Saturday, 12 December 2015

गरेलपाडा हा आदिवासी पाडा अजूनही मुलभूत सुविधा पासून वंचित



शहापूर  12 ( प्रतिनिधी)  
            आपल्या देशाला स्वातंत्र मिळुन  68 वर्षे झाली मात्र अजूनही  शहापूर तालुक्यातील अघई गावापासून अंदाजे  10  ते 12 कि.मी अंतरावर   असलेल्या 300  ते 350   आदिवासी लोकवस्ती असलेल्या  गरेलपाडा, अघाईपाडा,  भुईशेत या पाड्यातील लोकांना रेशन कार्ड, लाईट,  पिण्याचे पाणी,   शाळा,   रस्ते व मतदानाचा हक्क नाही म्हणून खेदाने म्हणावेसे वाटते खरच आपल्या देशातील सर्वानाच स्वातंत्र मिळाले आहे का?  .             
                   कल्याण येथील कमल पवार व त्यांचे सहकारी  स्वखर्चाने तेथे मेडिकल कॅम्प आयोजित करत असतात. त्यांनी सांगितले कि या पाड्यातील कोणत्याही नागरिकाचे वजन  35 किलोच्या वर नाही याचा अर्थ तेथील अनेक नागरिक बालके  कुपोषित आहेत. येथील  महिलाच्या  अंगावर पुरेसे कपडे नसल्याने जर कोणी बाहेरील व्यक्ती सर्वे करायला गेले तर घराबाहेर देखील पडत नाही .एवढी  विदारक समस्याआहे.                                                                                                                           
                  काही नागरिकांनी बोलताना सांगितले की महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन कंपनी लिमिटेड (MEEDCL) या कंपनीने आमच्या नावाचे मिटर वितरित केले आहेत मात्र  ते अद्याप पर्यंत त्यांच्या पर्यंत पोहोचले नाहीत.तरी महाराष्ट्र शासना मार्फत सदर  आदिवासी बांधवांना  मुलभूत सुविधा शक्य तितक्या लवकर द्याव्यात अशी मागणी  कल्याण च्या सामाजिक कार्यकर्ता   कमल पवार ,  समीर चव्हाण,   वर्षा उजगांवकर,   दत्तप्रसाद बेद्रे,   अश्विनी पवार,  आकाशा खंडागळे,  कल्पना कुपटे ,  हर्षली पवार ,अभिषेक सोनपी व इतर कार्यकर्ते यांनी केली आहे.                            

No comments: