Sunday, 8 November 2015

दीपावली नूतन वर्षानिमित्त ग्रामस्वच्छतेचा संकल्प - सौ. वर्षाताई भोसीकर



दीपावली नूतन वर्षानिमित्त ग्रामस्वच्छतेचा संकल्प - सौ. वर्षाताई भोसीकर

कंधार (विठ्ठल कत्रे,ता.प्र.)------
दिपावलीनिमित्‍त आगामी काळात फुलवळ सकर्लमध्‍ये ग्राम स्‍वच्‍छता अभियानातुन गावे निर्मल करण्‍याचा संकल्‍प जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई संजय भोसीकर यांनी केला आहे.
       गावस्‍तरावर आजही ग्राम स्‍वच्‍छता अभियान प्रभावीपणे राबवण्‍याची आवश्‍यकता आहे. अस्‍वच्‍छतेमुळे होणा-या आजारांना रोखण्‍यासाठी गावस्‍तरावर कायम स्‍वरुपी स्‍वच्‍छता असणे आवश्‍यक आहे. ज्‍या कुटूंबाकडे शौचालय नाही, अशा कुटूंबांना शौचालय बांधण्‍यासाठी माणसिकता बदलण्‍यात येईल. पात्र लाभार्थ्‍यांना बारा हजार रुपयाचे अनुदानही देण्‍यात येणार आहे.
      उघडयावरील शौचविधीमुळे महिलांची मोठी कुंचबना होते, शिवाय गावात आजारांचा सामानाही करावा लागतो. त्‍यामुळ घर तेथे शौचालय ही संकल्‍प साकारण्‍यासाठी गावोगावी सभा घेऊन लोकसहभागातून गावे हागणदारीमुक्‍त करण्‍यात येतील. त्‍याचबरोबर गटारमुक्‍तीतून डासमुक्‍त गावे करण्‍यात येणार आहेत. घरातील सांडपाणी रस्‍त्‍यावर आल्‍यानंतर किंवा गटारात पाणी साचल्‍यामुळे डासांची पैदास होऊन मलेरिया, चिकुण गुणिया, डेंगी इत्‍यांदी आजार पसरुन ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्‍य धोक्‍यात येते. यामुळे फुलवळ सर्कलमध्‍ये गटारमुक्‍त अभियानाला गती देऊन गावे डासमुक्‍त करणार असल्‍याचे वर्षाताई भोसीकर म्‍हणाल्‍या.
      ग्राम स्‍वच्‍छतेसोबतच जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने राबविण्‍यात येणा-या विविध योजना प्रभावीपणे राबविल्‍या जाणार आहेत. यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुणवत्‍तावाढ अभियान, राजीव गांधी जीवनदायी आरोग्‍य अभियान, कुपोषणमुक्‍ती अभियान, दलितवस्‍ती सुधार अभियान, महिलांचे आरोग्‍य शिबीर, समाजकल्‍याण व महिला बालकल्‍याण विभागाच्‍या वतीने राबविण्‍यात येणा-या योजना, रस्‍ते, पाणी पुरवठा आ‍दी योजनाही प्रभावीपणे राबवून फुलवल सर्कलचा विकास करण्‍यात येणार असल्‍याचे जिल्‍हा परिषद सदस्‍या वर्षाताई संजय भोसीकर यांनी सांगीतले.

No comments: