Saturday, 12 December 2015

नमस्कार लाईव्ह १२-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १२-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- सात वर्षांत जपान बुलेट ट्रेन बनवून देणार,जपान-भारतात करार 
                  अहमदाबाद ते मुंबई हायस्पीड बुलेट ट्रेनवर आज शिक्कामोर्तब झालंय. बुलेट ट्रेनच्या महत्त्वपूर्ण करारावर भारत-जपानमध्ये करार झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये करारवर स्वाक्षर्‍या केल्या. या करारनुसार 7 वर्षांत जपान बुलेट ट्रेन तयार करून देणार आहे. या प्रकल्पासाठी 98,000 कोटी मंजूर करण्यात आले आहे.

२- गूगलचे सीईओ सुंदर पिचाईही उतरले मुस्लिमांच्या समर्थनार्थ 
                फेसबूकचा संस्थापक मार्क झुकेरबर्गने जगभरातील मुस्लिमांना पाठिंबा दर्शवत फेसबूक मुस्लिमांच्या हक्कासाठी लढा देईल असे सांगितलेले असतानाच गूगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई हेही मुस्लिमांच्या समर्थनार्थ उतरले आहेत. भय किंवा दहशतीमुळे आपल्या मूल्यांचा पराभव होता कामा नये. मुक्त विचारसरणी, सहिष्णुता व नव्या अमेरिकी नागरिकांचा स्वीकार हे देशाचे सामर्थ्य आहे, असे मत एका खुल्या पत्रातून मांडताना त्यांनी मुस्लिमांना पाठिंबा दर्शवला.

३- वॉशिंग्टन - बलात्कार : पोलिसाला २६३ वर्षे कैद 
                 वॉशिंग्टन : रात्रीच्या गस्तीवर असताना तेरा महिलांवर बलात्कार केल्याच्या आरोपावरून दोषी ठरविण्यात आलेल्या अमेरिकेतील एका पोलीस अधिकाऱ्याला २६३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. गुरुवारी वयाची २९ वर्षे पूर्ण करणाऱ्या डॅनिएल हॉल्तझ्क्लॉ हा ओक्लाहोमात पोलीस अधिकारी होता. गणवेशधारी या आरोपीला बलात्काराच्या १८ प्रकरणांत दोषी ठरविण्यात आले असून, पीडितांमध्ये किशोरवीयन मुली आणि कृष्णवर्णीय महिलांचा समावेश आहे. १८ आरोपांतून कोर्टाने त्याची सुटका केली असली, तरी त्याला २६३ वर्षे तुरुंगवास भोगावा लागणार आहे.बलात्काराच्या चार प्रकरणांत त्याला प्रत्येकी ३० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे, तसेच बळजोरी, अश्लील वर्तन, लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखालीही त्याला वेगळी शिक्षा सुनावण्यात आली आहे.

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
४- वाराणसी: जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी गंगा आरतीसाठी घाटावर उपस्थित 

५- गोपीनाथ मुंडे यांच्यामुळे महाराष्ट्रात भाजपला बळकट झाला - भाजपाध्यक्ष अमित शहा 

६- भारतीय लष्कराच्या जवानांनी आसाममधील चिरांग येथून एमटीएफएच्या तीन दहशवाद्यांना केली अटक 

७- जर भारतात असहिष्णूता असती तर मी इथलं नागरिकत्व घेतलं असतं का? - अदनान सामी 

८- मोदी सरकार आल्यापासून भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. - मेहबुबा मुफ्ती 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
९- शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं निधन 
                आयुष्यभर शेतकऱ्यांसाठी लढणारे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांचं निधन झालं. शरद जोशी यांनी आज सकाळी 9 वाजता पुण्यातल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते.शरद जोशी यांच्या मुली परदेशात असल्यानं त्यांच्या पार्थिवावर 15 डिसेंबर, मंगळवारी अंत्यसंस्कार होणार आहेत. मात्र अंत्यविधी कुठे आणि कधी करायचा याची वेळ अद्याप ठरलेली नाही. त्यामुळे आपल्या या लाडक्या नेत्यावर प्रेम करणाऱ्यांनी लगेचच पुण्यात येण्याची घाई करु नये. असं आवाहन शेतकरी संघटनेकडून करण्यात आलं आहे.

१०- पवारांची निवृत्तीची भाषा म्हणजे चकवा: सामना 
           ‘शरद पवार राजकीय निवृत्तीची भाषा करत असतील तर त्यावर कोणी विश्वास ठेऊ नये. हा एक चकवा आहे.’  असं म्हणत शिवसेनेने शरद पवारांना वाढदिवसाचं खास गिफ्ट दिल आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज 75वा वाढदिवस. या खास दिवसासाठी राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पण एरवी राजकारणात कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या शिवसेनेनेही पवारांना खास ठाकरे शैलीत गिफ्ट दिलं आहे.

११- मराठवाड्यातले तरुण आयसिसच्या संपर्कात? पोलिसांकडून कसून चौकशी 
                इस्लामिक दहशतवादी संघटना म्हणजेच आयसिस आता भारतातही पाय पसरु पाहत असल्याची भीती गेल्या महिनाभरातल्या काही घटनांमधून व्यक्त केली जात आहे. मराठवाड्यातील काही तरुण आयसिस या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असल्याची भीती गुप्तचर यंत्रणांना आहे. मराठवाड्यातील दहशतवादाच्या गुन्ह्यांतील आरोपींची गेल्या 10 ते 15 वर्षांत अनेक प्रकरणे पुढे आले आहेत. यामुळे आयसिस मराठवाड्यात आपलं नेटवर्क करु शकते, अशी माहिती मिळते आहे. याचीच खबरदारी म्हणून गुप्तचर यंत्रणेच्या पत्रानुसार यापुढे औरंगाबादसह मराठवाड्यातील इतर शहरांमध्ये घर भाड्यानं देताना आणि खरेदी विक्री करताना, संपूर्ण माहिती पोलीसांना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

१२- जैतापूर प्रकल्पाविरोधात मच्छिमारांच्या आंदोलनाकडे सेनेची पाठ 
                 जैतापूर प्रकल्पाविरोधात जेल भरो आंदोलनाला मोर्चानं सुरुवात झालीये. या आंदोलनाला पाठिंबा देण्याची घोषणा शिवसेनेनं केली होती. आज प्रत्यक्षात मोर्चा निघाला पण एकही शिवसैनिक या मोर्चाकडे फिरकला सुद्धा नाही. साखरी नाटेमधील सर्व मच्छीमार आणि महिलांनी एकत्र येत प्रकल्पाच्या विरोधात घोषणाबाजी करत जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे यांच्या भारत भेटीचा निषेध केलाय. मात्र, ज्या शिवसेनेने या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. त्या शिवसेनेचे कार्यकर्ते या मोर्चात कुठेच दिसून आले नाहीत. शिवसेनेचे आमदार राजन साळवी प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन करण्यासाठी येणार असल्याचं समजतंय पण प्रकल्पाविरोधातला शिवसेनेचा एल्गार या मोर्चात तरी दिसून आलेला नाही.

१३- उद्या रेल्वेच्या तिनही मार्गांवर मेगाब्लॉक 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- मुंबईकरांसाठी खुशखबर! 26 जानेवारीपासून मध्य, हार्बर रेल्वेवर जादा लोकल 
                 येत्या 26 तारखेपासून मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावर 40 जादा लोकल सोडण्यात येणार आहेत. लोकल प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या विशेष समितीची आज बैठक पार पडली. त्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 26 जानेवारीपासून या जादा लोकल सोडण्यात येणार आहेत. ठाणे-वाशी आणि पनवेलसाठी 22, हार्बर रेल्वेमार्गावर म्हणजे सीएसटी ते पनवेलसाठी 7, तर कुर्ला ते ठाणे, ठाणे ते कल्याण आणि बदलापूर ते टिटवाळासाठी 11 जादा लोकल मिळणार आहेत.

१५- हिमाचल प्रदेशमधील मेहली येथे एका इमारतीचे बांधकाम सुरू असतानाच भूस्खलन झाल्यामुळे तीन कामगार झाले ठार 

१६- नागपूर स्थानीय स्वराज्य संस्था निवडमुकीत भाजपाचे गिरीश व्यास बिनविरोध निर्वाचित 

१७- खेड शिवापूर येथे तरूणाच्या डोक्यात खलबत्ता घालून खून, मोबाईल चार्ज करण्यासाठी चार्जर घेतल्याने झालेल्या वादातून घडली हत्या 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१८- शनिवारवाड्यात संजय भन्सालीच्या पोस्टरची जाळपोळ 
                 बाजीराव मस्तानी या सिनेमाविरोधात शनिवारवाड्यावर आज पेशव्यांच्या वंशजांनी जोरदार निदर्शनं केली. बाजीराव मस्तानी या सिनेमात इतिहासाचं विकृतीकरण झाल्यानं येत्या शुक्रवारी तो प्रदर्शित होऊ देणार नाही, असा भूमिका भाजप आमदार मेधा कुलकर्णी यांनी घेतली आहे. थोरले बाजीराव प्रतिष्ठानच्या वतीनं शनिवारवाड्यात दिग्दर्शक संजय लीला भन्साळींचे छायाचित्र जाळण्यात आले आहेत. तर सिनेमात तथ्य बाजूला सारुन बिभत्स रुप दाखवण्यात आल्याचं घणाघात श्रीकांत मोघे यांनी केला. यावेळी पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, पुष्कर पेशवे, ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघेही उपस्थित होते. भन्साळींनी इतिहासाचं विकृतीकरण आणि बिभत्स रूप दाखवलं आहे अशी संतप्त प्रतिक्रिया मोघेंनी दिली.

१९- पवार साहेबांना ७५ व्या वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा - राज ठाकरे 

२०- नांदेड मनपा आयुक्ताना जातीवाचक बोलणाऱ्या पठाण विरुद्ध न्यायालयात खटला दाखल 
                  नांदेडच्या मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांना जातीवाचक शब्द उच्चारून अपमान करणाऱ्या जफरअली पठाण विरुद्ध आता न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले आहे. हा खटला आता ऑट्रोसिटी विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे. नांदेडच्या जफरअलीखान पठाण या सेवा निवृत्त शिक्षकाने नांदेड दिनांक १३ एप्रिल २०१४ रोजी मनपा आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या सोबत चर्चा करतांना झालेल्या शब्दांना कागदोपत्री लिहून त्या संदर्भाने वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मागणी केली की, त्या नालीला भारतातील सर्वोच्च पुरस्कार द्यावा. या तक्रारीची माहिती सुशील खोडवेकर यांना प्राप्त झाल्यानंतर त्यांनी जवळपास सात दिवसांनी दिनांक २० एप्रिल २०१४ रोजी पोलिस ठाणे वजिराबाद येथे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार तक्रार दिली. या तक्रारीच्या बातम्या छापून आल्यानंतर सुशील खोडवेकर यांनी पत्रकार परिषद घेवून सांगितले की, माझी पत्नी, जिल्हाधिकारी धीरजकुमार आणि पोलिस प्रमुख परमजीतसिंह दहिया यांच्या सोबत चर्चा करून तक्रार देण्यास उशीर झाला. खरेतर मुख्य तक्रारीत असे काहीच लिहिलेले नाही. या प्रकरणाचा तपास तत्कालीन शहर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक विजय कबाडे हे करीत होते. त्या प्रकरणात जफरअलीखान पठाण यास अटक झाली. जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर करतांना जफरअलीखान पठाण यांनी महानगर पालिका इमारतीत जावू नये अशी अट टाकून जामीन मंजूर केला.
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२१- देगलूरमध्ये अतिक्रमणावर कार्यवाही होणार
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_97.html
~~~~~~~~~~~~~~~
२२- मुखेड न्यायालयासमोरच देशी दारु दुकानाचा घाट नागरिकांसह वडार संघाचा तीव्र विरोध
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_26.html
~~~~~~~~~~~~~~~
२३- गरेलपाडा हा आदिवासी पाडा अजूनही मुलभूत सुविधा पासून वंचित
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_47.html
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
जीवनामधल्या स्वतःला न पटणाऱ्या गोष्टी स्पष्टपने नाकारू शकतो त्याला कधीच पश्चाताप करण्याची वेळ येत नाही. 
योग्य वेळी स्पष्ट शब्दात नाही म्हटले तर मनाची 'शांती' कोणीही भंग करू शकत नाही 
[डॉ. वर्षा चौरे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/sss-sports-food-supplements.html
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत,
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments: