मुखेड मध्ये उद्या मनुस्मृती दहन दिनानिमित्य जनजागरण रँली "
मुखेड :- रियाज शेख
अनिष्ट रुढी परंपरा व बंधनातुन मुक्त करण्यासाठी डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927 रोजी मनुस्मृतीचे दहन केले होते. याचे आजही समाजामध्ये प्रबोधन झाले नाही. याची जनजागृती करण्यासाठी मुखेड तालुक्यातील सेवा पुरोगामी संघटनाच्या वतीने आज दि.25 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता डाँ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासुन मनुस्मृती दहन दिनानिमित्य जनजागरण रँली चे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.
मानवी उन्नती साठी भारतीय संविधान एकमेव पर्याय असतानाही 21 व्या शतकात धर्ममार्तंडाच्या माध्यमातुन मनुस्मृती विचार डोक वर काढत आहे.व अश्या लोकांना विषमतावादी कायद्याचा हेतुत विसर पडल्यास पुन्हा तो माहित होणे ही काळाची गरज आहे. म्हणुन मनुस्मृती दिनानिमित्य पुरोगामी संघटनांच्या वतीने जनजागरण रँली चे आयोजन करण्यात आले आहे. या रँली मध्ये मोठ्या संख्येने युवक युवतींनी सहभागी होण्याचे आवाहण संयोजक काँ.बाआजी घोडके, राहुल लोहबंदे, काँ.बालाजी लंगेवाड, पंकज गायकवाड़, अँड मिलिंद कांबळे, अनिल सिरसे, रियाज शेख, संतोष पा इंगोले, विजय लोहबंदे, छोटु पाटील, पंकज गायकवाड़, सचिन पाटील, संदीप काळे, अतुल बनसोडे, नवनाथ भद्रे, आकाश कलेपवार, राजु आडगुलवार आदींनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
No comments:
Post a Comment