नमस्कार लाईव्ह १५-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- अमेरिका इसिस विरोधात यापूर्वी केलेल्या कारवाईपेक्षा अधिक कठोर कारवाई करत आहे - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- दिल्लीत अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयची छापेमारी, कार्यालय सील
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यालयावर सीबीआयने छापेमारी केली आहे. सीबीआयने मुख्यमंत्री कार्यलय सील केलं आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीच याबाबतची माहिती ट्विटद्वारे दिली.
३- केजरीवालांना अडकवता यावे यासाठी सर्व फाईल्स तपासल्या, हे सूडाचे राजकारण - आशुतोष, आप नेते
४- मोदी भित्रे आणि मनोरुग्ण, CBI छापेमारीनंतर केजरीवालांचं टीकास्त्र
५- सीबीआयचा राजकीय वापर मोदींना महाग पडेल - कपिल मिश्रा, आप मंत्री
६- केजरीवालांच्या कार्यालयावर नव्हे तर, मुख्य सचिवांच्या कार्यालयावर छापा मारल्याच सीबीआयच स्पष्टीकरण
७- सीबीआयचा गैरवापर केल्याचा आरोप सर्वच पक्षांवर झाला आहे. कारवाई झाल्यानंतर केजरीवालांनी संयम ठेवायला पाहिजे होता. देशाच्या पंतप्रधानांबद्दल अशी भाषा वापरणे योग्य नाही - संजय राऊत
८- पंतप्रधान नरेंद्र मोदीसमोर नौदल करणार शक्तीप्रदर्शन, युध्दनौका आणि मिग-२९ लढाऊ विमाने होणार सहभागी
९- कोळसा घोटाळा प्रकरण - तपास पुर्ण करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने CBI ला ३१मार्च, २०१६ पर्यंत मुदत दिली
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१०- मुंबई - स्मार्ट सिटी प्रस्ताव मंजूर होण्याचे संकेत, शिवसेना उपसूचनांसह प्रस्तावाला पाठिंबा देणार
केंद्र सरकारकडे स्मार्ट सिटीचा आराखडा 15 डिसेंबरपर्यंत पाठविण्याची मुदत आहे. सर्वसाधारण सभेने नऊ डिसेंबर रोजी आराखड्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव 4 जानेवारीपर्यंत लांबणीवर टाकला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आराखड्याबाबत निर्णय घेण्याचा विशेष आदेश दिला. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही त्याला मंजुरी देण्याची भूमिका घेतली. त्यामुळे सोमवारी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत अखेर हा प्रस्ताव मंजूर झाला.
११- बुलेट ट्रेनला शिवसेनेचा विरोध, आधी लोकल नीट करा, संजय राऊतांचा केंद्र सरकारला सल्ला
मेट्रोसाठी 1 लाख कोटींचं कर्ज घेता, मग मराठवाडा, विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी का नाही? असा सवालही संजय राऊत यांनी विचारला आहे. याशिवाय काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांनीही बुलेट ट्रेन प्रकल्पाला विरोध केला आहे. दरम्यान, भारतातील पहिली बुलेट ट्रेन मुंबई ते अहमदाबाद या मार्गावर धावणार आहे. 50 किलोमीटर लांबीच्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर ताशी 300 किमीच्या वेगाने बुलेट ट्रेन धावणार अशी योजना आहे. जपानने बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी 90 हजार कोटी रुपयांचं कर्ज देण्याची ऑफर दिली आहे. जपानची एजन्सी जीकानुसार, मुंबई-अहमदाबाद या मार्गावरील बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी 98 हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
१२- शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशींवर आज पुण्यात अंत्यसंस्कार, दुपारी 1 वाजेपर्यंत मुठा नदीपात्रात अंत्यदर्शन घेता येणार
१३- मुंबईच्या लोखंडवाला परिसरात एका फ्लॅटमध्ये डान्सबार
मुंबईतल्या उच्चभ्रू लोखंडवाला परिसरातल्या एव्हर शाईन क्लासिक टॉवरच्या एका फ्लॅटमध्ये चक्क डान्स बार थाटून बसलेल्या 6 जणांना पोलिसांनी अटक केलीय. इमारतीतल्या फ्लॅट नंबर 201मधून या सहा जणांव्यतिरिक्त 6 मुलींनाही पकडण्यात आलंय. रहिवासी भागात एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या याप्रकारामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप आणि नाराजीचं वातावरण आहे. याप्रकरणी फ्लॅटच्या मालकालाही अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे यातले बहुतांश लोक सरकारी अधिकारी आहेत.
१४- हिमाचलप्रदेशमध्ये १ एप्रिल २०१६ पासून दहावर्ष जुनी वाहने चालवण्यावर बंदी
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- हेमा उपाध्याय, हरीश भंबानी प्रकरण; आम्ही हेमाची हत्या केली; 5 लाखांसाठी हत्या केल्याची कबुली
चित्रकार आणि शिल्पकार हेमा उपाध्याय आणि त्यांचे वकील हरीश भंबानी यांची 5 लाखांसाठी हत्या केल्याची कबुली शिवकुमार उर्फ साधू राजभर या आरोपीनं दिली आहे. कबुलीचा हा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती लागला आहे. तसंच नुकतंच आणखी तिघांना अटक केल्याची माहिती मिळते आहे. हत्येची कबुली देणारा शिवकुमार राजभर हा मुख्य आरोपी विद्याधर राजभरचा साथीदार आहे. काल वाराणसीमधून त्याला अटक करण्यात आली असून आज त्याला मुंबईत आणलं जाणार आहे. या प्रकरणातला मुख्य आरोपी विद्याधर राजभर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.विद्याधर आणि हेमा उपाध्याय यांच्यात पाच लाख वीस हजार रूपयांवरून वाद झाला होता. त्यानंतरच विद्याधरने हेमा उपाध्याय यांच्या हत्येचा कट रचला. हेमाचे पती चिंतन उपाध्याय यांच्या संपर्कातही तो होता, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे.
१६- लातूरमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर, दवाखान्यावर एसीबीची धाड
उस्मानाबाद : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या घर आणि दवाखान्यावर एसीबीने धाड मारली आहे. उस्मानाबाद, लातूर जिल्हयातील ६ ठिकाणी लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकाच वेळी धाड टाकली. डॉ. मोरताळे यांच्या घर, दवाखाना आणि बँकेतील लोकर्सवर एकाच वेळी एसीबीच्या धाडी सुरु झाल्यात. अवैध मार्गाने कोट्यवधींची संपत्ती जमवल्याचा डॉ. मोरताळे सुभाष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. डॉ. मोरताळे हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक (वर्ग १) म्हणून पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यांचा लातूर शहरात खासगी दवाखाना आहे.
१७- मुंबईकरांचा आता एक्स्प्रेसमधूनही 'लोकल' प्रवास
लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांवर काय करता येईल, याची चाचपणी सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता प्रवाशांचा गर्दीतील प्रवास सुकर करण्यासाठी मध्य रेल्वेकडून विविध पर्याय शोधले जात आहेत. त्यासाठी सकाळच्या वेळेत सीएसटीकडे येणार्या लांब पल्ल्याच्या (एक्स्प्रेस) ट्रेनमधूनही प्रवासास मुभा देण्याचा प्रस्ताव मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला आहे. डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा सीएसटीकडे येणार्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्यानंतर मध्य रेल्वेने हा नवा प्रस्ताव तयार केलाय. प्रथम तीन एक्सप्रेस गाड्यांचा यात समावेश करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आलेय.
१८- फेसबुकवरील मैत्री जीवावर, अल्पवयीन मुलीची आत्महत्या
धारावीतील १७ वर्षीय मुथ्थुसेल्वी या कॉलेज तरुणीची ओळख फेसबुकवरून इलायराजा वेलपांडी (२१) याच्याशी झाली. फेसबुकवरून झालेल्या ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि वेलपांडी तिच्या एकतर्फी प्रेमात पडला होता, अशी माहिती आता पोलीस तपासात पुढे येत आहे. मूळचा तामिळनाडू येथील रहिवासी असलेला वेलपांडी धारावी परिसरात राहतो. सात महिन्यांपूर्वी त्याची फेसबुकच्या माध्यमातून मुथ्थुसेल्वीसोबत ओळख झाली. मुथ्थुसेल्वी आपल्याच परिसरात राहत असल्याचे समजताच, वेलपांडी तिच्या येण्या-जाण्याच्या मार्गात थांबायचा. तिच्या एकतर्फी प्रेमात पडलेल्या वेलपांडीने तिच्या कॉलेजपर्यंत मोर्चा वळविला होता. तो आपली छेडछाड करतोय, हे तिच्या लक्षात येताच ती बैचेन झाली आणि त्यातून तिने आत्महत्या केल्याचे पुढे आलेय.
१९- खोकल्याने मुंबईकर हैराण
देशभरात थंडीची लाट वाढत असतांना, मुंबईच्या वातावरणात काहीसा गारवा निर्माण होत असतांना, मुंबईकर हैराण आहेत खोकल्याच्या साथीने, ऋतूचक्रातील बदलामुळे फैलावलेला खोकला चांगलाच वाढलाय. दहा दिवस झाल्याशिवाय हा खोकला जात नाही, हे सुद्धा दिसून सुरूवातीला प्रचंड डोकेदुखी, घसादुखी, घशात खवखवणे, आवाज बसणे यांसारख्या प्रकार वाढत आहेत. सकाळी उठल्यानंतर आणि रात्री झोपताना खोकल्याचा जोर वाढत जातो.
२०- मध्यप्रदेशात होशंगाबाद येथे भीषण अपघात, बस उलटून १५ ठार, २० जखमी
२१-सकाळी आठच्या सुमारास बिहारमधील गया, जमुई तर झारखंडमधील देवघर, धनबाद, दुमका, गोड्डा, जामताडा, रांची येथे जाणवले भूकंपाचे सौम्य धक्के
२२- बिहारच्या रोहटास भागात पहाटेच्यासमयी ट्रकने पाच पोलिसांना चिरडले. दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२३- 21व्या शतकातला देशी खेळ रोलबॉलची दशकभरात मोठी मजल, पुण्यात आजपासून रोलबॉलचा तिसरा विश्वचषक
२४- पुणे -राजकोटसाठी खेळाडूंचा लिलाव; चेन्नई,राजस्थानच्या खेळाडूंना जीवदान
आयपीएलच्या पुणे आणि राजकोट या दोन नव्या संघांसाठी आज खेळाडूंचा लिलाव होणार आहे. महेंद्रसिंग धोनी, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, सुरेश रैना या नावाजलेल्या खेळाडूंचा लिलाव होणार आहे. चेन्नई आणि राजस्थान या संघांतील खेळाडूंबरोबर इतर काही खेळाडूंचाही या वेळी लिलाव करण्यात येणार आहे. त्यामुळे या नव्या संघांमुळे खेळाडूंना पुन्हा एकदा मैदान मोकळे होणार आहे.
२५- आयपीएल २०१६ रविंद्र जाडेजा, सुरेश रैना राजकोट संघाकडून खेळणार
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२६- जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अधिकारी फैलावर, टंचाई. दलित वस्ती, शिक्षणाचा विषय ऐरणीवर
२७- सर्वसाधारण सभा; समाजकल्याण विभागातील महापुरुषांच्या प्रतिमा अवमान प्रकरणी सभागृहाच्या निदर्शनास आणून देताच मोठा गोंधळ
२८- कंधार - उमरज संस्थानने घेतल्या गाई दत्तक, दोनशे जनावराच्या चारा-पाण्याची व्यवस्था
२९- खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारला धडा शिकवू; नानासाहेब जावळे पाटील यांचा इशारा
३०- बहुजन,दलित, आदिवासी आदींच्या एकीची गरज; लोह्यातील कार्यक्रमात आनंदराज आंबेडकर
३१- ग्रामीण भागातील अनधिकृत बांधकामांना लगाम; तहसीलदार किंवा जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी बंधनकारक
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
३२- राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस मुखेड तर्फे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण, आजचा तिसरा दिवस
http://goo.gl/wnxWPT
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
ज्यांचे कर्म चांगले तो कधीच संपत नसतो, सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात...
याउलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही....
[गणेश सुतार, नमस्कार लाईव्ह]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
सध्याच्या घडामोडी पाहता पाकिस्तान दाउदला भारताच्या ताब्यात देईल का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
वाढदिवसाचे चॉकलेट, 'आय.लव्ह.यु.' चॉकलेट, 'Thanks' चॉकलेट, 'Congratulation' चॉकलेट, 'Lips' Shapeचॉकलेट, 'Hurt' Shapeचॉकलेट.
खाण्यासाठीचे पोटलीचे चॉकलेट, गिफ्टसाठी पॅकिंगचे चॉकलेट...
ढिंचाक चॉकलेट होममेड असून शुद्ध शाकाहारी आहेत.
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456
8975495656

No comments:
Post a Comment