Friday, 25 December 2015

नमस्कार लाईव्ह २५-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह २५-१२-२०१५ चे बातमीपत्र 

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- पंतप्रधान मोदी अफगाणिस्तानमध्ये, नव्या संसद भवनाचे करणार उद्घाटन 

                दोन दिवसांचा यशस्वी रशिया दौरा संपवून पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सकाळी अफगाणिस्तान दौ-यासाठी राजधानी काबूलमध्ये दाखल झाले आहेत. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी यांनी त्यांचे स्वागत केले. या एकदिवसीय दौ-या दरम्यान मोदींच्या हस्ते भारताच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या अफागाणिस्तानमधील नव्या संसद भवनाच्या इमारतीचे उदघाटन होणार असून त्यानंतर ते अफगाण संसदेच्या संयुक्त सभेला संबोधित करणार आहेत. 'काबूलमध्ये मित्रांसोबत भेट झाल्याने मी आनंदित आहे. राष्ट्रपती अश्रफ गनी, मुख्य कार्यकारी अधिकारी अब्दुल्ला अब्दुला व माजी राष्ट्रपती हमिद करझई यांची भेट थोड्याच वेळात भेट घेणार' असे ट्विट काबूलमध्ये दाखल झाल्यानंतर मोदींनी केले.

२- नायजेरियात गॅस टँकरला आग लागून १०० लोक मृत्यूमुखी 

३- भारत आणि रशिया यांच्यातील १६ व्या वार्षिक परिषदेत १६ वेगवेगळ्या करारांवर सह्या  

४- अमेरिकेतील दक्षिणेकडील भागात आलेल्या वादळामुळे सात जणांचा मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- शिळ्या कढीला ऊत कशाला ?,राम मंदिरावरुन सेनेनं भाजपला फटकारलं 

                    राम मंदिराच्या मुद्यावरुन शिवसेनेनं पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय. ‘सामना’च्या अग्रलेखातून पुन्हा एकदा शिवसेनेनं भाजपला राम मंदिराच्या मुद्द्यावरुन फटकारलंय. राम मंदिर उभारण्यासाठी पुन्हा शिळा आणण्यात आल्या असल्या तरीही गेल्या 20-25 वर्षांत आलेल्या शिळांचे काय झाले असा सवाल या अग्रलेखातून विचारण्यात आलाय. हजारोंची बलिदाने होऊनही भारत पाकिस्तानात खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा होते तर मग ज्या कारसेवकांच्या रक्ताने शरयु नदी लाल झाली त्या रक्ताचे मोल ठेवून खेळीमेळीच्या वातावरणात राममंदिराची निर्मिती का होऊ नये असा सवाल विचारण्यात आलाय. भाजप सरकार सत्तेत आल्यापासून ठेवीले ‘अनंते तैसेची रहावे’ अशी परिस्थिती जनतेवर आलीये तशीच परिस्थिती प्रभू रामचंद्रावरही आली आहे. जे न्यायालय गरिबांना झोपडी, बलात्कारीत स्त्रीला न्याय आणि जनतेला सुरक्षा देऊ शकले नाही ते प्रभू रामचंद्राला हक्काचे राम मंदिररूपी घर देईल का असा सवाल उपस्थित करण्यात आलाय. सणांच्या साजरीकरणापासून सगळ्याच गोष्टीत न्यायालय हस्तक्षेप करतंय मात्र आयोध्येबाबत निर्णय घेतला जात नाही. 2017 साली उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून त्यानुसार राममंदिर निर्माणाच्या चर्चेचा प्रसाद वाटण्याचे काम सुरू झाले अशीही टीका करण्यात आलीये.

६- लोकसभेतील 543 पैकी 15 खासदार अब्जाधीश, तर 443 कोट्यधीश, तरीही पगारवाढ हवी 

                  लोकसभेतील 543 खासदारांपैकी 443 खासदार कोट्यधीश आहेत. यातील 15 खासदार अब्जाधीश आहेत. या अब्जाधीश खासदारांच्या यादीत महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि पूनम महाजन या खासदारांचाही नंबर लागतो. संपत्तीचे आकडे पाहून डोळे दिपून जावेत, अशी ही आकडेवारी एडीआर (असोसिएशन डेमोक्रेटिक रिफॉर्म) या संस्थेच्या अहवालातून समोर आली आहे.
हे आहेत देशातील 15 अब्जाधीश खासदार:
जयदेव गल्ला, टीडीपी (गुंटूर, आंध्रप्रदेश) – 683 कोटीहून अधिक संपत्ती
कोंडा विश्वेश्वर रेड्डी, टीआरएस (चेवेल्ला, आंध्रप्रदेश) – 528 कोटींहून अधिक संपत्ती
गोकारजू गंगा राजू, भाजप (नरसापुरम, आंध्रप्रदेश) – 288 कोटींहून अधिक संपत्ती
बुट्टा रेनुका, वायएसआर काँग्रेस (करनूल, आंध्रप्रदेश) – 242 कोटींहून अधिक संपत्ती
कमलनाथ, काँग्रेस (छिंदवाडा, मध्यप्रदेश) – 206 कोटींहून अधिक संपत्ती
कंवर सिंह तंवर, भाजप (अमरोहा, उत्तरप्रदेश) -178 कोटींची संपत्ती
हेमा मालिनी देओल, भाजप (मथुरा, उत्तरप्रदेश) – 178 कोटींची संपत्ती
माला राज्यलक्ष्मी शाह, भाजप (टिहरी गढवाल, उत्तराखंड) – 166 कोटींची संपत्ती
पिनाकी मिश्रा, बीजेडी (पुरी, ओडिशा) – 137 कोटींची संपत्ती
शत्रुघ्न सिन्हा, भाजप (पटना साहिब, बिहार) – 131 कोटींची संपत्ती
श्रीनिवास केसिनेनी, टीडीपी (विजयवाडा, आंध्रप्रदेश) – 128 कोटींची संपत्ती
सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (बारामती, महाराष्ट्र) – 113 कोटींची संपत्ती
हरसिमरत कौर बादल, अकाली दल (बठिंडा, पंजाब) – 108 कोटींची संपत्ती
पूनम महाजन, भाजप (मुंबई उत्तर-मध्य, महाराष्ट्र) – 108 कोटींची संपत्ती
बी बी पाटील, टीआरएस (जाहिराबाद, आंध्रप्रदेश) – 102 कोटींची संपत्ती

७- केजरीवालांनी राजकारणात असभ्यपणा आणला, जेटलींचं टीकास्त्र 
                      असभ्यपणा हा भारतीय राजकारणाचा नवा मूलमंत्र झालाय का? नसावा, अशी मला आशा आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आणि बाहेर पंतप्रधान आणि इतरांबद्दल केलेल्या विधानांबद्दल काय? असा सवाल उपस्थित करत केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल केलाय. असभ्यपणा हा त्यांचा हक्क नाही. अशा भाषेमध्ये राजकीय चर्चा होऊ शकत नाही. राजकारणामध्ये सार्वजनिक चर्चेरम्यान विद्रूप भाषेच्या वापराला उच्चस्थान मिळू शकत नाही अशा शब्दात जेटलींनी आपल्या ब्लॉगमधून केजरीवालांवर टीका केलीये.

८- काश्मीर: 'इसिस'च्या प्रभावाखालील ९ अल्पवयीन मुलांची सुधारगृहात रवानगी 
                    कुख्यात दहशतवादी संघटना 'इसिस'च्या प्रभावाखाली असलेल्या जम्मू-काश्मीरमधील ९ अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार १५ ते १७ वयोगटातील या मुलांवर पेट्रोल बॉम्ब व दगड फेकल्याबद्दल तसेच राज्यात इसिसचे झेंडे फडकावल्याचा आरोप असून त्याच्याविरुद्ध 'बेकायदेशीर कृत्य' केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलांपैकी तिघे जण शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण घेण्यासाठी सीमा पार करून पाकिस्तामध्ये जाण्याची योजना आखत होते, अशी माहितीही हाती लागली आहे. १५ ते १७ वयोगटातील ही मुलं एका वॉट्सअॅप ग्रुपवरून एका उत्तर आफ्रिकी तरूणाच्या संपर्कात आली व प्रभावित झाली. 'अल-हयात' नावाच्या या व्हॉट्सअॅप ग्रुपचा नेता अबू बक्र या नावाने ओळखला जात असून या ग्रुपमध्ये अनेक विदेशी नागरिक सामील होते, अशी माहिती समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेली ही मुले काश्मीरमध्ये अनेकवेळा इसिसचा झेंडा फडकावताना दिसली होती. त्यानंतर राज्य सरकार व पोलिस सतर्क झाले. मात्र सुरक्षा यंत्रणांनी ही मुलं इसिसच्या प्रभावाखाली आल्याचे व त्यासंबंधीत अशा कोणत्याही व्यक्तीच्या संपर्कात असल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे.

९- राम मंदिर बनवण्यासाठी पाठिंबा दर्शवणारे वक्तव्य केल्यामुळे उत्तर प्रदेशमधील मंत्री ओमपाल नेहरा यांचे मंत्रीपद काढून घेण्यात आले 

                  समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांचे जवळचे व विश्वासू मानले जाणारे ओमपाल नेहरा हे अखिलेश यादव यांच्या सरकारमध्ये राज्य मंत्री असून बिजनौरमधील सभेत त्यांनी अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी मुस्लिमांनी सहकार्य करावे असे वक्तव्य केले. मंदिर उभारणी सुरू झाल्यास मुस्लिमांनी कर सेवा द्यायला हवी असे आवाहन त्यांनी केले होते. मात्र त्यांचे हे विधान त्यांच्यावरच उलटले असून अखिलेश सरकारने त्यांनाच मंत्रीमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- दत्त जयंतीला गाई आणि कुत्र्यांना पंचपक्वानांचं जेवण 

                  अकोल्यात दत्तजयंती निमित्त एक आगळेवेगळी महापंगत झाली आणि यात स्पेशल पाहुणे होते गाई आणि कुत्री. अकोल्यातील अमृत ग्यारल हे मागील दहा वर्षांपासून हा उपक्रम राबवत आहेत. या उपक्रमात दत्त जयंतीला अकोल्यातील तब्बल 50 गायी आणि 100 कुत्री जेवली. गाय आणि कुत्रा हे दोघेही दत्ताचे वाहन. त्यामुळेच दत्त जयंतीला यावेळी पंचपक्वानांचं जेवण देण्यात आलं. जिलेबी, बालूशाही, बुंदीचे लाडू, ब्रेड, दूध, बिस्कीट, डबलरोटी आणि गाईंसाठी कोवळा चारा, अगदी सगळं होतं इथे. दत्त जयंतीची पूर्वसंध्या आणि दत्त जयंतीला या महाभोजनचं आयोजन केलं जातं. मागील दहा वर्षांपासून ही परंपरा अविरत सुरु आहे. पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत हे अन्नछत्र सुरु होतं, ज्यात 50 गाई आणि 100 कुत्र्यांनी चमचमीत भोजनाचा आस्वाद घेतला.

११- राज्यभरात थंडीचा पारा अजून घसरणार 
                   राज्यभरात थंडीची लाट पसरली आहे पण गेल्या अनेक दशकानंतर मुंबईतही चांगलीच हुडहुडी भरलीये. आता मुंबईकर आणखी कुडकुडणार आहेत. कारण मुंबईतली तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.गेल्या दशकभरातल्या सगळ्यांत जास्त थंडीचा अनुभव मुंबईकर सध्या घेत आहे. पण पहिल्यांदाच वेधशाळेकडून थंडीचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवारी मुंबईतलं तापमान 11.4 अंश सेल्सिअस इतकं होतं. गुरुवारी रात्रीही मुंबईसह उत्तर कोकणासाठी वेधशाळेनं थंडीचा इशारा दिला होता. किनार्‍यावर असल्यानं समुद्राच्या असल्यानं समुद्राच्या दमट वार्‍याचा मुंबईच्या हवामानावर प्रभाव पडतो. त्यामुळे राज्यात थंडी पसरली तरी मुंबईत तुलनेनं उबदार वातावरण असतं. यावेळी मात्र अगदी महाबळेश्वरसारख्या ठिकाणी तापमान जास्त होतं.पण मुंबईत थंडी होती. यापूर्वी उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर उष्णतेचा इशारा देण्यात आला होता. पण पहिल्यांदाच थंडीचा इशारा देण्यात आलाय.

१२- राम मंदिर उभारणीसाठी मुस्लिमांना कर सेवेचे आवाहन करणा-या उत्तर प्रदेशच्या मंत्र्याची हकालपट्टी 

१३- अंबरनाथ- शिवसेना नगरसेवक रमेश गुंजाळ यांच्यावर अज्ञातांनी केला चाकू हल्ला, गंजाळ गंभीर जखमी, मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू 

 १४- राजधानी दिल्लीतील सरोजिनी नगर रेल्वे स्टेशनजवळ ट्रॅकवर तीन मृतदेह सापडल्याने उडाली खळबळ. मृतांमध्ये १ महिला व दोन पुरूषांचा समावेश. 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- पुण्यात टँकरनं 6 जणांना उडवलं, तिघांचा मृत्यू 

                 पुण्याच्या नारायणपूर याठिकाणी ब्रेक फेल झालेल्या टँकरनं 6 जणांना उडवलं आहे. त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतं आहे. मृतांमध्ये 2 चिमुकल्यांचा आणि एका प्रौढ व्यक्तीचा समावेश आहे. पाण्याच्या टँकरचा ब्रेक फ्रेल झाल्यानं या टँकरनं रस्त्याच्या कडेनं चालणाऱ्या 6 जणांना उडवलं. यामध्ये 2 चिमुकले जागीच ठार झाले. तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शिवाय अन्य 3 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मृतांमध्ये दादा दशरथ हणवते आणि त्यांचा मुलगा आवेश दादा हणवते तर आदिती प्रविण बडदे या चिमुकलीचाही या अपघातात मृत्यू झाला.

१६- मालवणीतील बेपत्ता झालेला तिसरा तरुणही घरी परतला 

                     मालवणीतला बेपत्ता झालेला तिसरा तरूणही परतला आहे. काही दिवसांपूर्वी मालवणीमधील तीन तरूण अचानक बेपत्ता झाले होते. हे तिन्ही तरुण इसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असून हे तिघही इसिसच्या भरतीमध्ये सामिल होण्यासाठी संपर्कात असल्याची संशय होता. मात्र हे तिन्ही तरूण मालवणीतील आपल्या घरी परतले आहेत. यातला एक तरूण वाजीद शेखला पुणे एटीएसने ताब्यात घेतलं होतं. यानंतर इतर दोनही तरुण आता स्वगृही परतले आहेत अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. वाजीदची चौकशी केली असता तो इसिसच्या संपर्कात नव्हता अशी माहिती समोर आली होती.

१७- नवी दिल्ली येथील न्यू फ्रेंड्स कॉलनीमधील घर कोसळून ४ जण जखमी झाले. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव 

१८- रत्नागिरी - एसटी विभागीय कार्यालयामध्ये आग लागून कॉम्प्युटर, तिकीट मशईन जळून खाक, लाखोंचं नुकसान 

१९- कोल्हापूर: निगडेवाडी येथे गॅस एजन्सीतील सिलिंडरच्या गॅस किटमध्ये स्फोट होऊन ९ जखमी झाले असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- आदेश बांदेकरांचा मृत्यूला चकवा, विषारी दुधी ज्यूसची बाधा 

                   शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे चित्रीकरणासाठी निघाले होते. याआधी त्यांनी दुधीचा रस घेतला. मात्र हा रस त्यांना चांगलाच बाधला. रस घेतल्यानंतर काही वेळातच त्यांना अस्वस्थ वाटू
लागले. त्यांना उलट्याही झाल्या. त्यांची प्रकृती अधिकच चिंताजनक झाल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आले. वेळीच उपचार झाल्याने आदेश यांच्यावरील धोका टळला.

२१- बिग बॉस मधून सलमाननं घेतली सुट्टी 

                  सलमाननं बिग बॉसमधून सुट्टी घेतल्यानं तो या विकेन्डला शुटींगवर नसेल... पण तरीही तो विकेन्डच्या भागात प्रेक्षकांना दिसेल. कारण, विकेन्डवर होणाऱ्या भागाची शुटींग नेहमी शनिवारी होतं. परंतु, या विकेन्डला एक दिवस अगोदरच सलमान या भागाचं शुटींग करणार आहे.

२२- प्रियांका चोप्राची फॅनला मारली चपराक

                    बोल्ड अँड ब्युटीफुल प्रियांका चोप्रा हिने ‘जय गंगाजल’ च्या ट्रेलर लाँचवेळी एक सिक्रेट शेअर केले. ती म्हणाली,‘अंजाना-अंजानी’ च्या सेटवर तिने एका फॅनला चपराक मारली होती. एकदा एक फॅन माझ्यासोबत विचित्र प्रकारचे वर्तन करत होता. मला माहीत नाही, पण तो खरंच फॅन होता की फक्त...मी अंजाना अंजानीसाठी शूटिंग करत होते. तो आला आणि त्याने माझे हात पकडले. मी त्यांच्यासोबत फोटो काढायला नाही म्हणत नाही, पण कोणी शरीराला हात लावला तर मात्र, मला फार राग येतो. त्याने पुन्हा हात धरून फोटो घेण्यास आग्रह केला. मी खूप घाबरले, त्याची कॉलर पकडली आणि त्याला एक चपराक मारली. मी नंतर खूप घाबरले आणि तिथून पळून गेले.’

~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- हदगाव; सिंचन विहिरीचे पंचनामे न करताच ७/१२ वर नोंदी; रोजगार हमी योजनेत भ्रष्टाचाराचा फंडा 
२३- पद्मशाली समाजाची होणार जनगणना 
२४- लोहा; मग्रारोहयोच्या कामात घोळ, लोहा पोलिसांत तक्रार दाखल 
२५- १८ वर्षापेक्षा कमी वय असलेल्या शिक्षिकेस नौकारीवर घेवून शासनाची फसवणूक केल्याप्रकारणी सुधाकरराव नाईक शाळेच्या माजी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल 
२६- अतिक्रमणामुळे शहरातील वाहतुकीस कमालीचा अडथळा; मनपाची अतिक्रमण हटाव मोहीम थंडीप्रमानेच गारठली 
२७- अबब!! गुलाबी थंडी...तापमानाचा पारा १० अंशाच्या खाली 
२८- शेत पिकलं नाही, निसर्ग कोपला, अन सरकारही झोपला; चित्रकार बाबुराव शिरफुले यांनी चित्रातून मांडल्या शेतकऱ्याच्या व्यथा 
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
तडजोड हे आयुष्याचे दुसरे नाव आहे
[सचिन सरोदे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
डी.जी. गुप्ता, संदीप सालकर, सुभाष पवार, हबीब रेहमान, राजेश यादव, दीपक गुप्ता, सागर जैन, विजय जाधव, विशाल भंडारी, शंकर शिंदे, रुस्तुमराव पाटील धुलगुंडे, विनोद वानखेडे, ओमप्रकाश हदगावकर, हनमंत जाधव, पवन तिवारी, प्रेमकुमार राचेवार, मयूर जीढे, दत्ता थोरात, किरण साळुंके, सर्योग गांधी, सज्जन पाटील, ओमकार सारडा, शैलेश सूर्यवंशी, प्रवीण बस्वेकर
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
प्रोटीन >> आपल्या शरीराला दररोज आपल्या वजनाइतके प्रोटीनचि आवशकता असते. ते आपल्या आहारातून परिपूर्ण भेटत नाही. त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
वेटगेनर >> मुले-मुली, पुरुष-महिला सर्वकाही आहार घेवून सुद्धा त्यांचे वजन वाढत नाही. ते काटकुळे व बारीक असतात. त्यांच्यासाठी उपयुक्त
फॅट बर्न >> चरबी कमी करणे व शरीराचे वजन कमी करणे. जे व्यक्ती आहार कमी घेवूनसुद्धा वजन कमी होत नाही त्यासाठी उपयुक्त [लवकर वजन कमी करते]
मल्टी व्हिटामिन्स >> आपल्या रोजचा आहारात परिपूर्ण व्हिटामिन्स, मिनरल्स, भेटत नाहीत त्याची कमतरता भरून काढण्यासाठी
एनर्जी ड्रिंक >> सर्व वयोगटातील खेळाडू, जिम करणारे, रिकव्हरी, स्ट्रेंग्थ, उर्जा वाढविण्यासाठी उपयुक्त. याचा वापर कोणीही करू शकते.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुप स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
 १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments: