नमस्कार लाईव्ह १६-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- पॅरीस दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याच्या संशयातून ऑस्ट्रेलियातून २ जणांना अटक
२- सिरियातील दोन बाजारपेठांवर रशियाने केलेल्या हल्ल्यात ३४ ठार
३- दहशतवादाचा त्रास पाकिस्तान इतका जगात कुठल्याही देशाने सोसलेला नाही कुठलाही दहशतवाद चांगला किंवा वाईट नसतो - अब्दुल बासित, पाकिस्तानी राजदूत
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- गोमांस विक्रेत्या कंपन्यांकडून भाजपला 2.5 कोटींची देणगी
गोमांस सेवन आणि विक्रीवरुन देशभरात उठलेलं वादळ आणि भाजप नेत्यांनी गोमांस विक्रीवर बंदीची केलेली मागणी यासारखे मुद्दे ताजे असतानाच भाजपनेच गोमांस विक्री करणाऱ्या कंपन्यांकडून फंडिंग घेतल्याचं समोर आलं आहे. संबंधित कंपन्यांकडून भाजपला मिळालेल्या देणग्यांची यादी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. भाजपचे प्रवक्ते शहनवाझ हुसेन यांनी मात्र याबाबत कुठलीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर खुलासा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. मात्र गोमांस विक्रीवर आक्षेप घेणाऱ्या भाजपला गोमांस विक्रेत्या कंपन्यांकडून देणगी घेण्यात कुठलाही आक्षेप नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
५- घोषणा देणाऱ्या भगवंत मान यांना मोदींनी पाणी पाजलं
आम आदमी पार्टीचे नेते भगवंत मान यांनी सीबीआयचा दुरुपयोग होत असल्याचा मुद्दा लोकसभेत उचलला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सोमरच वेलमध्ये भगवंत मान घोषणा देत होते. घोषणाबाजी करताना त्यांचा घसा कोरडा पडत असल्याने स्वतः पंतप्रधानांनी डेस्कखाली ठेवलेला पाण्याचा ग्लास भगवंन मान यांना दिला. भगवंत मानही ग्लासभर पाणी प्यायले आणि त्यानंतर पुन्हा मोदींविरोधात जोरजोरात घोषणा करु लागले. मात्र या घटनेनंतर सभागृहातील इतर नेत्यांनी पंतप्रधानांचं कौतुकही केलं.
६- पेट्रोल, डिझेलच्या एक्ससाइज ड्युटीमध्ये वाढ, सरकारचा निर्णय
सरकारने पेट्रोलवर प्रति लीटर 30 पैसे एक्ससाइज ड्युटी वाढविण्यात आली आहे. तर डिझेलवर 1.17 रु. प्रति लिटर एक्ससाइज ड्युटी वाढविण्यात आली आहे. पेट्रोलवरील एक्ससाईज ड्युटी 30 पैसे वाढविल्याने आता पेट्रोलवरील एकूण एक्ससाइज 7.36 रु. प्रति लिटर झाली आहे. तर डिझेलवरील एकूण एक्ससाईज ड्यूटी 5.83 रु. प्रति लिटर झाली आहे. अतिरिक्त आणि विशेष एक्ससाइज ड्युटी मिळून अनब्रॅण्डेड पेट्रोल सध्या 19.06 रु. मोजावे लागत होते. तर आता त्यासाठी 19.30 रु. मोजावे लागणार आहेत. तर अनब्रॅण्डेड सामान्य डिझेलवर सध्या एकूण एक्ससाइज ड्युटी 10.66 रु. आहे. मात्र आता त्यासाठी 11.83 रुपये मोजावे लागतील.
७- CBIला कामाचे पुर्णपणे स्वतंत्र्य आहे, दिल्लीच्या सचिव कार्यालयातून मिळालेला दस्तावेज न्यायालयात सादर केला जाईल - देवप्रीत सिंह, प्रवक्ता, CBI
८- सोने दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण, २५६९० रुपये प्रति तोळा
जागतिक बाजारपेठेतील मंदी आणि नकारात्मक संकेत मिळाल्यानंतर सोने उठाव कमी जालाय. तसेच मागणीतही घट झाल्याने सोने किंमतीत घसरण पाहायला मिळत आहे. दुसऱ्या दिवशीही सोने दरात घसरण झाली.मंगळवारी सोने दरात १६० रुपयांनी घट झाल्याचे पाहायला मिळाली. सोने २५,६९० रुपये प्रति १० ग्रॅम असा दर होता. तर चांदीचा भाव २०० रुपयांनी घटून ३३,५०० रुपये किलो दर होता.
``````````````
चार प्रमुख महानगरातील सोने आणि चांदीचा दर
दिल्ली - २५६९० (सोने), ३३५०० (चांदी)
मुंबई - २५२३० (सोने), ३३७२० (चांदी)
कोलकाता - २५६७० (सोने), ३३२५० (चांदी)
चेन्नई - ३३५०० (सोने), ३३२०० (चांदी)
``````````````
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- राज्यावर दुष्काळाचं मोठ संकट पण त्यावर दीर्घकालीन उपाययोजना करु - मुख्यमंत्री
राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या आणि दुष्काळ यावर विधानसभेत झालेल्या चर्चेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, दुष्काळाचे संकट केवळ सत्ताधारी पक्षाचे नाही. ते महाराष्ट्राचे संकट आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांना एकत्र मिळून काम केले पाहिजे. गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने दुष्काळ पडत असल्याचे दिसते. पावसाचे दिवसच कमी होत चालले आहेत. त्याचबरोबर त्यामध्ये मोठा खंड पडत असल्याचेही दिसते आहे. यावर दीर्घकालीन आणि तात्कालिक उपाय केले पाहिजेत. केवळ मदत करून शेतकऱ्यांचे भले होणार नाही. मदत आणि शेतकऱ्यांचे नुकसान याचे गणित कधीच जुळत नाही. यंदाच्यावर्षी शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले असले, तरी दुष्काळी वर्षांमध्ये आत्महत्या वाढतात, ही वस्तुस्थिती आहे. एकाही शेतकऱ्यांची आत्महत्या राज्याला भूषणावह नाही. त्यामुळे आकडेवारीत न पडता शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून कसे रोखता येईल, यासाठी सरकार उपाययोजना करते आहे.
१०- नागपूर - आता मागेल त्याला शेततळे मुख्यमंत्र्याची विधानसभेत घोषणा
११- विद्यार्थी वजनाच्या १० टक्केच दप्तराचे वजन हवे, सरकारचा धोरणात्मक निर्णय
विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून, विद्यार्थ्यांच्या वजनाच्या १० टक्के वजन दप्तराचे असावे. या दृष्टीने शिक्षण विभागाने कार्यवाही सुरु केली आहे. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरांचे ओझे अधिक असेल, अशा शाळांवर कारवाई करण्याऐवजी तेथील शिक्षक, संस्था चालक यांच्यासमवेत शिक्षणाधिकारी बैठक घेऊन त्यादृष्टीने उपाय काढण्यात येईल. विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी सरकार सकारात्मक असून नजीकच्या काळात आम्ही या विषयामध्ये नक्कीच यशस्वी होऊ, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी बुधवारी विधानसभेत व्यक्त केला.
१२- प्रजासत्ताक दिनी परेडमध्ये महाराष्ट्राचा चित्ररथ नाही
दिल्लीमध्ये येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या संचलन सोहळयामध्ये यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाला सहभागी होण्याची संधी मिळणार नाही. दरवर्षी 15 ते 16 राज्यांनाच सहभाग मिळतो, इतर काही राज्यांना ही संधी मिळत नाही. त्यामुळे रोटेशन पद्धतीनुसार यावेळी महाराष्ट्राचा चित्ररथ परेडमध्ये नसेल, अशी माहिती सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.
१३- लोकलमध्ये सीसीटीव्ही लावण्यात दिरंगाई का, हायकोर्टाने झापले
एकीकडे बुलेट ट्रेनच्या बाता करताना मुंबईतील लोकलमध्ये अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे का लावता येत नाहीत अशी शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत दाखल केलेल्या सुमोटोवर सुनावणी करताना न्यायालयाने आपलं मत नोंदवलं. तांत्रिक कारणांमुळे धावत्या रेल्वेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवता येत नसल्याचं सांगत शेकडो कोटींचा खर्च आहे असं स्पष्टीकरण रेल्वेतर्फे वकिलांनी कोर्टात दिलं. यावर नाराजी व्यक्त करत रेल्वे स्थानकावर असलेले सीसीटीव्ही कॅमेरे यंत्रणा ही अद्यावत करुन त्याचा तांत्रिक अहवाल न्यायालयात सादर करण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. महिलांसाठी रेल्वे प्रवास किती सुरक्षित आहे, याबाबत बोलताना महिन्याभरात सर्व रेल्वे स्थानकांवरील महिला शौचालये स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचे आदेशही कोर्टाने दिले. रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रेल्वे स्थानकावर महिलांच्या शौचालयाची अवस्था अतिशय भयावह आहे. रेल्वे स्थानकांवरील शौचालये घाण आहेत, त्यांना खिडक्या नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ही शौचालये सुरक्षित नाहीत, असं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं.
१४- डान्सबार बंदीसाठी महिला आमदारांची निदर्शने
डान्सबार बंदीच्या मागणीसाठी बुधवारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आमदारांनी नागपूरमध्ये विधीमंडळाच्या इमारतीबाहेर निदर्शने केली. डान्सबार बंदी झालीच पाहिजे अशा घोषणा यावेळी महिला आमदारांकडून देण्यात आल्या. काँग्रेसच्या आमदार वर्षा गायकवाड, दीप्ती चवधरी, राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील (आबा) यांच्या पत्नी आमदार सुमन पाटील यांच्यासह इतरही महिला आमदार या निदर्शनांमध्ये सहभागी झाल्या होत्या. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात बाजू प्रभावीपणे न मांडल्यामुळे डान्सबारवरची बंदी उठविण्यात आल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. डान्सबारमुळे अनेकांचे संसार उदध्वस्त झाले आहेत. त्यामुळे सरकारने डान्सबार बंदी केलीच पाहिजे, अशी मागणी यावेळी सुमन पाटील यांनी केली.
१५- मुंबई सेंट्रल स्टेशनवर जानेवारीपासून मोफत वायफाय; गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांची घोषणा
१६- राजीव गांधी जीवनदायी योजना जाहीर केल्यापासून आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये २४११८ शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला - मुख्यमंत्री
१७- ६१,२३,२५९ शेतकरी अन्नसुरक्षा योजनेचा लाभ घेत असून, आतापर्यंत १ लाख मेट्रिक टनाहून अधिक धान्य वाटप करण्यात आले आहे - मुख्यमंत्री
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१८- पुणे - कोथरुडच्या डाव्या भुसारी कॉलनीत शेडला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले असून आगीत अडकलेल्यांची सुटका
१९- नाशिक - त्रंबकेश्वरच्या ८ नगरसेवकांचा शिवसेनेत प्रवेश
२०- तिरुपति एयरपोर्ट - नातलगांना विमानतळावर प्रवेश न दिल्यामुळं संतापलेल्या YSR काँग्रेसचे खासदार मिथुन रेड्डी यांची विमानतळ कर्मचाऱ्याला मारहाण
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- चित्रकार गायतोंडेंच्या चित्राने रचला विक्रम, लिलावात २९ कोटींची बोली
भारतीय चित्रकार वासुदेव गायतोंडे यांच्या एका चित्रावर जवळजवळ 30 कोटींची बोली लागली. हा आगळावेगळा विक्रम रचला आहे. असं पहिल्यांदाच घडलं आहे की, एखाद्या भारतीय चित्रकारच्या चित्राला एवढी किंमत मिळाली आहे. लिलाव करणारी संस्था क्रिस्टीने मुंबईत मंगळवारी या चित्राचा लिलाव केला. क्रिस्टी संस्थेच्या मते, वासुदेव गायतोंडे यांनी 1995 मध्ये विनाशीर्षक रेखाटलेलं हे चित्र एका अज्ञात व्यक्तीने खरेदी केलं आहे. यासाठी त्याने 29 कोटी 30 लाख 25 हजार मोजले आहेत. वासुदेव गायतोंडे हे भारतातील प्रसिद्ध चित्रकारांपैकी एक होते. 2001 साली त्यांचे निधन झाले.
२२- 'बाजीराव-मस्तानी'- 'दिलवाले' एकाच दिवसी प्रदर्शित होणार
येत्या शुक्रवारी दोन बिग बजेट सिनेमे आमने-सामने येणार आहेत.. शाहरुख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शन्सचा दिलवाले आणि संजय लिला भंसाळी यांचा बाजीराव मस्तानी हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होतायेत.. मात्र प्रदर्शित होण्यापूर्वीच या दोन्ही सिनेमांमध्ये युद्ध रंगलंय. मुंबईतल्या सिंगल स्क्रीनवर सध्या संजय लिला भंसाळी यांच्या बाजीराव मस्तानीचं वर्चस्व पहायला मिळतंय... ओव्हरऑल पाहता पंजाबमध्ये सिंगल स्क्रिन चित्रपटगृहांची संख्या कमी असल्यामुळे, तिथे 'दिलवाले'च्या वाट्याला जास्त शोज आले आहेत.. तर दुसरीकडे दिल्ली आणि महाराष्ट्रमध्ये बाजीराव मस्तानीचं वर्चस्व दिसून येतंय..
२३- देशात असहिष्णुतासारखे वातावरण नाही, सर्व काही व्यवस्थित सुरु आहे - शाहरुख खान
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२४- दुष्काळ मुक्ती साठी प्रत्येकाने आपले योगदान दिले पाहिजे-सुरेश घोळवे
http://goo.gl/whWjhL
~~~~~~~~~~~~~~~
२५- सगरोळी; पत्रकार यादव लोकडे यांना राष्ट्रीय पुरस्कारने सन्मानित
http://goo.gl/pCV0Pg
~~~~~~~~~~~~~~~
२६- महाराष्ट वैद्यकीय प्रतिनिधी संघटनेचे नांदेड शाखेच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर
http://goo.gl/tdlBUx
~~~~~~~~~~~~~~~
२७- गावाची पत आणि प्रतिष्ठा वाढवायची असल्यास गावात कायमस्वरुपी स्वच्छता असणे आवश्यक आहे - निर्मलग्राम प्रणेत्या प्रणिताताई देवरे-चिखलीकर
http://goo.gl/0UReZD
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
औदार्य म्हणजे तुमच्या क्षमतेपेक्षा अधिक देणं...
आणि आत्मसन्मान म्हणजे तुमच्या गरजेपेक्षा कमी घेणं
[विजय हिंगोले, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
सध्याच्या घडामोडी पाहता पाकिस्तान दाउदला भारताच्या ताब्यात देईल का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
वाढदिवसाचे चॉकलेट, 'आय.लव्ह.यु.' चॉकलेट, 'Thanks' चॉकलेट, 'Congratulation' चॉकलेट, 'Lips' Shapeचॉकलेट, 'Hurt'
Shapeचॉकलेट.
खाण्यासाठीचे पोटलीचे चॉकलेट, गिफ्टसाठी पॅकिंगचे चॉकलेट...
ढिंचाक चॉकलेट होममेड असून शुद्ध शाकाहारी आहेत.
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment