नमस्कार लाईव्ह १७-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- दशकभरात फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात पहिल्यांदाच वाढ
अमेरिकेच्या मध्यवर्ती फेडरल रिझर्व्ह बँकेने बुधवारी व्याजदरात वाढ केली. दशकभरात पहिल्यांदाच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. २००८ मध्ये अमेरिकेत आलेल्या महामंदीमधून अमेरिका सावरत असल्यामुळे फेडरल रिझर्व्हकडून हा निर्णय घेण्यात आला. फेडरल रिझर्व्हने व्याजदरात ०.२५ टक्क्यांची वाढ केली आहे. आता व्याजदर ०.५० टक्के झाला आहे. अमेरिकेत यावर्षी रोजगार निर्मितीमध्ये झालेली चांगली वाढ लक्षात घेऊन, फेडरलच्या समितीने व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. २००८ मध्ये अमेरिकेतील महामंदीमध्ये अनेक उद्योग बुडाले होते. त्यामुळे रोजगार निर्मितीमध्ये कमालीची घट झाली होती. फेडरल रिझर्व्हने त्यावेळी व्याजदर कमी केल्याने
जगातील अनेक देशांना दिलासा मिळाला होता. आता पुन्हा रोजगार निर्मितीचे चक्र सुरु होऊन, अमेरिकी अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. फेडरल रिझर्व्हच्या या निर्णयाचे जागतिक बाजारातही निश्चितच काही प्रमाणात पडसाद उमटतील.
२- नेपाळच्या राष्ट्राध्यक्ष हल्ल्यातून बचावल्या
काठमांडू : नेपाळच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी बुधवारी मधेशी नागरिकांनी केलेल्या हल्ल्यातून बालंबाल बचावल्या. त्या जानकी मंदिरात गेल्या असता त्यांच्या वाहनाच्या ताफ्यावर दगड व पेट्रोलबॉम्ब फेकण्यात आले. नेपाळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, जनकपूरच्या जानकी मंदिराजवळ हे नागरिक निदर्शने करीत होते. यावेळी चकमकीत २० निदर्शक जखमी झाले. जमावाला पांगविण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराचा वापर केला. विवाह पंचमीनिमित्त दर्शनासाठी विद्यादेवी आल्या तेव्हा तणाव वाढला. त्यांना विरोध करण्यासाठी शेकडो नागरिक रस्त्यावर आले. अनेकांच्या हातात काळे ध्वज होते.
३- दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सौदी अरेबिया तयार करीत असलेल्या लष्करी आघाडीची आपल्याला कल्पनाच नाही - पाकिस्तान
इस्लामाबाद : दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी सौदी अरेबिया तयार करीत असलेल्या लष्करी आघाडीची आपल्याला कल्पना नसल्याचे सांगत पाकिस्तानने मध्य पूर्वेतील राजकारणापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानी दैनिक डॉनच्या वृत्तानुसार पाकचे परराष्ट्र सचिव अजीज चौधरी यांनी सौदीच्या घोषणेबद्दल आश्चर्य व्यक्त केले. ते म्हणाले की, आपण ३४ देशांची लष्करी आघाडी स्थापन करीत आहोत ही सौदीची घोषणा अनेक देशांना अचंबित करणारी ठरली. आमच्या सौदीतील राजदूतांना त्यादेशाकडून स्पष्टीकरण घेण्यास सांगितले आहे.
४- व्हाईट हाऊस घेणार शीख, मुस्लिम समुदायांची बैठक
वॉशिंग्टन : अमेरिकेत मुस्लिम आणि शीख समाजाच्या नागरिकांचा द्वेष करण्याचे प्रमाण वाढलेले असताना व्हाईट हाऊस आता या समुदायांच्या प्रतिनिधींची बैठक घेणार आहे. या समाजापुढील आव्हाने आणि समस्या यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. व्हाईट हाऊसचे माध्यम विभागाचे सचिव जोश अर्नेस्ट यांनी सांगितले की, व्हाईट हाऊसचे प्रतिनिधी विविध धार्मिक नेत्यांशी चर्चा करत आहेत. तर या बैठकांमध्ये अध्यक्ष सहभाग घेणार नसल्याचेही सांगण्यात आले. सिसिलिया मुनोज व्हाईट हाऊसच्या वतीने चर्चेत सहभाग घेतील.
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
५- डीडीसीए भ्रष्टाचार, जेटलींच्या राजीनाम्याची 'आप'ची मागणी
जेटली यांच्या अध्यक्षपदाच्या तेरा वर्षांच्या कारकीर्दीत ‘दिल्ली अँड डिस्ट्रिक्टस क्रिकेट असोसिएशन’ म्हणजेच ‘डीडीसीए’मध्येकरोडो रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप ‘आप’च्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत केला. खोटी बिलं आणि खोटी कामं दाखवून, तसंच आर्थिक नियम धाब्यावर बसवून डीडीसीएत वारंवार बनावट कंपन्यांचा लाभ करुन देण्यात आल्याचा आरोपही आप नेत्यांनी केला आहे. या प्रकरणी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणीही करण्यात आली आहे.
डीडीसीएचं प्रकरण नेमकं काय आहे?
‘डीडीसीए’ म्हणजेच ‘दिल्ली अँड डिस्ट्रिक्टस क्रिकेट असोसिएशन’ ही बीसीसीआयला संलग्न असलेली राज्य असोसिएशनदिल्लीतल्या क्रिकेटचं नियंत्रण करते.
६- निर्भया फंड : 3 वर्षात 3000 कोटींमधील दमडीही खर्च नाही
16 डिसेंबर 2012 वर निर्भयावर झालेल्या गँगरेपने सारा देश हादरला. त्याला तीन वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने अनेकांनी मेणबत्ती मोर्चे काढून श्रद्धांजली वाहिली. पण निर्भयाच्या नावाने जो निधी केंद्र सरकारने तयार केला आहे, त्याची अवस्था पाहिल्यानंतर आपण निर्भयाला किती न्याय देऊ शकलोय असा प्रश्न व्यवस्थेला विचारावा लागेल. तीन वर्षांपूर्वी जेव्हा निर्भया प्रकरण घडलं, त्यानंतर लोकभावनांचा प्रचंड उद्रेक झाला. निर्भया फंडची निर्मिती करण्यात आली. पण धक्कादायक म्हणजे तीन वर्षानंतरही या फंडचा काहीच वापर होत नसल्याची माहिती आरटीआयअंतर्गत समोर आली आहे.
७- ३० हजार कोटींची पाच 'एस ४००'मिसाईल खरेदी करण्याला केंद्राची परवानगी
८- नाशिक - १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी शरीफ गफूर पारकार याचा नाशिक रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूू
९- वाय-फाय प्रोजेक्ट बद्दल आम्ही प्रचंड उत्सुक आहोत. जगातील गुगलचा हा सर्वात मोठा प्रोजेक्ट आहे - सुंदर पिचाई
१०- भारतीय वंशाच्या महिलेने बनवला 'सुपर कंडोम'
भारतीय वंशाच्या अमेरिकन प्राध्यापिका आणि त्यांच्या टीमने ‘सुपर कंडोम’ विकसित केला आहे. हा ‘सुपर कंडोम’ एचआयव्ही व्हायरसचं संक्रमण रोखू शकेल, असा दावा या टीमने केला आहे. याशिवाय शरीरसुखाचा आनंदही द्विगुणीत होईल असाही विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
**महुआ चौधरी आणि टीमचा शोध **
अमेरिकेच्या टेक्ससमधील ‘ए अँड एम युनिवर्सिटी’मध्ये महुआ चौधरी आणि त्यांच्या टीमने हायड्रोजेल कंडोम बनवला आहे. या सुपर कंडोममुळे गर्भधारणा रोखता येईलच, शिवाय एचआयव्ही व्हायरसचं संक्रमण रोखू शकेल, असा दावा करण्यात आला आहे. हायड्रोजेल नावाच्या इलॅस्टिक पॉलिमरचा वापर करून हा कंडोम तयार करण्यात आला आहे.
“केवळ एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठीच नव्हे तर या व्हायरसचं मूळापासून उच्चाटन करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत” असं महुआ चौधरी यांनी म्हटलं आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
११- शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
शेतकर्यांच्या कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत नागपूर विधानभवनाच्या बाहेर जोरदार निदर्शनं केली. नागपूर विधानभवनाच्या पायर्यांवर बसून राष्ट्रवादीचे नेत्यांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला. शेतकर्यांचे कर्जमाफ करण्याची विरोधकांची मागणी फडणवीस सरकारने फेटाळून लावल्याने विरोधक संतापले. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे आणि पक्षाचे इतर महत्त्वाचे नेत्यांनी सहभाग घेत विधानभवनाबाहेर घोषणाबाजी केली आणि राज्यपालांची भेट घेऊन त्यांच्यापुढेही साकडं घातलं.
१२- श्रीहरी आणेंवर मुख्यमंत्र्यांनी अजून निवेदन केलं नाही, विधान परिषदेत निवेदन झालं पण विधान सभेत झालं नाही, हे प्रथेला धरून नाही - प्रताप सरनाईक
१३- पगारवाढीसाठी एसटीचे कर्मचारी संपावर, प्रवाशांचे हाल
25 टक्के पगारवाढीच्या मागणीसाठी राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. काँग्रेस प्रणित इंटक संघटनेकडून हा संप पुकारला गेला आहे. सुरुवातीच्या सत्रात राज्यभरातून या संपाला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. हा संप इंटक एसटी कर्मचारी संघटनेने पुकारला असून या संघटने (जयप्रकाश छाजेड)चे अंदाजे 40 हजार सभासद आहेत. तर मान्यताप्राप्त एसटी संघटने (हनुमंत तोटे)चे 75 हजार सभासद आहेत. या संपात एसटी कामगार संघटना संपात सहभागी नाही.
१४- परवाणगीशिवाय उरवरीत २.२४ टीएमसी पाणी जायकवाडीला सोडू नका - मुंबई हायकोर्ट
१५- जेजुरी देवस्थानच्या पुजाऱ्यांकडून पैसे, दागिने चोरीचे प्रकार उघडकीस. धर्मादाय सहआयुक्तांचे कारवाईचे आदेश
१६- कोथरूड अग्निकांड प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल, खानावळीचा मालक, गादीकारखान्याचे २ मालक आणि वेल्डिंग ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१७- प्रेमविवाह केलेल्या बहिणीची हत्या, भावजीचाही गळा चिरला
बहिणीनं आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून सख्या भावांनी आपल्या बहिणीची आणि तिच्या पतीची गळा चिरून हत्या केली आहे. गणेश पाटील, जयदीप पाटील, आणि त्यांचा मित्र नितीन काशीद अशी आरोपींची नावं आहे. तिनही आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कोल्हापुरातील कसबा बावडा परिसरात रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली. इंद्रजीत कुलकर्णी आणि मेघा पाटील यांनी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता आंतरजातीय विवाह केला. इंद्रजित हा पन्हाळा तालुक्यातील सावर्डे इथला तर मेघा शाहूवाडीची रहिवाशी आहे. त्यांनी 24 जून 2015 रोजी पळून जाऊन विवाह केला होता. तेव्हापासून ते कसबा बावड्यातील गणेश नगरमध्ये भाड्याच्या खोलीत राहात होते.
१८- नालासोपाऱ्यातील संपूर्ण कुटुंब नऊ महिन्यांपासून बेपत्ता
नालासोपाऱ्याच्या नालेश्वर नगरमधील एक संपूर्ण कुटुंबच मागील नऊ महिन्यांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. सात जणांच्या या कुटुंबात सहा मोठी माणसे आणि दहा महिन्यांच्या मुलीचा समावेश आहे. रामदास इगवे असं कुटुंबप्रमुखाचं नाव असून नालासोपारा पूर्वच्या नालेश्वर नगरमधील वैष्णवी सदन या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर हे कुटुंब राहत होते. रामदास इगवे वय 55 वर्ष, मंगलबाई इगवे (वय 42 वर्ष), भाविन रामदास इगवे (वय 25 वर्ष), आशा भाविन इगवे (वय 20 वर्ष), त्यांची एक दहा महिन्याची मुलगी, सचिन रामदास इगवे (वय 24 वर्ष), त्याची पत्नी उज्ज्वला सचिन इगवे (वय 21 वर्ष), असं सात जणांचं कुटुंब आहे. मात्र मागील नऊ महिन्यापासून या कुटुंबाशी कोणताही संपर्क होत नसल्याने त्यांचे नातेवाईक चिंताग्रस्त झाले आहेत.
१९- लग्नात वर दारु पिऊन आला, वधूने वरात माघारी पाठवली
कानपूर; वधूच्या घराबाहेर वरात दाखल झाली. यानंतर वरातीचं स्वागतही करण्यात आलं. काही विधीही करण्यात आल्या. यानंतर वर वधूच्या गळ्यात वरमाला टाकण्यासाठी सज्ज झाला. पण मद्यधुंद अवस्थेत असलेला वर झिंगायला लागला. हे पाहून वधूला समजलं की, तिचा होणारा नवरा दारु पिऊन आला आहे. त्यामुळे तिने लग्न करण्यास मनाई केली. यानंतर विवाहस्थळी जोरदार वाद झाला. याची माहिती मिळताच पोलिसही तिथे पोहोचले. वराचे नातेवाईकांनी वधूला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतू वधू तिच्या निर्णयावर ठाम राहिले.
२०- मुंबई मेट्रोची भाडेवाढ आणखी महिनाभरासाठी टळली
मुंबईकरांना हायकोर्टाने तात्पुरता दिलासा दिला आहे. कारण मुंबई मेट्रोची दरवाढ महिनाभरासाठी टळली आहे. एमएमआरडीएच्या याचिकेवर सुनावणी होईपर्यंत मेट्रोची दरवाढ करण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. याप्रकरणाची सुनावणी आता 29 जानेवारीला होणार आहे. त्याआधी मेट्रोने भाववाढ करु नये असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे काहीकाळासाठी मुंबईकरांच्या डोक्यावरची भाववाढीची टांगती तलवार दूर झाली
२१- अमरावतीत 3 अल्पवयीन मुलींवर 5 नराधमांचा गँगरेप
अमरावती जिल्ह्यातील धारणीमध्ये 3 अल्पवयीन आदिवासी मुलींवर 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबतची तक्रार धारणी पोलिस ठाण्याक करण्यात आली आहे. तिन्ही पीडित मुलींना कामानिमित्त कोलकासला घेऊन जातो, असे सांगत नजीकच्या जंगलात नेऊन 5 नराधमांनी त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. सकाळी घेऊन गेलेल्या मुलींना रात्री या नराधमांनी सोडले. त्यानंतर घरच्यांनी मुलींची विचारपूस केल्यानंतर ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान, या सामूहिक बलात्कार प्रकरणी तीन नराधमांना ताब्यात घेण्यात आले आहे, तर दोन नराधम अद्याप फरार आहेत. या 5 नराधमांमधील तिघेजण विवाहित आहेत.
२२- पंजाब - बर्नालात भंगारात स्फोट, २ जणांचा मृत्यू तर ३ जण गंभीर जखमी
२३- नागपूरात चोरांनी एका रात्रीत तीन एटीएममशीन फोडून २४ लाखांची रोकड लांबवली
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२४- घर खरेदीदारांसाठी गुड न्यूज, किमती स्थिर राहण्याचे संकेत
घर खरेदी करण्याच्या तयारीत असणाऱ्यांना यावेळी दिलासा मिळण्याची शक्यता आहे. यंदा रेडी रेकनरचे दर वाढणार नसल्याची माहिती असून त्यामुळे घरांच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये घर घेण्याची अनेकांची इच्छा असते, मात्र घरांच्या वाढत्या किमती आणि गृहकर्जाचे व्याजदर यामुळे अनेकांसाठी स्वतःचं घर विकत घेणं ही डोकेदुखी ठरते. मात्र यावेळी रेडी रेकनरचे दर स्थिर राहण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पर्यायाने मुंबईसह महाराष्ट्रात घराच्या किंमती स्थिर राहण्याची शक्यता आहे.
२५- समृद्धी पोरे दिग्दर्शित हेमलकसा हिंदी चित्रपट ऑस्करच्या फायनलमध्ये, डॉ. प्रकाश बाबा आमटेंच्या जीवनावरील चित्रपट
२६- मराठी चित्रपट 'कोर्ट' ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर
'डॉ.प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो' या मराठी सिनेमाच्या प्रचंड यशानंतर समृध्दी पोरे दिग्दर्शित हिंदी सिनेमा 'हेमलकसा' ने थेट ऑस्करच्या अंतिम फेरीपर्यंत धडक मारली आहे..मात्र मराठी सिनेमा कोर्ट ऑस्करच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे..
२७- फेसबुकवरुन बूक करा टॅक्सी, फेसबुकची नवी सेवा सुरु
सोशल नेटवर्किंग वेबसाईट फेसबुक आता ट्रान्सपोर्ट क्षेत्रातही उतरलं आहे. उबर कॅब वापरणाऱ्यांच्या मदतीला आता फेसबुक धावून येणार आहे. लवकरच फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून उबर कार बुक करता येईल. फेसबुकच्या ट्रान्सपोर्टेशन फील्डमध्ये उबर त्यांचं पहिलं भागीदार झालं आहे. फेसबुक मेसेंजरच्या माध्यमातून चॅटच्या साह्य्याने उबर कॅब बुक करता येणार आहे. तसेच यासाठी उबरचं अॅपही डाऊनलोड करण्याची गरज नाही. उबरच्या माहितीनुसार, कालपासून ही सेवा अमेरिकेत सुरु झाली आहे. सध्या ही सेवा अमेरिकेत अशा जागी आहे जिथे उबर कॅबचे ऑपरेटर आहेत.
२८- 21 मेगापिक्सल कॅमेरा, जबरदस्त यू यूटोपिया स्मार्टफोन लाँच
भारतीय मोबाईल कंपनी मायक्रमॅक्सने खास भारतीय युवावर्गाला आकर्षित करण्यासाठी सुरू केलेल्या यू टेलिवेंचर्स या नव्या कंपनीच्या माध्यमातून आजवरचा सर्वात दणकट फीचर्स असलेला स्मार्टफोन लाँच केला आहे. यू युटोपिया असं या स्मार्टफोनचं नाव आहे. यू कंपनीने यू युरेका, यू युरेका प्लस, यू युनिक, यू युफोरिया असे लोकप्रिय तसंच स्वस्त स्मार्टफोन लाँच केले आहेत. आपला आधीचा लौकिक कायम ठेवत याच मालिकेत आता यू युटोपिया हा सर्वाधिक हायएन्ड फीचर्स असलेला स्मार्टफोन आज भारतीय बाजारपेठेत उतरवण्यात आला. हा स्मार्टफोन फक्त अमेझॉन या ऑनलाईन शॉपिंग साईटवरच उपलब्ध आहे. यू युटोपियाच्या विक्रीपूर्व नोंदणीला आज दुपारी दोन वाजल्यापासून सुरूवात झाली आहे. तर प्रत्यक्ष डिलीव्हरीसाठी 26 डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. आजच्या तारखेला पृथ्वीवरील सर्वात चांगला आणि सशक्त फोन अशी जाहिरात करण्यात आलेल्या यू युटोपियाची किंमत फक्त रू. 24999 आहे.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२९- दिनांक 18.12.2015 , रोजी सचखंड एक्स्प्रेस नांदेड येथून उशिरा सुटणार
http://goo.gl/qX7i2M
~~~~~~~~~~~~~~~
३०- वृद्धाश्रमात अन्नधान्य वाटप करून स्व. मुंडेची जयंती साजरी
http://goo.gl/OB2JbF
~~~~~~~~~~~~~~~
३१- दोनशे खाटोच रूग्णालय शहरात त्वरीत सुरू करणार - आ. हेमंत पाटील
http://goo.gl/ChIY6N
~~~~~~~~~~~~~~~
३२- भविष्य घडविण्यासाठी विदयाथ्र्यानी पर्यन्त केले पाहीजे -- मा. खा. भास्करराव पाटील खतगावकर
http://goo.gl/QBKmYm
~~~~~~~~~~~~~~~
३३- अकोला येथे मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशन
http://goo.gl/9XagyG
~~~~~~~~~~~~~~~
३४- नांदेड; दि.19 डिसेंबर रोजी विजय नगरमध्ये मोफत हाडांचे तपासणी शिबिर
http://goo.gl/pPiujm
~~~~~~~~~~~~~~~
३५- कु-हा काकोडा परिसरात भुरट्या चोराचा धुमाकुळ...
http://goo.gl/BB1wcY
~~~~~~~~~~~~~~~
३६- दिनांक 18.12.2015 , रोजी सचखंड एक्स्प्रेस नांदेड येथून उशिरा सुटणार
http://goo.gl/ssv63Q
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
शांत स्वभावाचा माणूस हा कधीही कमजोर नसतो, कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ असे काहीच नाही...पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर मोठमोठे डोंगरही फोडून निघतात
[गीतेश शिंदे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
सध्याच्या घडामोडी पाहता पाकिस्तान दाउदला भारताच्या ताब्यात देईल का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
आता चिंता सोडा, वजन वाढविणे किंवा कमी करणे खूप सोपे झाले आहे.
S.S.S. Sports & Food Supplements
हे घेवून आले आहेट आपल्या सेवेसाठी देश विदेशातील नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, फॅट बर्न, मल्टी व्हिटामिन्स, एनर्जी ड्रिंक
सर्व काही एकाच छताखाली...
सर्व वयोगटातील पुरुष-स्त्री, मुले-मुलींसाठी उपयुक्त
वजन कमी असलेले मुले-मुली, जिम करणारे स्पोर्टमॅन अगदी सर्वांसाठी
लठ्ठपणा कमी करण्यासाठी फायदेशीर
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
वाढदिवसाचे चॉकलेट, 'आय.लव्ह.यु.' चॉकलेट, 'Thanks' चॉकलेट, 'Congratulation' चॉकलेट, 'Lips' Shapeचॉकलेट, 'Hurt' Shapeचॉकलेट. खाण्यासाठीचे पोटलीचे चॉकलेट, गिफ्टसाठी पॅकिंगचे चॉकलेट...
ढिंचाक चॉकलेट होममेड असून शुद्ध शाकाहारी आहेत.
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
CCTV कॅमेरा बसवा आणि सुरक्षित राहा
करा आपला व्यवसाय आणि घर सुरक्षित
CP PLUS, Gadgets World Nanded
HD CCTV CAMERA PACKAGE
4 HD CAMERA CP PLUS 1MP
4CH HD DVR CP PLUS
1TB HDD
WIRE 92 MTR
INSTALLATION
JUST 18000 Rs ONLY
GADGETS WORLD, CENTRE POINT,
SHIVAJI NAGAR, NANDED
07744995599
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/cp-plus-gadgets-world-nanded.html
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment