा टाकला. त्यावेळी मोटारीत एक सोनोग्राफी मशिन आणि गर्भवती महिला आढळून आल्या. पोलिसांनी सोनोग्राफी मशिन आणि मोटार जप्त करून गर्भलिंग निदान करण्यासाठी आलेल्या गर्भवती महिलांना ताब्यात घेतलं. या कारवाईत डॉ. गाडे, डॉ. मोरे यांच्यासह 3 नर्सना अटक केली. याप्रकरणातला आणखी एक आरोपी डॉक्टर हितेंद्र ठाकुर मात्र अजूनही फरार आहे.
१२- गडचिरोलीतला जहाल माओवादी आयतू पोलिसांना शरण
52 पोलिसांच्या हत्येचा मास्टरमाईंड आणि जहाल माओवादी आयतु उर्फ अशोर गजरालाने तेलंगाणा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे. त्यामुळे तेलंगणा आणि गडचिरोली जिल्हय़ातील माओवादी चळवळीला मोठा हादरा बसला आहे. वारंगलचे डीआयजी मलारेड्डी यांच्यासमोर आयतुने आत्मसमर्पण केलं. आयतुच्या आत्मसमर्पणाने अनेक गुन्ह्यांचा उडगडा होण्याची शक्यता आहे. तसंच माओवादी चळवळीच्या कारवायांना आळा बसण्यास मदत होणार आहे. आयतु हा गडचिरोली इथल्या माओवादी चळवळीचा मुख्य सूत्रधार आहे. 2009मध्ये घडलेल्या पोलीस हत्याकांडाचाही तो मास्टरमाईंड आहे. यावेळी माओवाद्यांनी एकुण 52 पोलिसांच्या हत्या केली होती.
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- हिंजवडीच्या आयटी कंपनीत महिलेवर बलात्कार, दोघांना अटक
हिंजवडी परिसरातल्या एका नामांकित आयटी कंपनीच्या कॅन्टिनमध्ये महिला कामगारावर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी 27 डिसेंबर रोजी ही घटना घडली. या प्रकरणी दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. पारितोष लाला आणि प्रकाश किसन महाडिक अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, एकाने महिलेवर बलात्कार केला तर दुसऱ्या आरोपीने घटनेचे फोटो काढले होते. या प्रकरणाची वाच्यता केल्यास हे फोटो इंटरनेटवर टाकून बदनामी करु अशी धमकी या दोघांनी दिली होती. संबंधित महिलेने दुसऱ्या दिवशी हिंजवडी पोलिसांकडे या घटनेची तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
१४- पुण्यात पुन्हा दुचाकी जळीतकांड, पाच बाईक जळून खाक
पुण्यात पुन्हा एकदा दुचाकी जळीतकांडाच्या घटनेने घबराट पसरली आहे. पौड रोडवरील कृष्णकुंदा नगर परिसरातील पाच दुचाकी अज्ञातांनी रात्रीत जाळून टाकल्याची घटना मंगळवारी सकाळी लक्षात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तपासाला सुरुवात केली आहे. पाच दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तरदोन ते तीन दुचाकींचं काही प्रमाणात नुकसान झालं आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातील रहिवासी भागात दुचाकी जळीतकांडाची घटना घडली होती. त्याची पुनरावृत्ती घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. सध्या या परिसरातत तणावपूर्ण शांतता आहे.
१५- मुंबईत मुलीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला
मुंबईच्या गोरेगावमध्ये एका उच्चभ्रू सोसायटीत एका अल्पवयीन मोलकरणीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळला. गोरेगाव पश्चिमच्या गार्डन इस्टेट या सोसायटीत अनेक हायप्रोफाईल लोक राहत असल्याने हे प्रकरणी लवकर उजेडात आलं. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं 203 मध्ये एक दाम्पत्य राहतं आणि त्यांच्या घरात अल्पवयीन मुलगी मोलकरणीचं काम करत होती. सुरुवातीला या मुलीने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात होतं. मात्र तिच्या पालकांनी ही आत्महत्या नसून तिची हत्या झाल्याचा आरोप केला आहे. घरमालक तिची छेडछाड करत असे, असा दावाही मृत मुलीच्या पालकांनी केला आहे. गार्डन इस्टेट याच इमारतीत आधी दोन मोलकरणींचा असाच मृत्यू झाला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या वाहतूक सेनेचे सेक्रेटरी खालिद खान यांनी रात्री उशिरा बंगूरनगर पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची तक्रार दाखल केली. पोलिस या तपासाचा गांभीर्यानं तपास करत आहे. मुलीच्या मृत्यूचं कारण शोधण्यासाठी पोलिस आता या इमारतीचं सीसीटीव्ही फुटेजही तपासत आहेत. मुलीचा मृतदेह पोस्टमार्टेमसाठी भगवती रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदनाच्या अहवालानंतरच या घटनेचं सत्य बाहेर येईल.
१६- छतीसगढ; दोन महिन्यांच्या निष्पाप जीवाला नराधम बापानं जिवंत गाडलं
छत्तीसगढच्या एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. पत्नी शारीरिक संबंधांना विरोध करते या रागातून एका नराधमानं आपल्या दोन महिन्यांच्या चिमुरड्याला जमिनीत जिवंत पुरल्याची घटना उघडकीस आलीय. छत्तीसगडच्या दुर्ग भागात ही घटना घडलीय. राकेश असं या नराधमाचं नाव आहे. रोज दारू पिणाऱ्या राकेशचा पत्नी सीमासोबत नेहमीच वाद होत होता. दोन दिवसांपूर्वी असाच दारूच्या नशेत राकेश घरी आला आणि त्यानं पत्नीकडे शरीर-संबंधांची मागणी केली. तिनं विरोध केल्यानंतर तो मुलाला घेऊन बाहेर पडला तो थेट पहाटे चार वाजल्याच्या सुमारास घरी आला.
१७- पटनामध्ये अभियंत्रीकीच्या विद्यार्थ्याच अपहरण
१८- छत्तीसगड- जगदलपूर येथे २३ नक्षलवाद्यांचे पोलिसांसमोर समर्पण
१९- रायगड - वरसई येथे महाराष्ट्र बँकेचे पैसे रिक्षाने घेऊन जाताना ३ दुचाकीस्वारांनी दरोडा टाकला,
दरोड्यामध्ये २५ लाखांची लूट
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- पाकिस्तानी अभिनेत्रीचे बॉलीवू़डवर गंभीर आरोप
पाकिस्तानी अभिनेत्री आणि क्वीन या चित्रपटात काम केलेल्या सबीका इमाम हिने मुस्लिम मुलींना बॉलीवूडमध्ये येण्यासाठी खूप काही झेलावं लागतं असं म्हटलं आहे. मुस्लिम मुलींना बॉलीवूडमध्ये काम मिळवण्यासाठी रडतांना आणि हतबल होतांना मी पाहिलं आहे. एवढंच नाही तर काही मुस्लिम मुलींचं शोषणही होतं आहे. असा गंभीर आरोप सबीकाने बॉलीवूडवर केला आहे. क्वीनमध्ये केलेली भूमिका तिला ऑफर केली गेली नव्हती. त्यासाठी तिने खूप चांगलं ऑडिशन दिलं होतं. ती लहान असतांना तिने पोल डान्स शिकला होता म्हणून तिने ही भूमिका केली असंही तिचं म्हणणं होतं. क्वीनमध्ये केलेल्या या डान्सबाबत तिचावर अनेकांनी टीका केली होती पण, जर तिने हा रोल नसता केला तर ती बॉलावूडमध्ये कधीच येऊ शकली नसती. असंही तिने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२१- किनवटमध्ये आज तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा
http://goo.gl/K0SudP
~~~~~~~~~~~~~~~
२२- संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये टेंभूर्णी, नागराळ तर शाहु फुले आंबेडकर दलित वस्ती विकास अभियानात हिप्परगा, शेळगाव गौरी प्रथम
http://goo.gl/VLa0W8
~~~~~~~~~~~~~~~
२३- लोहा; नांदेड जिल्ह्यात दारूबंदी करणेबाबत भाजप युवा लोहा कडून सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन
http://goo.gl/9Iaaw1
~~~~~~~~~~~~~~~
२४- दक्षिण मध्य रेल्वेचा काही गाड्यात तात्पुरत्या स्वरुपात आरक्षित डब्बे वाढविण्याचा निर्णय
http://goo.gl/rffPhP
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आपल्याकडे समोरच्या व्यक्तीला देण्यासारखे काही नाही, असं वाटत असेल तर चेहऱ्यावर एक 'स्मितहास्य' द्या, हा उपहार कोणत्याही वस्तूपेक्षा खूप मौल्यवान आहे
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment