Tuesday, 22 December 2015

नमस्कार लाईव्ह २२-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २२-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- चीनमध्ये भूस्खलन, 33 इमारती जमीनीखाली; बचावकार्य सुरु 

                    बीजिंग: आपल्याकडे जे संकट माळीण गावावर ओढवलं होतं तेच संकट दक्षिण चीनमधील शेनझेन शहरावर ओढवलं आहे. भूस्खलनामुळे गुवांगडोंग प्रांतातील लियुक्सी इंडस्ट्रियल पार्कच्या 33 इमारती जमीनीखाली गाडल्या गेल्या आहेत. या दुर्घटनेत गॅस लाईनचा स्फोट झाल्यामुळं मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 59 जण बेपत्ता झाले असून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. लोकांना वाचवण्यासाठी दीड हजार जणांची कुमक कामाला लागली असून 900 जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.. भूस्खलनामुळे 25 एकर परिसरात मातीचे ढीग पसरले आहेत. मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरु आहे. आपत्ती व्यवस्थापनचे अनेक जवान घटनास्थळी अहोरात्र काम करीत आहेत.

२- अफगाणिस्तानमध्ये बगराम एअरबेसवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात अमेरिकेचे ६ जवान शहीद 

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- दिल्लीत बीएसएफचं विमान कोसळलं, चौघांचा मृत्यू 

                  सीमा सुरक्षा दलाच्या सुपर किंग या चार्टर्ड विमानाला दिल्लीत अपघात झाला. या अपघातात चार जवानांचा मृत्यू झाला आहे. रांचीला जाणारं हे विमान आज सकाळी दहाच्या सुमारास द्वारका परिसराच्या जवळ असलेल्या बाडोला गावात कोसळलं. विमानात बीएसएफच्ये टेक्निशियनची टीम होती. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाल्याचं कळतं. दिल्ली विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर विमानाचा संपर्क तुटला. दरम्यान, अग्निशमन दल आणि अॅम्ब्युलन्स घटनास्थळी पोहोचले असून मदत आणि बचावकार्य सुरु आहे. अपघाताचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

४- जेटलींविरोधात 'आप' तर्फे ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी केस लढणार 

                    डीडीसीएतील कथित घोटाळ्याप्रकरणी आरोप करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आपच्या इतर पाच नेत्यांवर अरुण जेटलींनी अब्रूनुकसानीचा खटला दाखल केला आहे. मात्र केजरीवालांचा बचाव करण्यासाठी कोर्टात ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ आणि माजी कायदामंत्री राम जेठमलानी उभे राहणार आहेत. डीडीसीएतील कथित घोटाळ्यावरुन आम आदमी पक्षानं अर्थमंत्री अरुण जेटलींना टार्गेट केलं आहे. अरुण जेटलींच्या कार्यकाळात डीडीसीएत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आपकडून करण्यात आला आहे. त्यामुळे जेटलींनी केजरीवाल आणि त्यांच्या साथीदारांना कोर्टात खेचण्याचा निर्णय घेतला.

५- द्वारका येथे बीएसएफचे विमान कोसळल्याचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले, या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना हा आघात सहन करण्याची शक्ती मिळो - राहुल गांधी, काँग्रेस उपाध्यक्ष 

६- विधान भवनात शिवसेनेचे श्रीहरी अणेंविरोधात आंदोलन 

७- पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच अफगाणिस्तानच्या दौऱ्यावर जाणार 

८- पेट्रोल-डिझेल आणखी स्वस्त होणार 

                    आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट कच्च्या तेलाचे भाव दर वर्षातल्या नीचांकी पातळीवर पोहचलेत. ब्रेंट क्रूड काल कच्चा तेलाच्या बाजारात ३६ डॉलर आणि ९ सेंट्सचा प्रति बॅरलवर येऊन पोहचलं. २००४ नंतर प्रथमच ब्रेंट क्रूडनं ही पातळी गाठलीय. या घसरणीमागे अल-निनोचा प्रभाव असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. अमेरिकेत यंदा दरवर्षी पेक्षा थंडीचा कडाका कमी आहे. त्यामुळे याकाळात वाढणारी तेलाची मागणी यावर्षी वाढलेली नाही. तिकडे ओपेक देश आणि अमेरिकेतील तेल कंपन्यांनी कच्च्या तेलाच्या उत्पादनात कुठलही कपात केलेली नाही. त्यामुळे मागणी पेक्षा पुरवठ्याचं प्रमाण वाढलंय. येत्या वर्षातही तेलच्या मागणी आणि पुरवठ्याचं गुणोत्तर असचं व्यस्त राहण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे यापुढेही कच्च्या तेलाचे भाव खालीच राहतील असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे भाव आणखी घसरतील असं चित्र आहे.

९- रोहतक गँगरेप : सातही नराधमांना फाशी 
                  हरियाणाच्या रोहतकमध्ये 28 वर्षीय तरुणीवर गँगरेप करून, क्रूरकृत्याची सीमा ओलांडणाऱ्या नराधमांना फाशी सुनावण्यात आली आहे. रोहतक जिल्हा सत्र न्यायालयाने सात जणांना दोषी ठरवून, फासावर लटकावण्याचे आदेश दिले आहेत. हा गँगरेप म्हणजे पाशवीपणाचा कळस होता, असं न्यायालयाने म्हटलं आहे. रोहतकच्या गड्डी खेरा गावांत फेब्रुवारी 2015 मध्ये मानसिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या तरुणीवर पाशवी बलात्कार झाला होता. बलात्कारी नराधमांनी आपल्या कारनाम्यानंतर क्रूरपणाची हद्द गाठली हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- अयोध्येत झालेल्या शिलापूजनप्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने मागितला अहवाल 

११- हेमा उपाध्याय हत्या : पती चिंतन उपाध्यायला अटक 

                         शिल्पकार हेमा उपाध्याय आणि तिच्या वकिलाच्या हत्याप्रकरणात हेमा यांचे पती चिंतन उपाध्यायला अटक करण्यात आली आहे. कांदिवली पोलिसांनी सोमवारी रात्री चिंतन यांची चौकशी केल्यानंतर त्यांना अटक केली. अतिरिक्त पोलिस आयुक्त फतेहसिंह पाटील यांनी याबाबत माहिती दिली. हेमा आणि वकील हरीश यांच्या हत्येपूर्वी मारेकरी विद्यधर राजभर आणि चिंतन उपाध्यायची चर्चा झाली होती. त्यावरुनच पोलिसांनी याच्य  महत्त्वाचे धागेदोरे मिळाल्यानंतर पोलिसांनी चिंतनला बेड्या ठोकल्या. चिंतनला आज दुपारी बार वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणात आतापर्यंत पती चिंतन उपाध्यायसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर मारेकरी विद्याधर राजभर अद्यापही फरार आहे.

१२- कोलकाता विमानतळावर जेट एअरवेजच्या बसची एयर इंडियाच्या विमानाला धडक 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१३- सांगली: पालिका आरोग्य कर्मचाऱ्यांना कुत्री भेट 

                        सांगली शहरात भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करत, शहर सुधार समितीनं अनोखं आंदोलन केलं. या समितीने चक्क पालिकेच्या आरोग्य कार्यालयात कुत्री सोडत विरोध दर्शवला. तसंच आरोग्य अधिकाऱ्यांना कुत्री भेट देऊन पालिका प्रशासनाविरोधात निषेध नोंदवला.

गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सातत्यानं होत आहे. मात्र दुर्लक्ष होत असल्यानं संतप्त कार्यकर्त्यांनी थेट पालिकेच्या आरोग्य कार्यालयात कुत्री सोडत आंदोलन केलं

१४- मुंबईत धावत्या लोकलमध्ये महिलेची प्रसूती 

                         मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळख असलेल्या लोकल ट्रेनमध्ये एका महिलेने मुलाला जन्म दिला. कुर्ला स्टेशनजवळ सोमवारी रात्री 9.30 वाजता महिलेने धावत्या लोकलमध्येच मुलाला जन्म दिला. कुर्ला जीआरपीतर्फे मिळालेल्या माहितीनुसार दिवामध्ये राहणारं कुटुंब सुनेला घेऊन कामा हॉस्पिटलकडे जात होतं. मात्र ट्रेन विद्याविहार स्टेशनवर पोहोचली तेव्हा त्या महिलेला प्रसववेदना सुरु झाल्या. गाडी कुर्ल्याला पोहोचण्याआधी डब्यातच महिलेची प्रसूती झाली. डब्यातील इतर महिलांनी सुद्धा तिची मदद केली. ट्रेन कुर्ला स्टेशनवर पोहोचताच कुर्ला जीआरपीला यासंदर्भातील माहिती देण्यात आली. जीआरपीच्या मदतीने महिला आणि त्याच्या नवजात मुलाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

१५- अहमदनगर; कार कॅनॉलमध्ये कोसळून अपघात, एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू 

                          अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कार कुकडी कॅनॉलमध्ये कोसळल्यानं एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन मुलांचा समावेश आहे. रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. पुणे जिल्ह्यातील वाघोलीचं जाधव कुटुंब साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आलं होतं. साईबाबाचं दर्शन घेऊन परतत असताना नगर-पुणे रोडवर नारायणगव्हाण जवळ त्यांच्या गाडीचं टायर फुटलं. अचानक टायर फुटल्यानं गाडी रोड शेजाऱ्यारील कॅनालमध्ये जाऊन कोसळली. यात गाडीतील अख्खं जाधव कुटुंब ठार झालं.

१६- रायपूर: सरकत्या जिन्यांमध्ये अडकला चिमुकल्याचा हात, अथक प्रयत्नानंतर सुटका 

                      एस्केलेटर म्हणजेच सरकत्या जिन्यांमध्ये 7 वर्षाचा मुलगा अडकल्याची घटना रायपूरमधील श्याम प्लाझाच्या नावाच्या मॉलमध्ये घडली. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्या मुलाची सुटका करण्यात आली आहे. मॉलमध्ये काम करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याचा मुलगा खेळता खेळता एस्केलेटरवर पडला. त्या मुलाचा हात एस्केलेटरमध्ये अडकला. मुलाचा हाता कापावा लागतो की काय, अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र इंजिनीअर्सनी दोन तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर त्या मुलाचा हात एस्केलेटरमधून सोडवला. दरम्यान, या अपघातात मुलगा जखमी झाला असून त्याच्यावर स्थानिक रूग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, एस्केलेटरवरील अपघातात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे मागील काही दिवसांपासून समोर येत आहे.

१७- मुंबई: एल्फिन्स्टन ब्रीजजवळ डंपर उलटल्याने वाहतूक विस्कळीत 

१८- औरंगाबाद: मनमाड-काचीगूडा पॅसेंजरचे इंजिन बंद पडल्यामुळे पॅसेंजर परसोडा येथे थांबली असून वाहतूक रखडली 

१९- अकोला जिल्हा महिला हॉस्पिटलजवळ स्टोव्हचा स्फोट, ६ महिला जखमी, जखमींपैकी दोघींची प्रकृती चिंताजनक 

२०- औरंगाबाद- खोजेवाडी येथे कार व दुचाकीचा अपघात, २ जण जागीच ठार 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- गेल्या तीन दिवसांत बाजीराव-मस्तानी या चित्रपटाची एकूण ९१ कोटींची कमाई 

२२- न्यूझीलंडचा कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलमची निवृत्तीची घोषणा 

                    न्यूझीलंड क्रिकेट संघाचा कर्णधार ब्रेण्डन मॅक्युलमने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. फेब्रुवारी 2016मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम कसोटी मालिका खेळणार असल्याचं 34 वर्षीय मॅक्युलमने जाहीर केलं. त्याच्या कारकीर्दीतील हा 101 वा कसोटी सामना असेल.

२३- संजय दत्त 25 फेब्रुवारीला जेलबाहेर 

                           1993 बॉम्बस्फोट प्रकरणी येरवाडा तुरुंगात शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त 25 फेब्रुवारी रोजी जेलबाहेर येण्याची शक्यता आहे. पुढच्या वर्षी ऑक्टोबरमध्ये संजयची शिक्षा संपणार आहे. पण चांगल्या वर्तणुकीच्या आधारे त्याच्या फेब्रुरीमध्येच सुटका होण्याची शक्यता आहे. संजय दत्त 14 दिवसांसाठी फर्लोच्या रजेवर होता. त्यावेळी तो मुदतीच्या दोन दिवसांनंतर येरवडा जेलमध्ये परतला. पण ही चूक जाणूनबुजून झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. गृहमंत्रालायनं संजय दत्तची ही चूक माफ केली तर तो शिक्षा संपण्यापूर्वीच म्हणजे 25 फेब्रुवारीला जेलबाहेर येऊ शकतो, असं समजतंय. ऑक्टोबर 2016 मध्ये संजय दत्तची पाच वर्षांची शिक्षा संपते. पण चांगल्या वर्तवणुकीच्या आधारे शिक्षेत सूट मिळण्याची जेल कायद्यानुसार तरतूद आहे. त्याचा फायदा संजय दत्तला मिळू शकतो. जेलमध्ये असताना किंवा पॅरोल आणि फर्लोच्या रजेवर असताना संजय दत्तनं कोणताही गुन्हा किंवा गैरप्रकार केलेला नाही. ही त्याची जमेची बाजू ठरू शकते.

~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२४- भोकर; पाणी-टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहू - आ. अमिता चव्हाण 

२५- मातंग समाजावरील लाठीहल्याचा विविध भागातून निषेध 

२६- भीषण टंचाईवर मत करण्यासाठी खडकपूर्णा धरणाचे पाणी सिद्धेश्वर व येलदरी धरणात सोडणे आवश्यक - खा. अशोकराव चव्हाण 

२७- देगलूरमध्ये १ लाख १५ हजारांचा गुटखा जप्त 

२८- ईद-ए-मिलादुन्नबीच्या मिरवणुकीवर डी.जे. वर बंदी 

२९- अर्धापूर; 'भाऊराव'साठी शेवटच्या दिवसी १०७ अर्ज 

३०- सोळा वर्षाखालील गटाच्या टेनिस स्पर्धेचे महापौर स्वामी व सभापती तेहरा यांच्या हस्ते उद्घाटन 

३१- अद्याप शेतकऱ्याची कर्जमाफी नसल्याने छावा संघटनेतर्फे गोदावरी नदीत उड्या मारून जलसमाधी आंदोलन 
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
३२- मुखेड येथे नेहरु युवा केंद्रातर्फे आयोजीत वकृत्व स्पर्धेत पत्रकार रियाज शेख प्रथम

http://goo.gl/pKxA8e


~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
गजानन चीद्रवार, ऋषिकेश खंदारकर, ज्ञानोबा नित्तुरे, संपदा पारकर, राजशेखर सोनसळे, माधव शिंदे, प्रतिक देशमुख, पंकज राहेगावकर, दत्ता नागेश्वर, किरण मामीडवार, संतोष माने, अनिल कोटीवाले, शेख अश्तिक़
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जीवन जगण्याची कला ही सर्व कलांमध्ये श्रेष्ठ आहे
[जीवन तायडे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुप स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: