Monday, 7 December 2015

नमस्कार लाईव्ह ०७-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र


 नमस्कार लाईव्ह ०७-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- ताजिकिस्तानमध्ये 7.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का, पंजाब, जम्मू-काश्मीरसह दिल्लीतील काही भागांमध्ये भूकंपाचे धक्के
२- बीजिंग शहर विषारी धुक्याच्या चादरीने झाकोळलं
३- पेशावरमध्ये लष्करी शाळेवर दहशतवादी हल्ला करणा-या दोघा दोषींना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेला पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
 ४- कांदिवलीच्या आगीत 2000 झोपडपट्ट्या खाक,   आगीत एका लहान मुलासह एकूण सात जणांचा मृत्यू, आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु
              कांदिवलीत सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर लागलेल्या आगीत समतानगर परिसरातील दोन हजार झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. आगीत दोन जणांचा मृत्यू झाला असून 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक महिला आणि मुलाचा समावेश आहेकांदिवलीत आज सुमारे 50 घरगुती सिलेंडरचे एकामागे एक स्फोट झाल्याने दामू नगरच्या झोपडपट्टीला भीषण आग लागली होती. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.दुपारी साडेबाराच्या सुमारास एका गोडाऊनला लागलेल्या आगीने संपूर्ण झोपडपट्टीला आपल्या कवेत घेतलं. या अग्नितांडवाला कारणीभूत ठरले ते घरगुती सिलेंडर.दोन तासांत जवळपास 50 एलपीजी सिलेंडरचा स्फोट झाला आणि संपूर्ण समतानगर परिसराची राखरांगोळी झाली. दोन हजार झोपड्या खाक झाल्या.घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकांनी समता नगरकडे धाव घेतली. मात्र ती महाकाय आग आटोक्यात आणणं तेवढं सोपं नव्हतं. कारण एकामागे एक सिलेंडरचे स्फोट सुरुच होते.आग आणखी पसरु नये म्हणून सभोवतालच्या घरातील, सिलेंडरच्या रुपात दडलेले जिवंत बॉम्ब घराबाहेर काढायला सुरुवात झाली. सिलिंडरच्या स्फोटांमुळे जवळपास 2000 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत.या आगीत अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात दाखल केलं आहे.दामू नगर झोपडपट्टी, आकुर्ली मार्ग, महिंद्रा आणि महिंद्रा गेट क्रमांक 5  बाजूला, पश्चिम द्रूतगती महामार्गाजवळ, कांदिवली पूर्व इथं ही आग लागली आहे. या झोपडपट्टीत 30 ते 35 हजार नागरिक राहतात.ज्या गोडाऊनला सर्वप्रथम आग लागली, तो अपघात होता की घातपात हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. समता नगरच्या जमिनीवर डोळा ठेवून असणाऱ्यांनी तर ही आग लावली नाही ना? या प्रश्नाच्या ज्वाला धगधगायला सुरुवात झाली आहे.





५- ज्यावेळी नेपाऴमध्ये भूकंपाने थैमान घातले, त्यावेळी मोठ्या भावासारखं नेपाऴच्या मदतीला भारत धावून गेला - सुषमा स्वराज
६- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आमंत्रणावरुन जपानचे पंतप्रधान शिंजो आबे ११ डिसेंबरच्या दरम्यान भारत दौऱ्यावर
७- चेन्नईमधल्या पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी २५ कोटी रुपयांची मदत
८- सोनिया गांधी आणि राहुल गांधींना बजावण्यात आलेल्या समन्सला आव्हान देणार. हा निर्णय कायद्याच्या निकषावर टिकणारा नाही - अभिषेक मनु संघवी
९- समान नागरी कायदा लागू करण्यासाठी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार
१०- भ्रष्टाचार प्रतिबंधक विधेयक २०१३ सिलेक्ट समितीकडे पाठवण्याचा राज्यसभेचा निर्णय
११- पाकिस्तानशी चर्चा म्हणजे देशाचा विश्वासघात - काँग्रेस
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१२- महाधिवक्ता अणेंची भूमिका महाराष्ट्राच्या हिताचीच, शिवतीर्थावर दसरा मेळाव्यासाठी अणेंनीच बाजू मांडली होती, तावडे यांचा सेनेला टोला
१३- सरकारवर संसदेत हल्लाबोल करा : उद्धव ठाकरे
१४- भारतात असहिष्णुता नाही, अत्यंत सुरक्षित : सनी लिऑन
१५- तामिळनाडूच्या पूरग्रस्तांना आठवलेंकडून एक महिन्याचं वेतन
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१६- कल्याण : प्रेयसीचा खून करुन मृतदेह नदीत फेकला, पोलिसाला अटक
१७- आंध्रप्रदेशात विजयवाडामध्ये विषारी दारु पिल्यामुळे सहाजणांचा मृत्यू
१८- ठाणे : नऴपाडा येथे पुतण्याकडून काकूसह पाच महिन्याच्या मुलांवर चाकू हल्ला, हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाला असून काकूवर रुग्णालयात उपचार सुरु
१९- हिमाचलप्रदेश मंडीमध्ये दरड कोसळल्याने चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
२०- अकोला: महापालिकेत नगरसेवकावर हल्ला, काँग्रेसचे नगरसेवक जब्बार जखमी. जुन्या वादातून हल्ला झाल्याचा संशय
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- तिहार तुरुंगात विशेष सुविधा मिळवण्यासाठी सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉयनी मोजले १.२३ कोटी रुपये
२२- पाटीदार पटेल आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याला एका दिवसाची पोलिस कोठडी
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२३- परभणी - सोनपेठ येथील आरोग्य केंद्र बनले शोभेची वस्तू
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_78.html
~~~~~~~~~~~~~~~
२४- मुखेड - शिधापत्रिका धारकांनी आधार नोंदणी करावी - संतोष वेणीकर जिल्हा पुरवठा अधिकारी
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_50.html
~~~~~~~~~~~~~~~
२५- बिलोली - त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_99.html
~~~~~~~~~~~~~~~
२६- नगर पालिकेच्या दुर्लक्ष कारभारामुळे बिलोली शहराला केले जाणाऱ्या जलवाहिनीला अनेक ठिकाणी गळती
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_89.html
~~~~~~~~~~~~~~~
२७- येलदरी धरणातुन कॅनला पाणी सोडण्याची मागणी, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे अंदोलन
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_45.html
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात आणि यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात
[विठ्ठल सल्लावर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
जिथे वाचकाच बनतात रिपोर्टर, पाठवा आपल्याकडील बतिमी 8975495656 च्या Whats Up वर,
नमस्कार लाईव्हच्या वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे अभिनंदन.
राज्यातील पहिले सोशल मिडिया न्यूज चॅनेल 'नमस्कार लाईव्ह'
जे पोहोचतेय महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात,
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत, अगदी काही वेळातच
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments: