नमस्कार लाईव्ह १४-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- पॅरिसमध्ये शाळेत घुसून शिक्षकावर चाकू हल्ला, हल्लेखोर ‘इसिस’चा सदस्य असल्याचा संशय
फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील एका शाळेत घुसून अज्ञाताने धुमाकूळ घालून शिक्षकावर हल्ला केल्याची घटना घडली. धक्कादायक बाब म्हणजे, हल्लेखोर ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पॅरिसच्या उत्तरेकडील एका नर्सरी शाळेत घुसून या हल्लेखोराने शिक्षकावर चाकूहल्ला केला. यात शिक्षक गंभीर जखमी झाला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळावर दाखल झाले पण तोपर्यंत हल्लेखोराने तेथून पोबारा केला होता. हल्लेखोराने हल्ला करताना ‘इसिस’च्या समर्थनार्थ घोषणाबाजी केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे
२- ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळाः आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी इंटरपोलने इटलीच्या २ नागरिकांविरोधात काढली नोटीस
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- आरएसएसच्या लोकांनी मला मंदिरात जाण्यापासून रोखलं : राहुल गांधी
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आसाम दौऱ्यात बरपेटा मंदिरात प्रवेश करण्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनी रोखल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे. राहुल म्हणाले की, “मला मंदिरात जायचं होतं. पण आरएसएसच्या काही लोकांनी मला आत जाण्यापासून रोखलं. महिलांना समोर करुन मला रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला.”
सलमान खान काही महिन्यांपासून रोमानियाची लूलिया वान्तुर हिच्यासोबत रिलेशनशिप आहे. पण हिट अँड रन प्रकरणी खटला सुरू असल्याने तो लग्नाचा कोणताही निर्णय घेत नव्हता. डीएनए या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, सलमानचे आई-वडील लग्नासाठी सलमानकडे आग्रह करायचे पण सलमान त्यांना म्हणायचा की, 'जर कोर्टाचा निर्णय माझ्या विरोधात गेला तर मी पत्नीला काय सांगू?, ती तिच्या मुलांना काय सांगेल की तुमचे वडील तुरूगांत आहेत.?'
४- केरळच्या राजकारणात भाजपाला इतर पक्षाकडून अस्पृश्यतेसारखी वागणूक - पंतप्रधान मोदी
५- वन रँक वन पेन्शनच्या (OROP) समस्यांवर तोडगा काढण्यासाठी न्या. रेड्डींच्या अध्यक्षतेखाली एक सदस्य आयोग स्थापन
६- दिल्ली गँगरेप : अल्पवयीन दोषीच्या सुटकेचा निर्णय हायकोर्टाने सुरक्षित ठेवला
दिल्लीतील निर्भया बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन आरोपीच्या सुटकेविरोधातील याचिकेवर निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने सुरक्षित ठेवला आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ही याचिका दाखल केली होती. 16 डिसेंबर 2012 रोजी राजधानी दिल्लीत बलात्कार आणि हत्याकांड घडलं होतं. या गुन्ह्यातील अल्पवयीन दोषी आता सज्ञान झाला आहे. त्याची याच महिन्यात सुटका होणार होती. महत्त्वाचं म्हणजे याच गुन्हेगाराने निर्भयावर अमानुष अत्याचार केले होते. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी त्याच्या सुटकेवर बंदी घालावी अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरील मागच्या सुनावणीत न्यायालयाने केंद्र सरकार, दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली केली होती. निर्भया बलात्कार आणि हत्याकांडाचा दोषी सुधारला असल्याची खात्री पटल्याशिवाय त्याची सुटका करु नये असं नोटीसमध्ये म्हटलं होतं. अल्पवयीन दोषीच्या सुटकेबाबत काही महत्त्वाच्या बाबी गहाळ असल्याचं संजय जैन यांनी केंद्र सरकारच्या वतीने हायकोर्टात सांगितलं. शिवाय जुवेनाईल जस्टिस बोर्डाने अल्पवयीन आरोपीच्या सुटकेची तारीख 20 डिसेंबर निश्चित केली होती. पण ती वाढवावी, असंही जैन यांनी हायकोर्टात सांगितलं.
७- आग्रा-लखनऊ एक्स्प्रेस वेसाठी २८१ झाडे तोडण्यास सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली असून भरपाई म्हणून आपण २८०० झाडे लावू असे आश्वासन उत्तर प्रदेश सरकारने न्यायालयाला दिले
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- स्मार्ट सिटी’तून महापालिकांचे अधिकार कमी करण्याचा इरादा नाही – मुख्यमंत्री
९- अजित पवारांची स्मार्ट सिटी योजनेवर टीका
१०- पुणे : स्मार्ट सिटी प्रस्तावाला मनसेचा पाठिंबा, मुख्यमंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतर राज ठाकरेंचा निर्णय
राज ठाकरे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना फोन केला. सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन स्मार्ट सिटीच्या प्रस्तावातील त्रुटी दूर कराव्यात अशी विनंती केली. फडणवीस यांनी राज ठाकरेंची ही मागणी मान्य केली. त्यानंतर मनसेने या प्रस्तावाला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं. ‘स्मार्ट सिटी ही अत्यंत फसवी योजना असून हा केंद्राचा राजकीय खेळ आहे,’ अशी टीका राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर काही दिवसांपूर्वीच केली होती. ‘महापालिकेने केलेल्या कामांचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न आता केंद्र सरकार करु पाहत आहे आणि त्यामुळेच मनसेचा या योजनेला विरोध आहे,’ असं राज ठाकरे म्हणाले होते.
११- कोल्हापूर : कॉम्रेड गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आरोपी समीर गायकवाडविरोधात 392 पानांचं आरोपपत्र दाखल, 77 साक्षीदार पोलिसांनी तपासले
१२- २६/११ हल्ल्यात माझा सहभाग होता हे सिद्ध करून दाखवाच- हाफिज सईद
जगाच्या अंतापर्यंत ते तुम्हाला जमणार नाही, असं आव्हान पाकिस्तानातील दहशतवादी जमात-उद-दवा संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने भारताला दिले आहे. ‘जमात-उद-दवा’ संघटनेच्या ट्विटर अकाऊंटवर हाफिज सईदच्या भाषणाचा एक व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे. पाकिस्तान सरकारने सुषमा स्वराज यांना काही उत्तर दिलेलं नाही. पण मी भारताला उत्तर देतो. मुंबई हल्ल्याला सात वर्षे होऊनही तुम्ही काहीही सिद्ध करू शकलेला नाहीत. यापुढेही काहीच होणार नाही. जगाचा अंत होईपर्यंत भारत ते सिद्ध करून दाखवू शकत नाही, असे हाफिज सईद भाषणात म्हणाला आहे.
१३- राज्य सरकारच्या अन्न सुरक्षा विधेयकाविरोधात श्रीनगरमध्ये हिंसक आंदोलन
१४- शिवसेनेचा नागपूरमध्ये विराट मोर्चा, शिवसेनेचे माजी आमदार तसेच शेतकरी संघटनेचे नेते मोर्चात सहभागी
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- अकोला : बाबू जगजीवनराम विद्यालयात अकारावीत शिकणाऱ्या दोन मुलांमध्ये हाणामारी, शुभम ढगे नावाच्या विद्यार्थ्याचा हाणामारीत मृत्यू
१६- कात्रजमध्ये घरात घुसून महिलेवर गोळीबार
पुण्याच्या कात्रजमधील गोकूळनगर परिसरात भरदिवसा महिलेवर गोळीबार करण्यात आला आहे. अज्ञाताने घरात घुसून महिलेवर गोळीबार केला. या घटनेत तिच्या दंडाला गोळी लागली असून तिची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 25 वर्षीय राजश्री बेगडे हिचा पती आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेला असताना, अज्ञात व्यक्ती घरात घुसला आणि महिलेवर गोळी झाडली. मात्र गोळीबार करण्याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु असून आरोपी फरार आहे.
१७- हेमा उपाध्याय हत्येप्रकरणी वाराणसीतून २ संशयित ताब्यात
प्रख्यात छायाचित्रकार व शिल्पकार हेमा उपाध्याय व त्यांचे वकील अॅड. हरिश भंबानी या दोघांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या मदतीने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. हेमा उपाध्याय व हरिश भंबानी या दोघांचे मृतदेह शनिवारी सायंकाळी कांदिवतील डहाणूकर वाडीतील नाल्यात दोन बॉक्समध्ये आढळले होते. या हत्याप्रकरणातील आरोपी मारेकरी उत्तर प्रदेशात लपून बसल्याचा पोलिसांना संशय होता. त्यामुळे मुंबई पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशला पाठविण्यात आले होते. त्यांनी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सच्या अधिका-यांच्या सहाय्याने कारवाई करत दोन जणांना ताब्यात घेतले असून एकाचे नाव शिवकुमार उर्फ साधू राजभर असल्याचे समजते.
१८- रस्ते दुरुस्ती लवकरात लवकर करावी यासाठी शिवसेनेकडून पालघरमध्ये रास्तारोको
१९- अमरावतीमध्ये मोर्शी पोलिस स्टेशनचे एपीआय संदेश पालांडे वत्यांच्या रायटरला पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी केली अटक, 'लाचलुचपत प्रतीबंधक विभगाची कारवाई
२०- औरंगाबादमध्ये खुनाच्या गुन्ह्यामध्ये मागच्या सहावर्षांपासून फरार असलेला आरोपी धरसिंह जाधव अटकेत
२१- सिमल्यामध्ये आंदोलनाच्यावेळी प्रतिमादहन करताना काँग्रेस कार्यकर्ता गंभीररित्या भाजला
२२- ठाण्यातील घोडबंदर रोड येथील कासारवडवली परिसरात एसटी महामंडळाच्या बसला लागली आग
२३- मुंबईत वाकोल्यात सफाई कामगाराचा शॉक लागून मृत्यू
२४- नरसी लोहगाव दरम्यान मोटारसायकलला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने महिलेचा मृत्यू
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२५- सलमान खान अडकणार विवाह बंधनात
२६- पुणे: अभिनेते दिलीप प्रभावळकर यांना यंदाचा पु.ल.स्मृती सन्मान, तर गायक स्वप्नील बांदोडकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांना तरुणाई
२७- शाहरुखचा 'दिलवाले' पाहू नका, मनसेचं आवाहन
“शाहरुखचा ‘दिलवाले’ न पाहता, त्याऐवजी तो पैसा गोळा करून अभिनेता मकरंद अनासपुरे आणि नाना पाटेकर यांच्या ‘नाम’ या संस्थेला द्या”, असं आवाहनही मनसेने केलं आहे. “शाहरुखने चेन्नईतील पूरग्रस्तांना 1 कोटी रुपयांची मदत केली. मात्र महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकरी त्याला दिसला नाही”, असा आरोप मनसेने केला आहे. त्यामुळेच शाहरुखच्या ‘दिलवाले’ सिनेमावर बहिष्कार टाकण्याचं आवाहन, मनसेने केलं आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२८- दिनांक 15.12.2015 , रोजी सचखंड एक्स्प्रेस नांदेड येथून दुपारी १३:०० वाजता सुटणार
http://goo.gl/y1r3uG
~~~~~~~~~~~~~~~
२९- Whats Upवरील मजेशीर व्हायरल व्हिडीओ
http://goo.gl/a94eF3
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
कष्ठ हि अशी प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते
[डॉ. वर्षा चौरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
सध्याच्या घडामोडी पाहता पाकिस्तान दाउदला भारताच्या ताब्यात देईल का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
वाढदिवसाचे चॉकलेट, 'आय.लव्ह.यु.' चॉकलेट, 'Thanks' चॉकलेट, 'Congratulation' चॉकलेट, 'Lips' Shapeचॉकलेट, 'Hurt' Shapeचॉकलेट.
खाण्यासाठीचे पोटलीचे चॉकलेट, गिफ्टसाठी पॅकिंगचे चॉकलेट...
ढिंचाक चॉकलेट होममेड असून शुद्ध शाकाहारी आहेत.
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment