नमस्कार लाईव्ह १८-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- बॉम्बच्या जोकवरुन अमेरिकेत १२ वर्षाच्या शीख मुलाला धाडले सुधारगृहात
न्यूयॉर्क - वर्गमित्रासोबत थट्टामस्करी करताना बॅगेमध्ये बॉम्ब ठेवला आहे असे गंमतीने म्हटले म्हणून अमेरिकेत एका १२ वर्षाच्या शीख मुलाला तब्बल तीन दिवस बालसुधारगृहात ठेवण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अरमान सिंग सराई असे या मुलाचे नाव आहे. वर्गामध्ये मित्रासोबत थट्टामस्करी करत असताना अरमान गमतीने त्याच्या मित्राला आपल्या बॅगेमध्ये बॉम्ब असल्याचे म्हणाला. अरमानचा मित्र शिक्षकाकडे गेला आणि अरमानच्या बॅगेत बॉम्ब असल्याचे त्याने सांगितले. शिक्षकाने शाळेच्या मुख्याध्यापकांना याची माहिती दिली. मुख्याध्यापकांनी कोणताही मागचा पुढचा विचार न करता सरळ पोलिसांना बोलावले. पोलीसांनी संपूर्ण वर्ग रिकामा केला आणि बॅगांची झडती घेतली असता, बाँब आढळला नाही. रमान सिंगने पोलीसांना सांगितले की, बाँब असल्याचे मी म्हणालो, परंतु ती मस्करी आहे, बाँब वगैरे काही नाही असंही सांगितलं. पोलीस अधिका-यांनी अशा प्रकारची थट्टा केली तर त्रास हा होणारच अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परिणामी अरमानला तीन दिवस बालसुधारगृहात रहावे लागले.
२- दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकेत मुस्लीमांविरोधातील हल्ल्यात ३०० टक्के वाढ
वॉशिंग्टन, दि. १८ - पॅरीस व कॅलिफोर्निया येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर अमेरिकी मुस्लीम व मशिदी यांच्याविरोधातल्या हेट क्राइम्समध्ये ३०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे वृत्त न्यू यॉर्क टाइम्सने दिले आहे. हिजाब घालणा-या विद्यार्थिनींवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच मशिदींवरही हल्ले करण्यात आले आहेत. मुस्लीम व्यक्ती मालक असलेल्या उद्योगांनाही धमक्या देण्यात आल्याचे एका अहवालात नमूद करण्यात आले आहे. राजकीय नेत्यांनी इस्लामविरोधी वक्तव्ये केल्याचेही प्रकार घडले असून त्यानंतर सदर अभ्यासपूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. दहशतवादी हल्ले आणि मुस्लीमविरोधी द्वेषपूर्ण भाषणांमुळे भयग्रस्त अमेरिकी तरूण आपला राग मुस्लीमांवर हल्ले करून व्यक्त करत असल्याचे क्रिमिनोलॉजिस्ट ब्रायन लेविन यांनी म्हटले आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- निर्भयावर क्रूर अत्याचार करणारा (अल्पवयीन) दोषी सुटणारच, दोषीच्या सुटकेवर बंदी घालण्यास दिल्ली उच्च न्यायालयाचा नकार
संपूर्ण देशाला हादरवून सोडणा-या निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन दोषीच्या बालसुधारगृहातून सुटकेला स्थगिती देण्यास शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे येत्या २० डिसेंबरला या दोषीची सुधारगृहातून सुटका होऊ शकते. आम्हाला मान्य आहे हा, गंभीर विषय आहे. पण कायद्यानुसार गुन्हेगाराला आणखी सुधारगृहात ठेवता येणार नाही असे न्यायालयाने निकाल देताना सांगितले. या अल्पवयीन दोषीच्या पुनर्वसनासाठी ज्युवेनाईल जस्टीस बोर्डाने आरोपीशी, त्याच्या पालकाशी आणि केंद्र सरकारशी चर्चा करावी असेही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.
४- एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, परिवहन मंत्र्यांसोबतच्या बैठकीत निर्णय
राज्यातील प्रवाशांना दीड दिवस वेठीला धरल्यानंतर इंटकच्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे. इंटक एसटी कर्मचारी संघटनेच्या जयप्रकाश छाजेड यांनी कर्माचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलं आहे. 25 टक्के पगारवाढीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासोबतच्या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाकर रावते थोड्याच वेळात विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात याबाबत माहिती देण्याची शक्यता आहे. पगारवाढीसंदर्भात परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. जानेवारीमध्ये नवा करार होईल त्यावेळी या मागण्याचा विचार होईल, असं आश्वासन दिवाकर रावतेंनी दिल्यामुळे संप मागे घेतल्याची माहिती जयप्रकाश छाजेड यांनी दिली.
५- भारत गुप्तपणे राबवतोय आण्विक प्रकल्प
वेळ पडल्यास जगातील कोणत्याही बलाढ्य राष्ट्राला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत गुप्तपणे आण्विक प्रकल्प राबवत असल्याचं समोर आलं आहे. 'फॉरिन पॉलिसी' या विषयाला वाहिलेल्या अमेरिकेतील एका मासिकानं प्रथमच हा खुलासा केला असून यामुळं पाकिस्तान, चीनसह जगभरात खळबळ उडाली आहे. मासिकानं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील छल्लाकेरे येथे भारत आण्विक शहर उभारत असून २०१२ मध्ये या प्रकल्पाला सुरुवात झाली आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून शत्रू राष्ट्रांना उद्ध्वस्त करू शकणाऱ्या अनेक अण्वस्त्रांची निर्मिती केली जात आहे. त्याचबरोबर जुनी शस्त्रास्त्रं अद्ययावत केली जात आहेत. २०१७मध्ये हा प्रकल्प पूर्ण होणार असून भारतीय उपखंडातील आण्विक हालचालींचे व शस्त्रास्त्रांचे हे सर्वात मोठे केंद्र ठरणार आहे. स्थानिक गावकऱ्यांना आजपर्यंत याचा थांगपत्ता नव्हता, असा दावा अमेरिकेच्या मासिकानं केला आहे.
६- गो हत्या बंदी करणारे ढोंगी! - ओम पुरी
'दादरीत घडलेली घटना भारतासाठी लज्जास्पद होती,' असं सांगतानाच, 'आमचा देश मांसाची निर्यात करतो. या निर्यातीतून लाखो डॉलर कमावतो. तरीही काही लोकांना देशात गो हत्या बंदी हवी आहे. हे सगळे लोक ढोंगी आहेत,' अशी घणाघाती टीका सुप्रसिद्ध अभिनेते ओम पुरी यांनी पाकिस्तानात जाऊन केली आहे. पाकिस्तानच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर असलेले ओम पुरी लाहोरच्या अलहामरा आर्ट सेंटरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. दादरी हत्या, गो-हत्या बंदी तसंच भारतातील असहिष्णुतेच्या चर्चेवरून पाकिस्तानी पत्रकारांनी ओम पुरी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर बोलताना, लोकांना चिथावण्यासाठी अशा मुद्द्यांना हवा देणं चुकीचं असल्याचं पुरी म्हणाले. 'भारतात ८० ते ९० टक्के लोक सेक्युलर आहेत. ते पाकिस्तानी नागरिकांचा द्वेष करत नाहीत. भारतात सगळे लोक हिंसक नाहीत. मोजकेच लोक संभ्रमित असे आहेत ज्यांना दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध नको आहेत. पण भारत, पाकच्या सरकारनं त्यांची चिंता करायला नको,' असं पुरी म्हणाले. 'गुलाम अली यांचा कार्यक्रम रद्द झाल्याची मला खंत वाटते. तसं व्हायला नको होतं, असं सांगतानाच, 'दोन्ही देशांनी क्रिकेटवरून राजकारण करू नये,' अशी अपेक्षाही पुरी यांनी व्यक्त केली.
७- रेल्वे नीर प्रकरणी व सरकारी तिजोरीला नुकसान केल्याबद्दल दोन रेल्वे अधिका-यांवर सीबीआयने दाखल केले आरोपपत्र
८- अल्पवयीन दोषीच्या सुटकेच्या निर्णयानंतर निर्भयाच्या आईच्या डोळयात अश्रू तरळले, न्याय मिळाला नसल्याची निर्भयाच्या आईची प्रतिक्रिया
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- विरोधकांच्या प्रचंड गदारोळानंतर राज्यसभा २१ डिसेंबरपर्यंत स्थगित
१०- शनिच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेश द्या, महिला आमदारांची मागणी
शनिशिंगणापुरमध्ये चौथऱ्यावर महिलांना प्रवेश मिळावा, या मागणीसाठी महिला आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज आंदोलन केलं. काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड आणि इतर महिला आमदारांनी पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. तसंच या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांनाही भेटणार असल्याचं आंदोलक आमदारांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी चौथऱ्यावर प्रवेश करत एका तरुणीने शनिला अभिषेक घातला होता. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर महिलांना चौथऱ्यावर प्रवेश मिळावा अशी मागणी जोर धरु लागली होती. त्याचेच पडसाद आज विधानभवनाबाहेर पडले आहेत.
११- गाढवासमोर गीता वाचत औरंगाबदेतील पत्नी पीडित पुरुषांचं अनोखं आंदोलन
औरंगाबदच्या विभागीय आयुक्त कार्यालया सोमोर पत्नी पीडित पुरुषांनी आंदोलन केलं. घटनेतील तरतुदीप्रमाणे स्त्री-पुरूष समान हक्क असतानाही महिलांप्रमाणे पुरूषांना न्याय मिळत नाही. महिलांवर अत्याचार झाल्यास त्यांना महिला तक्रार निवारण केंद्रात धाव घेता येते. मात्र पुरूषांसाठी पुरूष तक्रार निवारण केंद्र नसल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. महिलांप्रमाणे पुरूष तक्रार निवारण केंद्र असावं, असं म्हणणं या पत्नी पीडित पुरुषांचं असून विभागीय आयुक्तांकडे वारंवार मागणी करूनही पुरूष तक्रार निवारण केंद्र मिळत नसल्याचा या पुरुषांचा आरोप आहे.
१२- शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावणाऱ्या पवनऊर्जा कंपन्यांवर कारवाई नाहीच
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पवन ऊर्जा प्रकल्प उभे राहिले. मात्र हे करताना अनेक नियम धाब्यावर बसवल्याचं समोर आलं आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर 2010 साली पवनऊर्जा प्रकल्पाच्या चौकशीसाठी एक सचिवस्तरीय समिती नेमली होती. या समितीचा अहवाल मागील अधिवेशनात मांडला. मात्र अजूनही दोषी कंपन्यांवर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. सांगलीतील कवठे महांकाळ, जत, तासगाव, खानापूर, शिराळा, तर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, तसेच सातारा, धुळे, नंदुरबार आणि नाशिकमधील शेतकऱ्यांच्या जमिनी पवनऊर्जा कंपनीनं घेतल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. यावर 2010 मध्ये चौकशी समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीनं सादर केलेल्या अहवालात कंपनीविरोधात धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र शासनाने काहीच कारवाई केलेली नाही.
१३- समलैंगिक संबंधाना कायदेशीर मान्यता मिळावी अशी मागणी करणारे शशी थरूर यांचे विधेयक लोकसभेत फेटाळण्यात आले
१४- आरक्षणाच्या मागणीसाठी मातंग समाजाने नागपूर विधानभवनावर काढलेल्या मोर्च्यावर पोलिसांचा लाठीमार
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- उल्हासनगर; वर्हाडाच्या सामानावर चोराचा डल्ला, 9 लाखांचा ऐवज लंपास
उल्हासनगर मधील व्यावसायिक दीपक मित्तल यांच्या मुलीचा विवाह 14 डिसेंबर रोजी जवाहर हॉटेलमध्ये आयोजित केला होता. त्यामुळे दोन दिवस आधीच लग्नाचे वर्हाडी हॉटेलमध्ये उतरले होते. लग्नाचे वर्हाड म्हणजे दाग दागिने असणारच ते चोरी करण्याच्या उद्देशाने एक चोरटा हॉटेलमध्ये शिरला. त्यानंतर त्या चोरट्याने हॉटेलच्या तिसर्या मजल्यावर जाऊन कोणती रूम उघडी आहे का याची तपासणी केली. सकाळी वेळ असल्याने बहुतेक जण चहा पिण्यासाठी खाली उतरले होते तर महिला झोपेत होत्या, त्यातील 316 क्रमांकाच्या रूममधील गोयल यांची रूम उघडी असल्याचा फायदा घेत तो रूममध्ये शिरला आणि पुनम गोयल यांची दागिन्याने भरलेली पर्स घेऊन हॉटेल मधून आरामात निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला.
१६- आंध्र प्रदेशच्या विधानसभेत गाजत असलेल्या 'कॉल मनी रॅकेट'च्या जाळ्यात अडकलेल्या एका कुटुंबातील चौघांनी केली आत्महत्या
आंध्र प्रदेशच्या विधानसभेत गाजत असलेल्या 'कॉल मनी रॅकेट'च्या जाळ्यात अडकलेल्या एका कुटुंबाने अय्यप्पा मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले आणि जवळच्या तलावात उड्या मारुन आत्महत्या केली. शिव कुमार (३६), त्यांची पत्नी लिलावती (३०), मुलगा नवीन (८) आणि मुलगी काव्या (६) या चौघांनी धडाधड पाण्यात उड्या मारल्या. हा प्रकार पाहून तलावापासून काही अंतरावर असलेल्या लोकांनी धावत जाऊन वाचवण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी ठरला. सामूहिक आत्महत्येची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि शिव कुमार 'कॉल मनी रॅकेट'च्या जाळ्यात अडकल्याचे उघड झाले. मागील काही महिन्यांपासून आंध्र प्रदेशमध्ये 'कॉल मनी रॅकेट' मोठ्या प्रमाणावर सुरू झाले आहे. झटपट कर्जाच्या जाहिराती वेगवेगळे मोबाइल नंबर देऊन ठिकठिकाणी प्रसिद्ध केल्या जात आहे. फोन करुन घरचा पत्ता देताच कर्ज देणाऱ्या संस्थेचा सदस्य घरी येतो आणि कर्जाची रक्कम देऊन एका हमीपत्रावर सही घेतो. या योजनेत १२० ते २०० टक्के दराने व्याज आकारले जाते. कर्जाचा एखादा हप्ता वेळेत दिला नाही तर लगेच फोन करुन कर्ज घेणाऱ्यावर दबाव टाकायला सुरुवात होते आणि त्यावेळी मागतील तेवढ्या रकमेचा हप्ता द्यावाच लागतो. अशाच एका घटनेत दीड लाखाचे कर्ज घेणाऱ्या महिलेला परतफेड करताना तब्बल सहा लाख रुपये मोजावे लागले. एका कुटुंबाला आपले घर गमवावे लागले. अन्य एका प्रकरणात कर्ज घेणाऱ्या महिलेने आपल्याला कर्जाचे हप्ते भर नाही तर मुलाला उचलून नेईन आणि मुंबईत विकून टाकेन अशी धमकी आल्याची तक्रार केली आहे. काही जणांनी कर्जाचे हप्ते फेडणे जमत नसल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केला आहे.
१७- दिल्लीत समयपुर बादली भागात झोपडपट्टीला भाग, अग्निशमन दलाच्या १५ गाडया घटनास्थळी
१८- मध्यप्रदेशात उज्जैनमध्ये चार वर्षांचे मूल ३०० फूट बोअरवेलमध्ये पडले
१९- दुसरा चमत्कार पोपनी स्वीकारला, मदर तेरेसांना संतपद मिळणार
कोलकाता, दि. १८ - मदर तेरेसांनी मृत्यू झाल्यानंतरही रुग्णाला बरे करण्याचा दुसरा चमत्कार केल्याचे पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारले असून, मदर तेरेसांना पुढील वर्षी संतपद देण्यात येणार असल्याची माहिती कोलकात्याच्या आर्चबिशपनी दिली आहे. कोलकात्यातल्या रस्त्यावरच्या गरीबांना तसेच रुग्णांना आधार देणा-या मदर तेरेसांना यापूर्वी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. ख्रिश्चन धर्मामध्ये चमत्कार सिद्ध करणा-यांना चर्च संतपद देते. आणि मृत्यूनंतरही चमत्कार घडू शकतो अशी श्रद्धा आहे. ब्रेन ट्युमरमुळे अंथरुणाला खिळलेल्या एका ब्राझिलच्या रुग्णाला मदर तेरेसांनी २००८ मध्ये म्हणजे मृत्यूनंतरही बरे केल्याचा चमत्कार केल्याचा दावा पोप फ्रान्सिस यांनी स्वीकारल्याचे आर्चबिशप थॉमस डिसोझांनी सांगितले.
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- बाजीराव मस्तानी चांगला सिनेमा, प्रेक्षक म्हणून आवडला -अमृता फडणवीस
बाजीराव मस्तानी सिनेमाच्या विरोधात भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहे. पुण्यात काही ठिकाणी शोही बंद पाडले आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी गुरुवारीच हा सिनेमा पाहिला आणि प्रेक्षक म्हणून हा सिनेमा आपल्याला आवडला अशी प्रतिक्रिया आयबीएन लोकमतकडे दिली. अमृता फडणवीस म्हणतात, बाजीराव मस्तानी हा सिनेमा मी पाहिला. एक प्रेक्षक म्हणून हा सिनेमा मला चांगला वाटला. आता जो काही वाद सुरू आहे त्याचा अभ्यास म्हणा किंवा तुलना अशी काही मी केली नाही. पण, एक सिनेमा म्हणून बाजीराव मस्तानी चांगला सिनेमा आहे. फक्त मनोरंजन म्हणून त्या चित्रपटाकडे पाहिलं. जर तुम्ही इतिहास म्हणून जर विचारात असेल तर माझं असं कोणतंही मत या सिनेमाबद्दल नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं.
२१- शाहरूख खानच्या 'दिलवाले' देशातील विविध शहरात विरोध
इलाहाबाद येथे गुरूवारी भाजप कार्यकर्त्यांनी दिलवालेचा विरोध केला. तसेच मध्य प्रदेशमध्ये दिलवालेच्या डिस्टीब्युटर आणि फिल्म समीक्षक जयप्रकाश चौकसे यांनी मुख्यमंत्री शिवराज चव्हाण यांची भेट घेतली. त्यांना दिलवाले चित्रपट प्रदर्शनावर धमक्या मिळत होत्या. गुजरातमधील सूरत शहरात शाहरूखच्या चित्रपटाला विरोध झाला हा विरोध राष्ट्र सेनाने केला. सूरत्या राजहंस थिएटरबाहेर आंदोलन करण्यात आले. १२ कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच गोरखपूर येथे शिवराष्ट्र सेनेच्या कार्यकर्त्यांनी चित्रपटाला विरोध केला. राजस्थानातील भीलवाडा येथे जोरदारा आंदोलन करण्यात आले. त्यामुळे पहिला शो रद्द करण्यात आला. वाढत्या असहिष्णूतेवर शाहरूखने वादग्रस्त विधान केल्यामुळे काही हिंदू संघटनांनी धमकी दिली होती की, दिलवाले रिलीज करणाऱ्या थिएटरमध्ये तोडफोड करू... या धमकीनंतर विविध थिएटरने सुरक्षा मागितली होती.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
What's Up वरील काही व्हायरल व्हिडीओ
~~~~~~~~~~~~~~~
२२- अनोळखी व्यक्तींपासून सावध
http://goo.gl/7Jj01M
~~~~~~~~~~~~~~~
२३- पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत खबरदारी
http://goo.gl/y560HJ
~~~~~~~~~~~~~~~
२४- आई-मुलांचा अप्रतिम व्हिडीओ, मुलाला छेड-छाडी पासून परावृत्त करतांना
http://goo.gl/1XO3Ro
~~~~~~~~~~~~~~~
२५- अनोळखी व्यक्तीकडून खाण्याचे पदार्थ खावू नका
http://goo.gl/ztoaoA
~~~~~~~~~~~~~~~
२६- आपल्या डेबिट-क्रेडीट कार्डची माहिती अनोळखी व्यक्तीस देवू नका
http://goo.gl/dTSZLl
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आयुष्यात आपण आपली "Image" कितीही चांगली बनविण्याचा प्रयत्न केला तरी तिची "Clearity" समोरच्या व्यक्तीच्या मनाच्या "Quality"वर अवलंबून असते
[रुपेश दरक, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
~~~~~~~~~~~~~~~
CCTV कॅमेरा बसवा आणि सुरक्षित राहा
करा आपला व्यवसाय आणि घर सुरक्षित
CP PLUS, Gadgets World Nanded
HD CCTV CAMERA PACKAGE
4 HD CAMERA CP PLUS 1MP
4CH HD DVR CP PLUS
1TB HDD
WIRE 92 MTR
INSTALLATION
JUST 18000 Rs ONLY
GADGETS WORLD, CENTRE POINT,
SHIVAJI NAGAR, NANDED
07744995599
अधिक माहितीसाठी लिंक
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/cp-plus-gadgets-world-nanded.html
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुपचे स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment