दिपीप ठाकूर--
नांदेड- मराठवाड्यावरचे दुष्काळाचे सावट दुर व्हावे व आधुनिक भारताचे आशास्थान असणारे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना दीर्घायुष्य लाभावे यासाठी दत्त जयंतीचे औचित्य साधून नांदेड ते माहूर पदयात्रेचे सतत आठव्या वर्षी 19 ते 25 डिसेंबर पर्यंत भाजपातर्फे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयोजक धर्मभूषण अँड.दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे पदयात्रेमध्ये सहभागी होणा-या सर्व भाविकांची भोजनाची व निवासाची तसेच परतीच्या प्रवासासाठी बसेसची व्यवस्था मोफत करण्यात येणार आहे.अर्धापूर,भुवनेश्वर, मानवाडी,उमरखेड,महागांव या ठिकाणी मुक्कामाची व्यवस्था करण्यात येणार आहे.मुक्कामाच्या ठिकाणी भजन -किर्तन करण्यात येते.कलागुणांना वाव मिळावा यासाठी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. रस्त्यामध्ये लागणा-या प्रत्येक गावात स्वच्छता अभियान राबविण्यासाठी जनजागृती करण्यात येणार अाहे.केंद्र व राज्य शासनाच्या सर्व कल्याणकारी योजनाची माहिती गावागावात जाहीर सभेद्वारे देण्यात येणार आहे.पदयात्रेकरूंचे सामान ठेवण्यासाठी ट्रक व औषधोपचार्याने परिपुर्ण असलेली रूग्णवाहिका सोेबत राहणार आहे.इच्छुकांनी आपली नांवे 17 डिसेंबर पर्यंत पासपोर्ट फोटोसह भाऊ ट्रव्हल्स,कलामंदिर,नांदेड येथे नोंदवावी असे आवाहन संयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment