Sunday, 6 December 2015

नमस्कार लाईव्ह ०६-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०६-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१- चेन्नई : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी चेन्नईतील पूरग्रस्तांची भेट घेणार, 8 तारखेला दौरा
२- चेन्नई विमानतळावरील दिवसा व रात्रीची सर्व राष्ट्रीय व अांतरराष्ट्रीय उड्डाणे उद्या सकाळपासून सुरू होणार - विमानतळ अधिका-यांची माहिती
३- अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना अशक्य - रेल्वेच्या जनरल मॅनेजरांचे वक्तव्य
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
४- विधान परिषद निवडणुकांसाठी शिवसेना-भाजपचा युतीचा निर्णय, लवकरच घोषणा

५- विधान परिषदेच्या 2 जागेसाठी सर्वच पक्षात रस्सीखेच
                 विधान परिषदेच्या मुंबईतल्या दोन जागांसाठी आता सर्वच पक्षांच्या नेत्यांनी जोरदार तयारी सुरू केलीय. दुसरीकडे इच्छुक ही पक्षांमध्ये जोर लावायला लागले आहेत. मुंबईतल्या दोन जागांसाठी शिवसेनेकडून विद्यमान आमदार रामदास कदम यांचं नाव जवळपास निश्चित आहे. तर भाजपकडून नगरसेवक मनोज कोटक आणि शायना एनसी यांनी फिल्डिंग लावलीय. काँग्रेसनं सध्या विद्यमान असलेल्या भाई जगताप यांनाच पुन्हा उमेदवारी देण्याच निश्चित झाल्याचं समजतंय. या दोन्ही जागांसाठी मुंबईतले 227 नगरसेवक मतदान करणार आहेत. त्यात सेनेची स्वतःची 75 मतं आहेतच जी सेनेच्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मत देतील. त्यामुळे सेनेला आमदारकी मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार नाहीत. पण भाजप आणि काँग्रेला मात्र त्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.

६- हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार, विरोधकांच्या बैठकीत निर्णय
७- दुष्काळ, शेतकरी आत्महत्या, महागाई, विदर्भ विकास, डाळ घोटाळा, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारला अधिवेशनात जाब विचारणार- धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस
८- नागपूर नव्हे गुंडापूर, अजित पवारांचं भाजप सरकारवर टीकास्त्र
                 ‘मुख्यमंत्र्यांच्या नागपूरला आता नागपूर न म्हणता गुंडापूर म्हणायला पाहिजे. भाजप सरकारच्या काळात राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत,’ अशी टीका माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. शरद पवार यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्ह्यात वडगाव मावळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. नागपूरसह संपूर्ण देशात वाढत चाललेली गुन्हेगारी हे भाजप सरकारचं अपयश आहे. भाजप सरकारचा आपापसात ताळमेळ नसल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. आघाडी सरकार असेपर्यंत सरकार सर्वसामान्य नागरिकांचा विचार करत होतं, परंतु भाजप सरकार आल्यापासून ते केवळ स्वतःचाच विचार करत आहे, अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली

९- 80 टक्के जनता स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने : श्रीहरी अणे

                  अधिवेशनाला एक दिवस राहिला असताना विदर्भाचा मुद्दा पुन्हा गाजण्याची चिन्हं आहेत. स्वतंत्र विदर्भ व्हावा की नाही, याचं उत्तर केवळ विदर्भाची जनताच देऊ शकते. त्यामुळे विदर्भाच्या मुद्द्यावर जनचाचणी घेण्याचा सल्ला राज्याचे महाधिवक्ता आणि ज्येष्ठ विधीज्ज्ञ श्रीहरी अणे यांनी दिला आहे.नागपुरात त्यांच्या ‘विदर्भगाथा’ या पुस्तकाचं प्रकाशनाच्या वेळी ते बोलत होते. महत्वाचं म्हणजे अशा पद्धतीची जनचाचणी झाल्यास 80 टक्के जनता ही वेगळ्या विदर्भाच्याच बाजूनं कौल देईल, असा दावाही त्यांनी केला. काही लोकांना वेगळ्या विदर्भाच्या नावावर केवळ तेलंगणाप्रमाणे हिंसक आंदोलन अभिप्रेत आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

१०- यंदा राज्यात डाळींच्या उत्पन्नात ३५ टक्क्यांनी घट झाली आहे - मुख्यमंत्री फडणवीस
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
११- नाशिक : मालेगाव-सटाणा रोडवर ट्रक-कारचा भीषण अपघात, तीन युवकांचा जागीच मृत्यू
१२- मुसळधार पावसामुळे चेन्नईतील शाळा- कॉलेजेस उद्याही राहणार बंद
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१३- ‘शोध’ कादंबरीचे लेखक मुरलीधर खैरनार यांचं निधन
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
१४- ५५ व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेच्या नांदेड केंद्रावर दि. ०५/१२/२०१५ रोजी शेवटचे नाटक ‘नरकचतुर्दशी’
~~~~~~~~~~~~~~~
१५- नायगाव शहरात राष्ट्रवादीला खिंडार
~~~~~~~~~~~~~~~
१६- जिल्ह्यासह देशभरात डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनपर कार्यक्रम
~~~~~~~~~~~~~~~
१७- मुखेड; बाबरी मस्जिदची पुर्णनिर्मिती करा, राष्ट्रपतीना पाठवले निवेदन
~~~~~~~~~~~~~~~
१८- क्रांतिवीर बापुसाहेब कोकरे यांच्या विचाराची ज्योत अंखडपणे तेवत ठेवण्याचा निर्धार - दांगडे पाटील
~~~~~~~~~~~~~~~
१९- मुखेड न.पा. कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावर मोर्चाचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~
२०- डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजनांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य झिजविले - सौ. वर्षाताई भोसीकर
                कंधार- ता.प्र.
                ६ डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापारीनिर्वान दिनानिमित्त कंधार येथील प्रियदर्शनी माध्यमिक कन्या शाळा येथील अभिवादन कार्यक्रमात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीयांच्या कल्याणासाठी आपले आयुष्य झिजविले असे प्रतिपादन जि.प. सदस्या सौ. वर्षाताई भोसीकर यांनी बोलतांना केले 
                या कार्यक्रमाचे संचालन सौ. मंगला देशपांडे यांनी केले. आभार प्रदर्शन सौ. प्रणिता खैरे यांनी मानले. यावेळी शाळेतील निळोबा चिरले, बालाजी जोंधळे व विद्यार्थिनी उपस्थित होत्या 
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जगाबरोबर लढा पण पण आपल्या माणसांसोबत नाही, कारण आपल्या माणसांसोबत जिंकायचे नसते तर जगायचे असते
[गिरीश वाकोडीकर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
जिथे वाचकाच बनतात रिपोर्टर, पाठवा आपल्याकडील बतिमी 8975495656 च्या Whats Up वर,
नमस्कार लाईव्हच्या वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे अभिनंदन.
राज्यातील पहिले सोशल मिडिया न्यूज चॅनेल 'नमस्कार लाईव्ह'
जे पोहोचतेय महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात,
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत, अगदी काही वेळातच
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
++++++++++++++++++
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments: