Sunday, 20 December 2015

नमस्कार लाईव्ह २०-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २०-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- स्पेनच्या मिरीया लालागुनाने पटकावला मिस वर्ल्डचा किताब 

                      स्पेनच्या मिरीया लालागुना रोयो हिनं मिस वर्ल्ड 2015चा किताब जिंकलाय. चीनच्या सान्या शहरात 65 वी मिस वर्ल्ड़ स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत रनर-अप ठरली मिस रशिया तर फर्स्ट रनर-अपचा मान मिस इंडोनेशियाला मिळालाय. किताब जिंकणारी मिरीया लालागुना ही 23 वर्षीय रोयो स्पॅनिश मॉडेल आहे. रोयो ही बार्सिलोनाची रहिवाशी असून इन्स्टाग्रामवर सक्रीय आहे. मिस इंडिया अदिती 65व्या क्रमांकावर राहिली. या स्पर्धेत जगभरातल्या 108 सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता..

२- श्रीलंकन नौदलाने ६ भारतीय मच्छीमारांना अटक 

३- अमेरिकेत एका महिलेने स्वत:च्या एक वर्षीय मुलीला मायक्रोवेव्हमध्ये घालून मारल्याप्रकरणी जन्मठेप 

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- अल्पवयीन गुन्हेगार सुधारगृहातून बाहेर आला तरी तो मुक्तपणे वावरु शकणार नाही, दोन वर्ष त्याच्यावर व्यवस्थापन समितीचे लक्ष असेल - सुब्रमण्यम स्वामी 

५- लिमोझिन नव्हे स्कॉर्पिओ, गुजरातीबाबूचा ‘कार’नामा 


                      नवीमुंबई आरटीओच्या वायू वेग पथकाने बनावट विदेशी कंपनीच्या गाड्या पकडल्या असून सुप्रसिद्ध आणि महागड्या लिमोझिन गाड्यांची ही भ्रष्ट नक्कल करण्यात आली होती. श्रीमंत लोकांच्या लग्नसमारंभात सदर गाड्या प्रतीतास तीस ते चाळीस हजार रुपयांना दिल्या जात होत्या. दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. कारच्या दुनियेतील सर्वात आकर्षक आणि महागडी, श्रीमंतीचे प्रतिक ठरलेली लिमोझिन गाडी बाळगणे हे कारवेड्यांचे स्वप्न असते मात्र या गाड्यांची लांबी खूप असल्याने भारतीय रस्त्यात ती चालवणे हे दिव्यच आहे. मात्र या गाडीची क्रेझ ओळखून काही महाभागांनी स्कार्पिओ गाडी मोडीफाय करून ही गाडी बनवली. तब्बल साडे सहा मीटर लांबीची ही गाडी मुळ स्कार्पिओ गाडी असून त्याच्यात चेसीची लांबी वाढवून हुबेहूब लिमोझिन गाडी प्रमाणे त्याला लुक देण्यात आले होते. अशा दोन गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या गाड्या श्रीमंत लोकांच्या लग्नात आणि इतर श्रीमंती झळकावणार्‍या समारंभात भाडे तत्वावर देणे सुरू केले. ही गाडी प्रती तास पंचेवीस ते चाळीस हजार मोजले जात होते. श्रीमंताच्या लग्नाची शान बनलेल्या या गाड्या दिल्ली मुंबई सुरत आदी ठिकाणच्या श्रीमंताची शान आता पर्यंत या बनल्या होत्या. या बाबत अधिक माहिती देताना आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले की, या गाड्यां बाबत आम्हाला माहिती मिळाली होती. मात्र ठिकाणा माहित नव्हता. या दोन्ही स्कॉर्पिओ गुजरात पासिंग असून आम्ही जप्त केल्या आहेत.

६- निर्भयाच्या बालगुन्हेगाराच्या सुटकेचा मार्ग मोकळा, महिला आय़ोगाच्या याचिकेवर सुनावणी, अटकेच्या पूर्वसंध्येलाच गुन्हेगारास अज्ञातस्थळी हलवलं 

                          निर्भयाच्या अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेविरोधात करण्यात आलेल्या याचिकेवर  सुनावणी होणार आहे. मात्र, आजच्या सुटकेबाबत फेरविचार करण्यास कोर्टानं नकार दिला आहे. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालिवाल यांनी ही माहिती दिली. त्यामुळे आज निर्भयाच्या अल्पवयीन गुन्हेगाराची सुटका होणार आहे. निर्भयाच्या अल्पवयीन गुन्हेगाराची आज सुटका होणार आहे. त्याविरोधात दिल्ली महिला आयोगाने रात्री उशिरा सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर सुप्रीम कोर्टात यासंदर्भातील खलबंत सुरु होती. सुप्रीम कोर्टाच्या रजिस्टारने यासंदर्भातली कागदपत्रं मागवली होती. त्यामुळे याकूब मेमन प्रकरणाप्रमाणे पुन्हा एकदा रात्री कोर्ट चालणार का, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, सुप्रीम कोर्टाने रात्रीच सुनावणी घेण्यास नकार दिला आणि ही सुनावणी सोमवारी घेणार असल्याचं स्पष्ट केलं.

७- कटिहार-अमृतसर आम्रपाली एक्सप्रेसचे सात डब्बे बिहार खागरीयाजवळ पासराह येथे रुळावरुन घसरले 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- 11 कोटींचे टॅब धूळ खात, उद्धव ठाकरेंची महत्त्वाकांक्षी योजना हँग 

                    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा विद्यार्थ्यांना टॅब उपलब्ध करुन देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सध्या धूळ खात पडला आहे. मुंबई महापालिकेने ही योजना राबवण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी 11 कोटी रुये खर्च केले, मात्र यात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मुलांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून मुंबई महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी टॅब आणले. वचननामा प्रसिद्ध झाला, घोषणा झाल्या पण अजूनही मुंबईतल्या अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हे टॅब पोहोचलेच नाहीत.

९- मध्य रेल्वेवर लवकरच 2 आसनी रांगांची लोकल, वाढत्या गर्दीवर तोडगा 

                          डब्यांच्या बैठकीच्या रचनेत फेरफार करून नेहमीच्या तीनऐवजी दोन आसनी गाडी चालविता येईल का, जेणेकरून अधिक प्रवासी उभ्याने का होईना पण प्रवास करू शकतील, असा विचार मांडण्यात आला. सध्या एकाच डब्यात असे बदल करून गाडी चालवण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार आहे. अशी अंतर्गत रचना असलेली गाडी तयार असून येत्या 22 डिसेंबरला मध्य रेल्वेवर धावेल, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली आहे.

१०- सेनेचे मंत्री कृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यात, दुष्काळी भागाची करणार पाहणी 

११- मोबाईलला हात लावला म्हणून साधूकडून चिमुरड्याची हत्या, औरंगाबादच्या दहेगावमधली घटना, संतप्त जमावानं साधूलाही संपवलं 
                       औरंगाबाद : मोबाईल फोनला हात लावल्याच्या रागातून एका साधुने 10 वर्षीय मुलाच्या डोक्यात कुऱ्हाड घातल्याने मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यानंतर संतप्त नागरिकांनी महाराजाला बेदम मारहाण केल्याने आरोपी साधूचाही मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादमधल्या दहेगावमध्ये हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महेश अरुण उगलेचा कुऱ्हाडीच्या वारामुळे मृत्यू झाला, तर विश्वास शरद सरस्वती असं मारहाणीत मृत्यू झालेल्या आरोपी साधूचं नाव आहे. याच मुलाच्या आजोबांनी आरोपी साधूला उत्तर प्रदेशातून दहेगावात आणलं होतं. मात्र त्यांनेच उपकारकर्त्याच्या 10 वर्षीय नातवाची हत्या केली आहे.

१२- शिवसेनेचा उत्तर महाराष्ट्रात दुष्काळ आढावा दौरा, आज जळगावमध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना मदतीचं वाटप 
                         मराठवड्यानंतर आता शिवसेनेचे मंत्री आजपासून दोन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळ दौर्‍यावर आहेत. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेड, कुर्‍हा, काकोडा, वडोदा या दुष्काळग्रस्त भागांची पाहणी शिवसेनेचे राज्यमंत्री दीपक केसरकर, उपनेत्या नीलम गोर्‍हे, जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केली. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या या दौर्‍यात सहभागी होणार आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागांतील शेतकर्‍यांना,आणि आत्महत्या ग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाना शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनीं भेटी दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते. शासनाच्या योजना शेतकर्‍यांपर्यंत पोहोचतात की नाही यांची माहिती शिंदेंनी घेतली. इगतपुरी गावातील काळुस्ते गावातील आदिवासी शेतकर्‍यांची जमीन 10 वर्षा पूर्वी भाम धरणासाठी संपादित केली असून,उर्वरित जमिनी संपादित करू नये अशी विंनती गावकर्‍यांनी शिंदे यांच्याकडे केली.

१३- परमार आत्महत्या: ठाण्यातील चारही नगरसेवकांचे जामीन अर्ज फेटाळले 
                    ठाण्यातील बिल्डर सूरज परमार आत्महत्येप्रकरणी ठाण्यातील चारही नगरसेवकांना सेशन कोर्टाने दणका दिला आहे. या चारही नगरसेवकांचे जामीन सेशन कोर्टाने फेटाळले आहेत. त्यामुळे या चारही आरोपी नगरसेवकांना आता जामिनासाठी मुंबई हायकोर्टात धाव घ्यावी लागणार आहे. विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण असे या चार नगरसेवकांची नावे आहेत. ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी आरोपी नगरसेवक विक्रांत चव्हाण, नजीब मुल्ला, हणमंत जगदाळे आणि सुधाकर चव्हाण यांची न्यायालयीन कोठडी सुरु आहे. 15 डिसेंबर रोजी सत्र न्यायालयानं चौघांना 28 डिसेंबपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र सेशन कोर्टानं हा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- पुणे : सेवासदन शाळेतील 40 विद्यार्थिनींना विषबाधा, मंगेशकर आणि गोरे रुग्णालयात विद्यार्थीनीवर उपचार सुरु 

                           पुणे : पुण्यातील सेवा सदन शाळेतील विद्यार्थिंनींना पहाटे जेवणातून विषबाधा झाली. 16 ते 18 वयोगटातील या विद्यर्थिनी आहेत. पुण्यातील लक्ष्मी रोडवरील सेवासदन शाळेतील ही घटना आहे. जेवणातून विषबाधा झाल्याची माहिती मिळते आहे. मात्र, अद्याप डॉक्टरांनी कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. जेवणानंतर पोटदुखीचा त्रास या मुलींन होऊ लागला. पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.  विषबाधा झालेल्या काही विद्यार्थिनींना पेरुगेट पोलीस चौकीजवळील गोरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे, तर काहींना मंगेशकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

 १५- निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषीच्या सुटके विरोधात इंडिया गेटवर प्रदर्शनाची परवानगी नाही. 

१६- व्यापम घोटाळयातील आरोपी मध्यप्रदेशातील माजी मंत्री लक्ष्मीकांत शर्मा, भोपाळ मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटले 

१७- भांडूपमध्ये गाद्यांच्या दुकानाला आग, अग्निशमन दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल 

~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- या 'लेडी लक'मुळे युवराज संघात परतला 

                       ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताच्या टी-२० संघात भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंगला स्थान देण्यात आलंय. तब्बल २१ महिन्यांनंतर युवराजने संघात पुनरागमन केलंय. अभिनेत्री हेजल कीज युवराजसाठी लकी ठरल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. या लेडी लकमुळेच युवराजला पुन्हा संघात पुनरागमन करता आलं अशी त्यांची भावना आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
१९- अर्धापूर; शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बबनराव बरसे यांच्यावर अयशस्वी प्राणघातक हल्ला 
२०- जिल्ह्यातून गुरांसाठी चारा-वैरण जिल्ह्याबाहेर नेण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी घातली बंदी 
२१- नवीन वर्षाच्या स्वागत कार्यक्रमास परवानगी सक्तीची 
२२- ग्रामरोहयोत नाव असूनही पगार नाही, महिलांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या 
२३- भाग्यनगर ठाण्याचा पोलीसनायक लाच स्वीकारतांना ;एसीबी'च्या जाळ्यात. हवालदार फरार 
२४- ठेवी ठेवू नका म्हणणाऱ्यांनी स्पष्टोक्ती द्यावी - आ. चिखलीकर 
~~~~~~~~~~~~~~~
२५- अतिप्रसंग करण्यापासून परावृत्त करण्यासाठी बनविण्यात आलेला व्हिडीओ
http://goo.gl/DXFDeH
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
डॉ. देवेंद्र पालीवाल, निक्की तेहरा, नवीन जाधव, राजू सोनवणे, सचिन नवले, कलीम झिया, किरण डोईजड, राहुल काळे, भवन उपाध्याय, मुबारक हुसेन, नंदानी देशपांडे, शिरीष देशमुख, विक्रम चव्हाण, संभाजी कणसे, संदेश कासलीवाल,प्रशांत तावडे,
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
महत्त्व ह्याला नाही की कायम कोन आपल्या सोबत आहे,
महत्त्व ह्याला आहे की गरज पडल्यावर कोन आपल्या सोबत आहे
[सुभाष, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुप स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: