Sunday, 8 November 2015

नमस्कार लाईव्ह ०८-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०८-११-२०१५ सकाळचे बातमीपत्र

१- नितीश कुमार बिहारचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री
२- पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून नीतिशकुमार यांचं अभिनंदन, फोनवरुन विजयाबद्दल शुभेच्छा
३- आत्ता महाराष्ट्रात निवडणुका घेतल्या तर बिहारचाच निकाल पाहायला मिळेल -शिवसेनेनेचे खासदार संजय राऊत
४- बिहारला बिमारू म्हणणाऱ्यांना जनतेचे उत्तर - राबडीदेवी
५- भारताचा शेजारी म्यानमारमध्ये आज ऐतिहासिक मतदान, तब्बल 25 वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक, नोबेल पुरस्कार विजेत्या आंग सान सू की रिंगणात
६- विजेंदरसिंगचा व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सलग दुसरा विजय; डीन गिलेनला पहिल्याच राऊंडमध्ये नॉकआऊट
७- कोकण रेल्वेच्या बहुचर्चित दुपदरीकरणाला आजपासून सुरुवात, रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंच्या हस्ते होणार शुभारंभ, पहिल्या टप्प्यात 150 किलोमीटर रेल्वेमार्गाचं दुपदरीकरण
८- दि. १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान अनुसूचित जाती कल्याण समिती तीन दिवसीय नांदेड दौऱ्यावर
९- ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवाच्या कारणावरून कंधार तालुक्यातील किरोडा येथे चिमुकलीचा खून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
१०- आ. हेमंत पाटील यांची नांदेडच्या रसिकांना दिवाळीची मेजवानी, 'दिवाळी पडावा पहाट' कार्यक्रमात दि. १२ रोजी दिग्गज कलावंताची हजेरी
११- नांदेड मनपा कर्मचाऱ्यांची दणादण दिवाळी, मासिक वेतनासह १० हजारांचे 'फेस्टिव्हल'
~~~~~~~~~~~~~~
सुविचार
प्रेम असे करा की कधी मिटू नये, कीर्ती अशी मिळावा की कधी विसरू नये, निर्णय असे घ्या की कधी चुकीचे ठरू नये, असे वागा की कोणालाही त्रास होवू नये, जीवन असे जगा की

व्यर्थ जगल्यासारखे वाटू नये
(माधव पवार, नमस्कार लाईव्ह वाचक)
~~~~~~~~~~~~~~
आपल्या आप्त स्वकीयांना दीपावली निमित्त शुभेच्छा पाठवा फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या मदतीने....
भारतात आणि जगभरात घरपोच डिलेव्हरीची सेवा ....
तुमच्यापासून तुमच्या प्रियजणांपर्यंत......
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही......
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल
पत्ता:-
फ्लॉवर एन फ्लॉवर्स
शॉप नं जि-२, सेंटर पॉइंट, शिवाजी नगर, नांदेड
संपर्क- 9423785456, 7350625656

No comments: