नेट परिक्षा केंद्र नांदेड करण्याची मागणी
(यादव लोकडे सगरोळीकर, प्रतिनिधी )
सगरोळी : प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेल्या राष्ट्रीय पात्रता परिक्षेचे ( नेट ) नांदेड येथे करण्याची मागणी विशाल इंदूरकर व इतरांनी राज्याचे उच्च शिक्षणमंत्री आणि केंद्रीय मनुष्यबळ मंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे
विशाल इंदूरकर व अन्य इतर पदव्युत्तर परिक्षा उत्तीर्ण असलेल्या युवकांनी नुकतेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती ईराणी आणि राज्याचे उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना एक लेखी निवेदन पाठाविले आहे त्या निवेदनानुसार शिक्षण क्षेत्रात पदार्पण करून महाविद्यालयीन पातळीवर अध्यापन करण्यासाठी कला , वाणिज्य , विज्ञान आदी शाखांमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेऊन राज्य पात्रता परिक्षा ( सेट ) किंवा राष्ट्रीय पात्रता परिक्षा ( नेट ) उत्तीर्ण करावी लागते
राष्ट्रीय पात्रता परिक्षा एका शैक्षणिक वर्षात जून व डिसेंबर या महिन्यात एकूण दोन वेळा घेतली जाते या परिक्षेसाठी शेकडो युवक हजर रहात असतात महाराष्ट्रातील बहुतांश विद्यापीठाच्या शहरात राष्ट्रीय पात्रता परिक्षेचे ( नेट ) परिक्षा केंद्र आहेत
नांदेड येथे सन 1994 पासून स्वारातीम विद्यापीठ कार्यरत आहे , राज्यात 1992 पासूनच नेट परिक्षा अनिवार्य करण्यात आली आहे आज 21 वर्ष पुर्ण झाली तरीही आजपर्यंत नांदेड येथे नेट परिक्षेचे केंद्र नाही
नांदेड येथे नेट परिक्षा केंद्र नसल्यामुळे नांदेड , परभणी , हिंगोली व लातूर आदी ठिकाणच्या शेकडो विद्यार्थ्यांना औरंगाबाद किंवा हैद्राबाद येथे परिक्षेसाठी जावे लागत आहे , तुलनेने औरंगाबाद जवळचे व सोयीचे वाटत असले तरी नांदेड ते औरंगाबाद हे अंतर 250 किमी आहे या परिक्षा केंद्रावर परिक्षा देण्यासाठी युवकांना घरून एक दिवस आगोदर निघावे लागते परात येण्यासाठी हायकोर्ट एक्सप्रेसने यावे लागते , संपुर्ण प्रवास उभे राहून करावे लागते , रात्री उशिरा गावी जाण्यास त्रास सहन करावा लागतो , बेरोजगारीत दिवस काढणा-या युवकांना नांदेड येथे परिक्षा केंद्र नसल्यामुळे आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे , तरी नेट परिक्षेचे केंद्र नांदेड येथे लवकरात लवकर सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment