'इंटक सह सर्व संघटनेच्या कर्मचा-यांचा समावेश '
मुखेड :- रियाज शेख
औद्यागीक कलह कायदा १९४८ मधील तरतुदीनुसार कामगार करार मोडीत काढण्यात यावा व एम.एस.ई.बी. प्रमाणे 25% पगारवाढ करावी सह अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स काँग्रेस इंटक च्या वतीने पुकारलेल्या बेमुदत संपाला मुखेड आगारातील सर्वच संघटनातील ३३० कर्मचा-यांनी पाठिंबा देत संपामध्ये सहभाग नोंदवला. संपादरम्यान मुखेड आगारातील एक ही एसटी बस बाहेर जाऊ दिली नाही. अशी माहीती मुखेड इंटक चे सचिव डि.एस.जाधव यांनी दिली.
एसटी महामंडळातील कर्मचा-यांचे पगार सरकारी व इतर महामंडळातील कर्मचा-यांपेक्षा तुटपंजे आहेत. वाढती महागाई, कौटुंबिक अडीअडचणी, गृहकर्ज, वैद्यकिय खर्च, मुलांचे विवाह, शिक्षण खर्च, आदीमुळे कर्मचारी कर्जबाजारी झाले आहेत. यामुळे काही कर्मचा-यांनी आत्महत्या केल्याच्याही घटना घडल्या आहेत. हजारो कोटींचा तोटा असलेल्या महावितरण ने पगारवाढ दिली. तेलंगणा एसटी कर्मचा-यांनाही ४४ % टक्के पगारवाढ मिळाली आहे. मग राज्य परिवहन मंडळ पगार का वाढवत नाही. असा प्रश्न मुखेड आगारातील कर्मचारी संतोष कांबळे यांनी उपस्थित केला.
संपाची माहीती मिळताच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष पत्रकार शेख रियाज, नवनाथ भद्रे, मिलिंद कांबळे, शेख महेताब, भोईवाडे सुर्यकांत, संजय पिल्लेवाड, आदी पत्रकारांनी आगार जाऊन संपक-यांची भेट घेतली. यावेळी मुखेड इंटक चे सचिव डि.एस. जाधव यांनी सांगीतले की, औद्यागीक कलह कायदा १९४८ मधील तरतुदीनुसार कामगार करार मोडीत काढण्यात यावा, एम.एस.ई.बी. प्रमाणे 25% पगारवाढ करावी, कनिष्ठ वेतणश्रेणी कर्मचा-यांना दि.१ एप्रिल २०१२ पासुन नियमित वेतणश्रेणीमध्ये येताना कराराचा फायदा देण्यात यावा. चालक-वाहक यांचे ड्यूटी अलोकेशन संगणीकृत करुन टी-९ रोटेशन टी अंमलबजावणी करण्यात यावी. महिला कर्मचा-यांना कायद्यानुसार मिळणा-या सोई सवलती देण्यात याव्यात आदी सह अन्य मागण्यासाठी आज दि.१७ डिसेंबर पासुन महाराष्ट्रात एसटी कर्मचा-यांनी बेमुदत संप पुकारला असुन यास मुखेड आगारातील सर्वच संघटनेच्या कर्मचा-यांनी पाठींबा देत सहभाग नोंदवला आहे. या संपास पाठिंबा देण्यासाठी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, काँग्रेसचे तालुका सरचिटणिस श्रावण रँपनवाड, नंदकुमार मडगुलवार, भाजपाचे अशोक गझलवाड, आदींनी भेट दिली.
यासंपादरम्यान बाहेरुन एस.टी.बस आनणा-या चालकाचा पुष्पहार घालुन गांधिगीरी ने स्वागत करण्यात आले. इंटक सह सर्वच संघटनेच्या कर्मचा-यांनी संपामध्ये सहभागी झाल्याने मुखेड येथील एकही बस आगारबाहेर न गेल्याने प्रवाश्यांची मोठी गैरसोय झाली.
यावेळी एसटी कर्मचारी शिकारे, एस.पी.गोणारकर, मेथे, जोगदंड, पोतदार, शेख शब्बीर, शेटवाड, आय.बी.गोरे, रोडगे आदी सह सर्व कर्मचारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment