Wednesday, 9 December 2015

नमस्कार लाईव्ह ०९-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०९-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
 [आंतरराष्ट्रीय]
१- दाऊदच्या रेस्टॉरंटचा आज लिलाव, 1 कोटी 18 लाखांपासून बोली
                    अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम देशाबाहेर पळून गेला असला तरी त्याच्या मालमत्तेवर सरकार आता टाच आणणार आहे. भेंडीबाजारमध्ये दिल्ली जायका रेस्टॉरंट हे दाऊदच्या मालिकाचं हॉटेल आहे. याचा लिलाव आज पार पडणार आहे. या रेस्टॉरंटसाठी तब्बल 1 कोटी 18 लाखांपासून बोली लावली जाणार आहे. पोलिसांनी या लिलाववर नजर ठेवण्यासाठी कंबर कसलीये.  नागपाडा परिसरात दाऊदच्या मालकीचं मुंबईतलं दिल्ली जायका रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट छोटे असून त्याची दुरावस्था झालीये. पण, मुंबईच्या मुख्यमार्केटमध्ये हे रेस्टॉरंट आल्यामुळे याची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. 80 च्या दशकात पोलिसांनी दाऊदच्या विरोधात फास आवळला होता तेव्हा त्याने देशातून पळ काढला होता. दिल्ली जायका रेस्टॉरंट हे दाऊदच्या कमाईचा एक भाग आहे. 1993च्या बॉम्बस्फोटांनंतर सीबीआयनं हे रेस्टॉरंट जप्त केलं होतं. सरकार आता या रेस्टॉरंटचा लिलाव करणार आहे 

२- दहशतवाद, कट्टरतावाद आपल्या सर्वांचा समान शत्रू आहे. आपण एकत्र राहूनच या विरोधात लढू शकतो - नवाझ शरीफ
३- शेजारी देशांबरोबर चांगले संबंध ठेवण्यासाठी पाकिस्तान कटिबध्द असून, विकासासाठी शांतता आवश्यक आहे - नवाझ शरीफ
४- पाणबुडीतून इसिसच्या तळावर क्षेपणास्त्र हल्ला केल्याची रशियाची माहिती
~~~~~~~~~~~~~~~
 [राष्ट्रीय]
५- परराष्ट्रमंत्री स्वराज दोन दिवसांच्या पाक दौऱ्यावर
                दोन दिवसांच्या पाक दौऱ्यावर आज परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज आणि पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेण्याची शक्यता आहे. 'हार्ट ऑफ एशिया' परिषदेसाठी स्वराज सध्या पाकिस्तानात गेल्या आहेत. पाक सरकारचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीझ आणि स्वराज यांची काल संध्याकाळी इस्लामबादमध्ये चर्चा झाली. त्यानंतर आज रात्री मायदेशी परत येण्याआधी स्वराज यांचा पाकच्या पंतप्रधानांना भेटणार असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. 

६- सरकारच्या गोल्ड योजनेत सिध्दीविनायक मंदिर ४० किलो सोने गुंतवणार
                         देशातील प्रसिध्द आणि श्रीमंत देवस्थानांपैकी एक असलेल्या मुंबईतील सिद्धीविनायक देवस्थानाने आपल्या जवळील ४० किलो सोने केंद्र सरकारच्या गोल्ड मॉनिटायझेशन स्किममध्ये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. यातून देवस्थानाला वर्षाला ६९ लाख रुपयांचे व्याज मिळणार आहे.

~~~~~~~~~~~~~~~
 [राज्य]
७- महाराष्ट्राची अखंडता हा ‘बंदा’ रुपया, सेनेनं फटकारलं
                   विदर्भाच्या मुद्द्यावरून शिवसेनेनं सामनातून मुख्यमंत्री आणि भाजपवर घणाघाती हल्ला चढवलाय. महाराष्ट्राचा इतिहास आणि हिंमत विसरलेल्यांच्या हाती राज्याची सूत्रे गेलीये अशी टीका शिवसेनेनं ‘सामना’तून केलीये. तसंच महाराष्ट्राची अखंडता ही बंदा रुपया आहे असं सांगत सेनेनं भाजप आणि श्रीहरी अणेंना फटकारलंय.

८- राज्यात 2 नव्या महापालिका, पनवेल आणि अंबरनाथसाठी प्रस्ताव
                      महामुंबई परिसरात दोन नव्या महापालिका स्थापण्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. हा प्रस्ताव आहे पनवेल आणि अंबरनाथ या दोन नव्या महापालिका स्थापन करण्याचा एमएमआरडीएने याचा आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेतील तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ, कुळगाव-बदलापूर नगरपालिकांचे एकत्रितकरण करुन अंबरनाथ ही नवी महानगरपालिका तर नवी मुंबईत परिसरातील उलवे, नवीन पनवेल, कळंबोली आणि खारघर यांचा पनवेल महानगरपालिकेत समावेश करुन एक नवी महानगरपालिका स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. एमएमआरडीएच्या 26 ऑगस्ट रोजी झालेल्या बैठकीत प्रारुप प्रस्तावास मान्यता देण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली 

९- विधानपरिषदेसाठी कोल्हापूरातून काँग्रेसची सतेज पाटील यांना उमेदवारी निश्चित
१०- वातानुकूलित डबलडेकर कोकणवासियांच्या सेवेत, आठवडयातून तीन दिवस लो. टिळक टर्मिनस-मडगाव या मार्गावर ही गाडी धावणार
११- पुण्यातल्या सुधारगृहातून 38 महिला फरार, 18 जणींना पकडलं, 20 जणी अजूनही बेपत्ता
                   पिटा अ‍ॅक्टअंतर्गत या महिलांना अटक करण्यात आली होती. पळून गेलेल्या 38 महिलांपैकी 18 महिलांना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे, तर 20 महिला अद्याप फरार आहेत. यात बांगलादेशी महिलांचा समावेश आहे. 

१२- राज्यभरात दोन दिवस खासगी शाळा बंद, शिक्षण बचाव समितीचं आंदोलन
                        शिक्षण हक्क बचाव समितीच्या आंदोलनानुसार आज आणि उद्या महाराष्ट्रातल्या खासगी शाळा बंद राहणार आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी शिक्षण हक्क बचाव समितीने हे आंदोलन छेडलं आहे. विनाअनुदानित शाळांना अनुदान, शिक्षणहक्क कायद्यातला तरतूदी यासारख्या महत्वाच्या मागण्यांसाठी दोन दिवस राज्यातल्या खासगी शाळा बंद राहणार आहेत. आपल्या मागण्यासाठी काल वर्ध्याहून 15 हजार शिक्षकांची दिंडी नागपूरच्या दिशेने निघाली आहे. त्यामुळे आज जर संपावर तोडगा निघाला नाही तर उद्याच्या दिवशीही राज्यातल्या खासगी शाळा बंद राहणार आहेत.

१३- ५० मिनिटे हृदय बंद पडूनही रुग्ण बचावला
                          अहमदाबाद: हृदय सुमारे ५० मिनिटे बंद पडूनही एक रुग्ण बचावण्याची वैद्यकीय चमत्कार वाटावा अशी विरळा घटना गुजरातमध्ये घडल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. अशा प्रकारे पुनर्जन्म झालेल्या या ५० वर्षांच्या रुग्णाचे नाव राजेंद्र पटेल असे असून ते साणंद येथील व्यापारी आहेत. पटेल यांना गेल्या आठवड्यात इस्पितळातून घरी सोडण्यात आले व आता त्यांची प्रकृती हळुहळु सुधारत आहे. 

~~~~~~~~~~~~~~~
 [प्रादेशिक]
१४- मुंबईतील दिवा-शिळ रोड रात्री धुराचं साम्राज्य
                ठाण्यातील दिवा परिसरात धुराचं साम्राज्य पसरलंय. तिथल्या डंपिंग ग्राऊंडचा धूर संपूर्ण परिसरात पसरलाय. त्यामुळे नागरिक भयभीत झालेत. या दिवा डम्पिंग ग्राऊंडमधून उठलेल्या धुरामुळे महानगरपालिकेच्या एका अधिकाराऱ्याला त्रास झाल्याचं समजतंय. त्यांना तातडीनं ज्युपिटर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी मनपा मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करणार आहे.  या धुरामुळे अनेकांना श्वसनाला त्रास होतोय. धुरामुळे कल्याण - शीळ रस्त्यावर रिक्षा आणि डंपरचा अपघातही झालाय. त्यात तिघेजण जखमी झाले. या डंपीग ग्राऊंडमध्ये केमीकल मिक्स झाल्यानं धुराचे लोट पसरु लागल्याचं सांगण्यात येतंय. 

१५- नवी मुंबई स्मार्ट सिटी नको !, सत्ताधारी राष्ट्रवादीचाच विरोध
१६- पुणे-नाशिक महामार्गावर चाकणजवळ भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांवर काळाचा घाला
१७- महाबळेश्वर-पाचगणी रोडवर एसटी आणि ओम्नीचा अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
१८- गोंदिया : फूटवेअरच्या गोदामामध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी
१९- संजय गांधी नॅशनल पार्क परिसरात बांधकामबंदी
२०- मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीजवळ एसटी-ट्रकच्या अपघातात ११ प्रवासी जखमी. एसटी चिपळूणहून रत्नागिरीला जात होती
२१- अहमदनगरच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे राजकीय वादातून गोळीबार
२२- कोलकात्याच्या इन्फिनिटी इमारतीत आग लागल्याचे वृत्त, सहा फायर इंजिन घटनास्थळी दाखल
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- अभिनेत्री राणी मुखर्जीला कन्यारत्न
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२४- मनपा स्थायी समितीचे सभापती अनुजा तेहरा; औपचारिक घोषणा बाकी, डाक्त काँग्रेसकडून उमेदवारी दाखल
२५- निखळ ग्रामीण साहित्याला वाहिलेल्या 'रानफुल'चे प्रकाशन रानातच
२६- जिल्ह्यात फळपिक विमा योजना लागू, १० डिसेंबर विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत
२७- ऑटो-रिक्षा परवान्यासाठी १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
२८- नगरेश्वर वैश्य मंदिर करणार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींचे कन्यादान - अध्यक्ष दिलीप कांद्कुर्ते
२९- जिल्हा परिषदेची १४ डिसेंबर रोजी सर्वसाधारण सभा
30- शहरातील सोनोग्राफी सेंटरचा आज बंद, कायद्यातील जाचक अटी, त्रासदायक तरतुदी शिथिल करण्याची मागणी
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
३१- दत्त जयंतीचे औचित्य साधून नांदेड ते माहूर पदयात्रेचे आयोजन
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, लिंकला क्लिक करून--
स्वतंत्र विदर्भाची मागणी योग्य आहे का?
अ- होय
ब- नाही
क- तटस्थ
~~~~~~~~~~~~~~~
 [वाढदिवस]
रोहित वानखेडे, अमर काटोके, अक्षय यम्मलवार, बालाजी कांबळे, महेश दंगे, रुपेंद्र गोविंदवार, श्याम कवाळे, धनराज श्रीरामवार, त्रिलोचन बम्बृळे, ओमप्रकाश झंवर, विनीद डवरे, विन्सिंत चांदमी, संतोष सावंत, बंटी धुमाळ, प्रशांत तीकांडे, सतीश भोरे, निलेश सूर्यवंशी, निलेश केणेकर, महेंद्र कवडे, अमोल क्षीरसागर, राहुल शाह
~~~~~~~~~~~~~~~
 [सुविचार]
शब्दामुळेच जुळतात मणामणाच्या तारा आणि शब्दामुळेच चढतो एखाद्याचा पारा, शब्दच जपून ठेवतात गोड आठवणी आणि शब्दामुळेच तरळते डोळ्यात पाणी....
म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456,
8975495656

No comments: