नमस्कार लाईव्ह १८-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
१- शनिशिंगणापूर मंदिरात महिलांना प्रवेश मिळावा म्हणून, विधानसभेच्या आवारात महिलांची निदर्शने
२- आयसिसच्या विचारसरणीने प्रभावित झालेल्या अल्पवयीन मुलीचं मतपरिवर्तन, मुलीच्या संपर्कात असणाऱ्या सोहराबुद्दीनला राजस्थानमध्ये अटक
आयसिसच्या संपर्कात आलेल्या पुण्यातील मुलीला एटीएसने आयसीस नेटवर्कमधून बाहेर काढलं आहे. राजस्थानमध्येअटक झालेल्या इंजिनियरने याबाबत माहिती दिली होती. इंजिनियरने स्थापन केलेल्या फेसबुक नेटवर्कमधून या मुलीशी संपर्क झाला होता. मुलीला सुसाईड बॉम्बर बनवण्याची तयारी होती. राजस्थान आयओसीमधून इंजिनियरला अटक झाली होती. गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनंतर पुणे एटीएसने ही कारवाई केली. संबंधित मुलगी अल्पवयीन असून ती पुण्यातल्या एका प्रतिष्ठित कॉलेजमध्ये अकरावी विज्ञान शाखेत शिकते. तिच्या आईवडिलांना कल्पना देऊन तिचं डिरॅडिकलायजेशन करण्यात येत आहे. संबंधित मुलगी मुस्लीम धर्मीय नसून बुरखा घालून कॉलेजला जायला लागली होती. त्याचप्रमाणे आयसिसचं ट्विटर हॅण्डलही ती फॉलो करत होती. इंटेलिजन्सच्या हा प्रकार लक्षात आल्यावर तिला तिच्या आईवडिलांना तिची माहिती देण्यात आली. सध्या या मुलीचं काऊन्सिलिंग सुरु आहे.
३- दाभोलकर हत्येचा तपास थांबवण्यासाठी पोलिस निरीक्षकाला धमकी
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या पोलिस निरीक्षकाला धमकीचा मेसेज आल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण शाखेला मदत करणारे चंद्रकांत घोडके यांना ही धमकी आली आहे. दाभोलकर हत्याप्रकरणाचा तपास थांबवला नाही तर जीवे मारण्यात येईल, असं या धमकीत म्हटलं आहे. याप्रकरणी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सीबीआयच्या टीमने धमकी देणे, शिवीगाळ करणे या कलमांखाली अज्ञाताविरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे. ज्या नंबरवरुन हा मेसेज आला होता, त्याआधारे पोलिस धमकी देणाऱ्याचा शोध घेत आहेत.
४- आयसिसच्या संपर्कातील पुणेकर तरुणीला एटीएसकडून चाप
५- गोवंश हत्या बंदी ही कुणी काय खावं किंवा खाऊ नये यासाठी नाही -अणे
गोवंश हत्या बंदी कायदा हा दुभत्या जनावरांचं रक्षण करण्यासाठी आहे, कुणी काय खावं किंवा खाऊ नये हे ठरवण्यासाठी नाही अशी भूमिका राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी हायकोर्टात मांडली. राज्य सरकारने केलेल्या गोवंश हत्या बंदी कायद्याला आव्हान देणार्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. त्यावर अणे यांनी ही भूमिका मांडली. एखाद्या व्यक्तीकडे गोमांस असलं तर त्याला अटक होऊ शकते ही गोष्ट खरी असली तरी हा या कायद्याचा परिणाम असून त्याचं मूळ उद्दिष्ट नाही असंही अणे यांनी म्हटलं.गोमांस बाळगणे हे राज्यातल्या कायद्यानुसार गुन्हा आहे. हे बाहेरून आलेल्या बीफलाही
लागू पडतं असं अणे म्हणाले. कायद्याचा दुरुपयोग होतो म्हणून कायदा रद्द करता येणार नाही अशी भूमिका अणेंनी मांडलीे. या प्रकरणाची सुनावणी आजदेखील सुरू राहणार आहे.
६- गोंधळ घातला म्हणून वायएसआर काँग्रेसच्या जगनमोहन रेड्डींसह विरोधी पक्षाच्या ५८ आमदारांना आंध्रप्रदेश विधानसभेतून निलंबित
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
७- पुण्यात बाजीराव मस्तानी हाऊसफुल्ल
८- रिलीजच्या पहिल्याच दिवशी बाजीराव-मस्तानी फिल्मविरोधात भाजप चवताळली, कार्यकर्त्यांच्या आंदोलनामुळे पुण्यातल्या सिटीप्राईडमधले सारे शो रद्द, इतर थिएटरमध्ये मात्र शो सुरु राहणार
पुण्याच्या सिटीप्राईड कोथरुडमधील बाजीराव मस्तानी चित्रपटाचे सकाळचे तीन शो रद्द करण्यात आले आहे. भाजपने सिनेमाला विरोध केल्याने थिएटर मालकांनी सिनेमाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित बाजीराव मस्तानी हा सिनेमा आज प्रदर्शित होत असून, यात रणवीर सिंह, दीपिका पादूकोण आणि प्रियांका चोप्रा यांची प्रमुख भूमिका आहे. मात्र भाजपच्या पुण्यातील कोथरुड शाखेने पत्रक काढून चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा दिला आहे. बाजीराव मस्तानी चित्रपट प्रदर्शित केल्यास होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी चित्रपटगृह मालक आणि संचालकांची असेल असा धमकीवजा इशाराही भाजपने दिला आहे. चित्रपटातून भारतीय इतिहासाचे विकृतीकरण केल्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित करु नये अशी मागणीही भाजपने केली आहे. अखेर थिएटर मालकांनी सिनेमाचे सकाळचे तीन शो रद्द करण्याचा
निर्णय घेतला. दरम्यान भाजपच्या इशाऱ्यानंतर सिटीप्राईड मल्टिप्लेक्सबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
९- शिवसेनेचा 'बाजीराव मस्तानी'ला पाठिंबा
पुण्यात भाजपने बाजीराव मस्तानी सिनेमाला विरोध केला असला, तरी त्यांचा मंत्रिमंडळातील मित्रपक्ष शिवसेनेने मात्र पाठिंबा दिला आहे. “बाजीराव मस्तानी हा सिनेमा इतिहासावर आधारित आहे. इतिहासावर सिनेमा बनवताना त्यामध्ये थोडी व्यावसायिकता येते. बाजीराव मराठा वॉरियर्स होते. अशा योद्ध्यावर मोठ्या पडद्यावर सिनेमा येणं गरजेचं आहे”, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे विविध मुद्द्यांवरून आमने-सामने येणारे शिवसेना- भाजपला आता वादासाठी आणखी एक मुद्दा मिळाला आहे.
१०- बाजीराव-मस्तानी चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासाठी दाखल झालेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली
११- एसटी कर्मचाऱ्यांचा संप आजही सुरुच, सरकारचा कारवाईचा इशारा
१२- शनिशिंगणापूरच्या विश्वस्तपदासाठी महिला आरक्षणाची मागणी, महिला सुरक्षा, महिला पोलिस चालतात मग विश्वस्त का नाही, महिलांचा सवाल
शनी शिंगणापूरच्या चौथर्यावर चढून शणीदेवाचे दर्शन घेतल्यामुळे एकच वाद पेटला होता. एवढंच काय तर महिलेनं स्पर्श केला म्हणून शणीदेवाचा दुधाने अभिषेक केला होता. आता या प्रकरणाचा दुसरा आध्याय सुरू झाला असून रणरागिणींनी शनी शिंग्णापूरच्या विश्वस्त मंडळावर विश्वस्तपदासाठी मोर्चेबांधणी सुरू केलीये. जर एखादी महिला खरंच विश्वस्त झाली तर ही घटना ऐतिहासिक ठरणार आहे. गेली कित्येक दशक शनी शिगणापूरमध्ये महिलांनी प्रवेश करू नये अशी प्रथा आहे. पण, या प्रथेला छेद देत एका तरुणीने थेट चौथर्यावर चढून दर्शन घेतलं. पुरोगामी म्हणवणार्या या महाराष्ट्रात याचे पडसाद काही वेगळेच उमटले. त्यामुळे महिलांमध्ये कमालीची नाराजी पसरली. आता या रणरागिणींनी अशा प्रथांना कायमचा धडा शिकवण्यासाठी हल्लाबोल केला. कारण शनी शिंग्णापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला विश्वस्त पहायला मिळणार आहे.
१३- साताऱ्यातील शेतकऱ्यांची दुष्काळावर मात, ‘जलक्रांती’पाहण्यासाठी नाना-मकरंदची हजेरी
साताऱ्यातील कायम दुष्काळीत तालुका म्हणून खटावची ओळख आहे. मात्र, याच खटाव तालुक्यातील जाखणगाव आणि कोरेगाव तालुक्यातील नलवडेवाडी या दोन गावांनी भीषण दुष्काळावर मात करत जलक्रांती केली आहे. शेतकऱ्यांची ही किमया पाहण्यासाठी अभिनेते नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी हजेरी लावली. सातारा जिल्ह्यतील नलवडेवाडी ग्रामस्थांनी एकत्र येऊन जलसंधारणाची मोठी कामे केली आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र येथील शेतकऱ्यांनी प्रशासानाच्या मदतीने नालाबांध, सिमेंट बंधारे, बांधून पाणी अडवले आहे.
१४- कामगार संपामुळे दोन दिवसात एसटीच्या दोन हजार फे-या रद्द झाल्यामुळे ३० लाखांचे नुकसान
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- औरंगाबाद : गावचा पाणीप्रश्न सुटत नसल्याने सरपंचाचा आत्महत्येचा प्रयत्न
पाणीप्रश्न सुटत नाही, गावाला टँकर मिळत नाही म्हणून औरंगाबाद जिल्ह्यातील एका सरपंचानं विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. विक्रम राऊत असे या सरपंचाचे नाव असून गंगापूर तालुक्यातील दहेगाव बंगल्याचे ते सरपंच आहेत. सरपंच विक्रम राऊत गेल्या काही दिवसांपासून भारत निर्माण योजनेअंतर्गत गावाला पाणी योजना मिळावी, अशी मागणी करीत होते. गावात किमान टँकर तरी सुरु करावा, अशी मागणी त्यांची पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना केली, मात्र त्यांना कुणीही दाद दिली नाही असा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. गावातही पाण्याची सोय नसल्यानं त्यांना त्रास होत होता अखेर आज त्रस्त होवून त्यांनी विष घेतले. उपचारासाठी त्यांना औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
१६- नाशिककर तरुणाची शक्कल, अॅपने वाचवले 19 हजार पूरग्रस्तांचे प्राण
पुराच्या तडाख्यात अडकलेल्या चेन्नईच्या मदतीसाठी अनेक हात पुढे सरसावले होते. मात्र महाराष्ट्रातला एक तरुण
पूरग्रस्त चेन्नईकरांसाठी संकटमोचक ठरला आहे. त्याने दिलेल्या मदतीच्या हातामुळे एक दोन नव्हे तर तब्बल 19 हजार
पूरग्रस्तांचे प्राण वाचले आहेत. हेल्पिंग हँड हे नाशिकच्या के. के. वाघ महाविद्यालयात शिकणाऱ्या कौशल बागने तयार केलेलं मोबाईल अॅप्लिकेशन. मोबाईल
फोनमध्ये फक्त 1 एमबीपेक्षाही कमी जागा व्यापणाऱ्या या अॅपने चेन्नईतील हजारो पूरग्रस्तांचे प्राण वाचवले. कौशल बाग मुळचा जळगावचा. जितका तो अभ्यासात हुशार, तितकाच समाजसेवेतही अग्रभागी. चेन्नईमध्ये पुरात अडकलेल्यांना मदत करण्याची इच्छा कौशलला स्वस्थ बसू देत नव्हती. मात्र महाराष्ट्रात बसून चेन्नईतील पूरग्रस्तांना कशी मदत करणार, असा प्रश्न त्याला सतावत होता. चेन्नई पाण्याखाली असताना शेकडो एनजीओ मदतीसाठी धावल्या. मात्र त्या एनजीओना पूरग्रस्तांबाबत महत्त्वाची माहिती देण्याचं काम कौशलच्या हेल्पिंग हँड अॅपने केलं. या अनोख्या मोबाईल अॅपनं चेन्नईतील 19 हजार 890 जणांचे प्राण वाचवले. कौशलनं तयार केलेल्या मोबाईल अॅपचा वापर नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यामध्ये देखील करण्यात आला होता. समाजसेवेसाठी तंत्रज्ञानाचा किती सुंदर उपयोग होऊ शकतो, हे कौशलच्या हेल्पिंग हँड अॅपने सिद्ध केलं आहे.
१७- कुस्तीचा फड ते ऑपरेशन थिएटर, लातूरचे पैलवान डॉक्टर
किडनी विशारद असलेले डॉक्टर गावाकडच्या फडात कुस्ती खेळत असल्याची कल्पना तुम्ही कधी केली आहे का? मात्रलातूरमध्ये गावाकडच्या जत्रेत कुस्तीचे फड गाजवणारे एमडी विशारद आहेत डॉक्टर प्रमोद घुगे. क्लिनिक आणि लेक्चरर शिपमधून त्यांना मिनिटभराचीही उसंत मिळत नाही. पण शालेय जीवनापासून कमावलेलं पैलवानाचं शरीर टिकवण्यासाठी डॉक्टर रोज तासभर दंड बैठका काढतात. भारतातले एकमेव तरबेज डॉक्टर पैलवान असल्याचा त्यांचा दावा आहे. डाँक्टरांचं संपुर्ण कुटुंबच फिटनेस फ्रिक आहे.
डॉक्टर रोज एक तास व्यायाम करतात. मग भले नाईट शिफ्ट असो. त्यामुळेच शाळेपासून कमावलेलं पैलवानाचं शरीर डॉक्टरांनी टिकवलं आहे. कुस्तीचा शौक असा की गावातल्या खंडोबा यात्रेत डॉक्टर दरवर्षी हमखास कुस्ती खेळतात. कुस्ती खेळत असल्यामुळे माझी एकाग्रता वाढण्यास मदत झाली आणि डॉक्टर होऊ शकलो, असंही ते सांगतात.
१८- पंजाबच्या फिरोझपूरमध्ये अकाली दलाच्या नेत्याच्या मालकीच्या बसने १० वर्षाच्या मुलीला चिरडले
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१९- नानाच्या ‘त्या’ पोस्टबाबत मकरंद म्हणतो त्या पोस्टशी आमचा संबंध नाही
फेसबुक, ब्लॉग किंवा व्हॉट्सअॅप इत्यादी सोशल मीडियावरुन अभिनेते नाना पाटेकर यांच्या नावाने काही पोस्ट फिरत आहेत. यामध्ये ‘बाजीराव-मस्तानी’ किंवा शाहरुखचा ‘दिलवाले’ सिनेमा पाहू नका, असं नानाच्या नावाने आवाहन करणाऱ्या पोस्ट आहेत. मात्र, अशा प्रकारचं कोणतंही आवाहन नानाने केलं नाही, असं नानासोबतच्या पत्रकार परिषदेत मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट केलं आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी साताऱ्यातील खटाव आणि कोरेगावमधील दुष्काळावर मात करणाऱ्या गावांना भेटी दिल्या. यावेळी दोघेही पत्रकारांशी बोलत होते. नाना पाटेकर हे अशा प्रकारे ब्लॉगवर कधीही लिहित नाहीत. त्यांना जे काही बोलायचे आहे, ते थेट माध्यमांसमोर येऊन बोलतात. त्यामुळे सोशल मीडियावर नाना पाटेकर यांच्या नावाने फिरणारे ब्लॉग हे खोटे असल्याचे मकरंद अनासपुरे यांनी स्पष्ट केले आहे.
२०- अॅक्शन हिरोचं धडाकेबाज कमबॅक, सनी देओलच्या ‘घायल वन्स अगेन’चा ट्रेलर रिलीज
अॅक्शनने पुरेपूर भरलेला अभिनेता सनी देओलचा आगामी सिनेमा ‘घायल वन्स अगेन’चा ट्रेलर रिलीज झाला आहे. विशेष म्हणजे हा सिनेमा दस्तुरखुद्द सनी देओलने दिग्दर्शित केला आहे. ‘जो कुणी सत्यासोबत असतो, त्याचा विजय निश्चित असतो.’ असा संदेश देणारा ‘घायल वन्स अगेन’चा ट्रेलर आहे. या सिनेमात सनी देओलसह चार कॉलेज विद्यार्थी दाखवण्यात आले आहेत. या चार विद्यार्थ्यांभोवती सिनेमाची कथा फिरते. सनी देओल या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत अभिनयही करणार आहे.
२१- अजय देवगणच्या ‘बादशाहो’चा अखेर मुहूर्त ठरला
अजय देवगण होम प्रॉडक्शनच्या ‘शिवाय’नंतर आता दिग्दर्शक मिलन लूथरियाच्या ‘बादशाहो’ सिनेमात दिसणार आहे. हा अॅक्शन थ्रिलर सिनेमा असून 26 जानेवारी 2017 रोजी प्रदर्शित होणार आहे. भूषण कुमार, किशन कुमार आणि मिलन लूथरिया हे तिघे ‘बादशाहो’ सिनेमाची निर्मिती करणार आहेत. अजय आणि मिलन यांनी याआधी कच्चे धागे, चोरी चोरी आणि वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई हे सिनेमे एकत्र केले आहेत.
२२- शाहरुखच्या असहिष्णूतेच्या विधानाविरोधात उत्तरप्रदेशच्या गोरखपूरमध्ये दिलवाले चित्रपटाचा विरोध, जुबली टॉकीजसमोर निदर्शने, तिकीट विक्री बंद
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२३- नायगाव नगरपंचायत निवडणुकीसाठी १७ जागांसाठी १०३ अर्ज
२४- नवीन स्थायी सभापती अनुजा तेहरा यांची आज पहिली सभा
२५- संस्थाचालक मनोहर धोंडे यांच्या प्रकरणात नियमबाह्य कृती केल्याचा आरोप असलेले पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी के. पी. सोने निलंबित
२६- महेश्वरी परिचय संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी आज महेश्वरी भवनमध्ये संयोजन समितीची बैठक
२७- श्री गुरु गोविंदसिंगजी चषक धनुर्विद्या स्पर्धेचे २४ ते २६ डिसेंबरला आयोजन
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२८- मुखेड; मनरेगा,पाणी टंचाई, चारा टंचाई,जलयुक्त शिवार अभियान व अन्न सुरक्षा या विगषयावरील आढावा बैठक संपन्न
http://goo.gl/ZKIIFW
~~~~~~~~~~~~~~~
२९- चंपाषष्ठी निमित्त जेजूरी गडावर करण्यात आलेली रोषणाई
http://goo.gl/7Bo4LX
~~~~~~~~~~~~~~~
३०- गटारमुक्त अभियान प्रभावीपणे राबवावे - सौ. वर्षाताई भोसीकर
http://goo.gl/TMRuuv
~~~~~~~~~~~~~~~
३१- मुखेड येथे एसटी कर्मचा-यांचा पगारवाढी साठी बेमुदत संप दुस-या दिवशीही सुरु
http://goo.gl/mFf51Y
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
माधवराव झारीकर, प्रवीण पोकर्णा, चारुदत्ता गरजे, ओमकार माने, संजय भंडारी, गजानन कदम, सैलेश झंवर, यश बिरादार, राज जाखर, सुमन रॉय, महेश दयाळे, बालाजी शहाणे, सचिन किसवे, नरेश डोंगरे, किरण गुंजाळ, शुभम गुंजाळ, विनय मुळे, प्रशांत अभंग, नंदू भोन्गाने, सुरेश उमरीकर, मनोज कोसले, रामा राठी
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जिंकायची मजा तेंव्हाच असते जेंव्हा अनेकजण तुमच्या पराभवाची वाट पाहत असतात
[कल्पेश गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
* * * * * * * * * * * * * *
नामांकित कंपन्याचे प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
* * * * *
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
CCTV कॅमेरा बसवा आणि सुरक्षित राहा
करा आपला व्यवसाय आणि घर सुरक्षित
CP PLUS, Gadgets World Nanded
HD CCTV CAMERA PACKAGE
4 HD CAMERA CP PLUS 1MP
4CH HD DVR CP PLUS
1TB HDD
WIRE 92 MTR
INSTALLATION
JUST 18000 Rs ONLY
GADGETS WORLD, CENTRE POINT,
SHIVAJI NAGAR, NANDED
07744995599
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/cp-plus-gadgets-world-nanded.html
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी, [नोव्हेंबरमधील नोंदीनुसार]
डिसेंबरमध्ये अड्ड झालेल्या सर्व ग्रुप स्वागत
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
१२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक
http://goo.gl/3kzoqN

No comments:
Post a Comment