"मा.अप्पर जिल्हाधिकारी नांदेड.यांच्या अघ्येक्षते खाली मनरेगा,पाणी टंचाई, चारा टंचाई,जलयुक्त शिवार अभियान व अन्न सुरक्षा या विगषयावरील आढावा बैठक संपन्न "
मुखेड :-शेख बबलु मुल्ला प्रतिनिधी
मुखेड तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, कृषी सहायक व तलाठी यांची दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मग्रारोहयो, पाणी टंचाई, चारा टंचाई, जलयुकत शिवार अभियान व अन्न सुरक्षा विषयावर आढावा बैठक चौधरी मंगल कार्यालयात दि. 16 डिसेंबर रोजी मा अप्पर जिल्हाधिकारी नांदेड श्री कांबळे यांनी घेतली.
तालुक्यात मागील अनेक दिवसात मग्रारोहयो ची कामे बंद असून अशा परिस्थितीत मजुरांना काम देणे आवश्यक आहे. तरी ग्रामसेवक व कृषी सहायक यांनी मागे वळून न पाहता सकारात्मक प्रतिसाद देत पारदर्शक पद्धतीने कामे सुरू करावेत. तसेच जलसंधारण होण्यास उपयुक्त ठरतील अशी शेततळे, विहीर पुनर्भरण, बांध-बंदिस्ती, वृक्षलागवड, गायरान जमीनीवर चर खोदणे, सिंचन विहिरी व शोषखड्डे ही कामे निवडून शेल्फ तयार ठेवावेत व कामाची मागणी आल्यास तातडीने कामे सुरू करण्यात यावीत असे निर्देश दिले. तालुक्याचा विकास करण्याची क्षमता याच योजनेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पाणी टंचाई वर तातडीने नियोजित योजना पूर्ण करून घ्यावी. शासकीय स्ञोताला पाणी नसेल तर शक्यतो खाजगी विहीर किंवा बोअर अधिग्रहण करावीत व पर्याय नसल्यास टॅकर सुरू करावे. शासकीय उपाययोजना केलेल्या गावात नियमित पाणीपुरवठा होत असल्याची ग्रामसेवक यांनी खाञी करावी. तसेच भविष्यात गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलावातून शेतीला पाणी उपसा होणार नाही तसेच गावातील पाणी पुरवठा योजनेपासून एक किमी अंतरावर देखील शेतीसाठीपाणी पुरवठा होणार नाही याची दक्षता सर्वांनी मिळून घ्यावी अशा सूचना दिल्या.रेशन दुकानदार कडून लोकांना धान्य व केरोसिन नियमित पणे मिळेल यासाठी तलाठी व मंडळ अधिकारी यांनी वाटप करतेवेळी उपस्थित राहावे अशा सूचना दिल्या.
दुष्काळी परिस्थिती वर तातडीने उपाययोजना करण्यासाठी महसूल, पंचायत समिती व कृषी विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी मुख्यालयात राहून परस्परांशी योग्य समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी मा सहा जिल्हाधिकारी देगलूर श्री रवींद्र बिनवडे, तहसीलदार श्री सुरेश घोळवे, गटविकास अधिकारी श्री. घोडके, तालुका कृषी अधिकारी श्री मंतलवाड, उपअभियंता पाणीपुरवठा श्री जोगदंड, उपअभियंता जिपलपा श्री भालेराव, पशुसंवर्धन अधिकारी श्री देवडे, वनपरिक्षेञ अधिकारी श्री गिते, नायब तहसीलदार श्री पांडे, श्री गोविंदवार, सहा कार्यक्रम अधिकारी श्री रावळकर व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment