मुखेड :-शेख बबलु मुल्ला प्रतिनिधी
यंदा दुष्काळामुळे सर्वत्र भयानक परिस्थीती आहे. विहीर कोरडया पडल्या आहेत.तालुक्यात पाणीटंचाई ची समस्या गंभीर आहे .मुखेड तहसीलदार सुरेश घोळवे मागील आठवड्यात दोन दिवस टँकर बोअरवेल अधिग्रहण च्या चौकशी साठी तालुक्यातील काही गावांत गेले असता त्यांच्या निदर्शनास आलेले बाबी
आधीग्रहन केलेल्या प्रत्येक ठिकाणी बोअरवेल मधून पाणी घेतले जाते. ज्या हौदात किंवा विहिरीत पाणी जमा होते तिथे तळभाग स्पष्ट दिसत नाही. यावरून पाण्यात मोठया प्रमाणात क्षार असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे भविष्यात किडनी, व इतर आजार उदभवू शकतात. आपणास पुन्हा पूर्वीसारखे दिवस पाहायचे असतील तर आजपासून सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत.
पाणी पातळी वाढविण्यासाठी -
शासकीय यंत्रणा जेव्हा काम करते तेव्हा लोकांनी सक्रियपणे लाभ घेतला पाहिजे.
तसेच आपण लोक वर्गणी गोळा करून दरवर्षी गावात अनेक कार्यक्रम/उत्सव घेत असतो.
एक वर्ष जर आपण " पाणी अडवा, पाणी जिरवा व पाणी साठवा" यासाठी निवडले तर प्रत्येक गावातील परिस्थिती बदलू शकते.
यासाठी -
1. नाला रूंदीकरण व नाला खोलीकरण संपूर्ण पणे राबविणे
2. शासकीय गायरान जमीनीवर उतारास आडवे खोल चर खोदणे
3. विहीर पुनर्भरण
4. गावातील प्रत्येक घरात शोषखडडे तयार करणे
5. खाजगी पडीक जमीनीवर उतारास आडवे खोल चर खोदणे
अनेक ठिकाणी तीन चार बोअर मारून ही पाणी लागत नाही अशी चर्चा गावातील लोक करीत आहेत.
अशा वेळी प्रत्येकाने जर आपली पूर्वीची विहीर किंवा बोअरवेल असेल तर नवीन बोअर न घेता त्यावर होणारा खर्च पहिल्या विहीर किंवा बोअरवेल चे पाणी वाढविण्यासाठी काय करता येईल यासाठी करावा.
या शिवाय ग्रामीण भागातील अनेक लोक शासकीय निमशासकीय सेवेत असतात. त्यांनी जर गावातील त्यांच्या स्वतः जमीनीवर जलसंधारण उपाययोजना करण्यासाठी फक्त एक महिन्याचे वेतन खर्च केले तर कमीतकमी कालावधीत आपल्या सभोवतालची परिस्थिती बदलू शकते.
मिञहो,
" मानवाने आपल्या सभोवतालची परिस्थिती बदलण्यासाठी जाणीव पूर्वक केलेले प्रयत्न म्हणजे आधुनिकीकरण होय "
आपण जर स्वतःला आधुनिक म्हणवून घेत असू तर प्रत्येकाने दुष्काळ मुक्ती साठी आपले योगदान दिले पाहिजे.

No comments:
Post a Comment