नमस्कार लाईव्ह ०७-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र
सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[आंतरराष्ट्रीय]
१- कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना : ओबामा
२- आम्हाला धोकादायक ठरणा-या सर्वच दहशतवादी संघटनांचा खात्मा करणार - बराक ओबामा
वॉशिंग्टन : दहशतवाद हा कॅन्सरसारखा असून त्याला संपवण्याशिवाय पर्याय नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामांनी म्हटलंय. कॅलिफोर्नियातील गोळीबार ही दहशतवादी घटना असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ओबामांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात हे मुद्दे मांडले. २०११ नंतर पुन्हा एकदा दहशतवादाविरोधात युद्ध पुकारण्याची वेळ आली असून आत्मसंरक्षणासाठी त्याशिवाय पर्याय नसल्याचं त्यांनी म्हटलंय. इसिसचा इस्लामशी काहीही संबंध नसून जगभरातील मुस्लिम नेत्यांनी जनतेला इस्लाम म्हणजे काय, हे समजून द्यावं, असा सल्लाही त्यांनी दिलाय.
३- खुशखबर! फेसबुकची ‘लाईव्ह ब्रॉडकास्ट’सेवा
फेसबुक नेहमीच युजर्ससाठी नवे फीचर्स घेऊन येत असतो. फेसबुकने आता ‘लाईव्ह ब्रॉडकास्ट’ सेवा सुरु केली आहे. ही सेवा सध्या अमेरिकेतील आयफोन युजर्ससाठी मर्यादित आहे. मात्र, लवकरच भारतातील फेसबुक युजर्ससाठी ही सेवा सुरु केली जाणार आहे.
४- बाबासाहेबांची स्वाक्षरी लंडनमध्ये झळकणार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ११५ वर्षांपूर्वी प्राथमिक शाळेत प्रवेश घेताना मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी लंडनमध्ये होणाऱ्या त्यांच्या स्मारकात लवकरच झळकणार आहे. दि. ७ नोव्हेंबर १९०० रोजी बाबासाहेब आंबेडकर यांनी सातारा हायस्कूल (सध्याचे छ. प्रतापसिंह हायस्कूल)येथे प्रवेश घेतेवेळी मोडी लिपीत केलेली स्वाक्षरी १ हजार ११४व्या क्रमांकावर शाळेच्या रजिस्टरला आजही पाहायला मिळते. ही नोंद आज अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. याचे कारण, या स्वाक्षरीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा केवळ शाळाप्रवेशच झाला नाही, तर ती एक युगांतराची सुरुवात होती. ज्या स्वाक्षरीने डॉ. आंबेडकरांचा ज्ञानाच्या अवकाशामध्ये प्रवेश झाला होता, ती स्वाक्षरी आता केवळ साताऱ्यापुरती मर्यादित राहिली नसून, सातासमुद्रापार लंडनला निघाली आहे.
५- बँकॉक येथे भारत-पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांदरम्यान झालेल्या बैठकीवर काँग्रेसने नोंदवला आक्षेप
६- नेपाळच्या नव्या राज्यघटनेच्या विरोधात आंदोलन करणारे मधेशी समाजाचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी करणार चर्चा
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
७- बसप अन्य पक्षांबरोबर आघाडी करणारी ही माहिती चुकीची आहे. समाजवादी पक्ष या अफवा पसरवतोय - मायावती
८- तणावग्रस्त अयोध्यासह फैझाबादमध्ये 'हाय अलर्ट'
फैझाबाद : बाबरी मशीद पाडण्यात आल्याच्या घटनेस 23 वर्षे पूर्ण होत असताना, विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) या ठिकाणी उद्या (सोमवारी) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने अयोध्या भागामध्ये अत्यंत कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली आहे.
९- पूरग्रस्त चेन्नईतील नागरिकांचा पासपोर्ट हरवल्यास त्यांना मिळणार मोफत पासपोर्ट - परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज
१०- केंद्रीय राज्यमंत्री व्ही.के.सिंह यांच्या दलित विरोधी वक्तव्याविरोधात संसदेत गांधी पुतळयाजवळ काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेस नेत्यांनी निदर्शने
११- संघावर बंदी घाला : आझम खान
राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर संपूर्ण बंदी घालावी आणि केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारने संघाला दहशतवादी संघटना म्हणून घोषित करावे, अशी मागणी समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उत्तर प्रदेशचे मंत्री आझम खान यांनी आज केली. महात्मा गांधीजींच्या हत्येनंतर तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संघावर बंदी घातली होती. तेव्हापासून संघाची मंडळी जातीमध्ये द्वेषनिर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. दिल्ली आणि बिहारमध्ये सत्ता गमवावी लागल्याने केंद्रातील मोदी सरकार समाजातील काही विघटनवादी गटांना पाठिंबा देत आहे. तिरस्काराचे राजकारणही केंद्रातील सरकारकडून सुरू आहे.
१२- अॅसिड हल्ल्यातील सर्व पीडितांच्या उपचाराची व पुनर्वसनाची जबाबदारी संबंधित राज्य सरकारने घ्यावी, अॅसिड हल्ल्यातील सर्व पीडितांना अपंगत्व कायदा लागू करा, सर्वोच्च न्यायालयाचे राज्य सरकारांना निर्देश
१३- मुसळधार पावसाचा फटका बसल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले चेन्नई विमानतळ आजपासून पूर्ण क्षमतेने सुरू होणार असून सर्व राष्ट्रीय व आंततराष्ट्रीय उड्डाणे पूर्ववत सुरू होणार
१४- बीफ खाल्ल्याच्या अफवेवरून जमावाच्या मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या इखलाखच्या बिसहडा (उत्तर प्रदेश) गावात आज होणार शुद्धीकरण
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
१५- स्वतंत्र विदर्भाच्या मागणीविरोधात शिवसेना आक्रमक, श्रीहरी अणेच्या हकालपट्टींची मागणी. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधा-यांमध्ये जुंपली
१६- नागपूर विधिमंडळाच्या आवारात सत्ताधारी शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष, शिवसेनेचा अखंड महाराष्ट्राचा नारा, भाजपच्या स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा
१७- परमारांच्या डायरीत शिंदे-खडसेंचं नाव नाही, मुख्यमंत्र्यांकडून बचाव
बिल्डर सूरज परमार आत्महत्या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजब आणि धक्कादायक खुलासा केलाय. सूरज परमार यांच्या डायरीमधील ES आणि EK ही एकनाथ शिंदे आणि एकनाथ खडसे यांची नाव नाही. विरोधकांनी पुराव्यानिशी आरोप करावे अशी पाठराखण मुख्यमंत्र्यांनी केली.
१८- विरोधकांनी सहकार्य करावं, हिवाळी अधिवेशनाचे कामकाज चालू द्यावं -मुख्यमंत्री
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१९- कोलकात्यातील गटारातील विषारी वायूमुळे तिघांचा मृत्यू, दोघांना रुग्णालयात केले दाखल
२०- अकोला किडनी रॅकेट, मुख्य आरोपी जाळ्यात
अकोला किडनी रॅकेटचा प्रमुख आरोपी शिवाजी कोळी याला पोलिसांनी अटक केलीय. रॅकेटचा पर्दाफाश झाल्यापासूनच शिवाजी कोळी फरार होता. अखेर काल रात्री उशिरा त्याला अकोला पोलिसांच्या हाती लागलाय. आज शिवाजी कोळीला कोर्टात हजर करण्यात आलंय. अकोल्यात अनेक शेतकऱ्यांनी कर्ज परतफेडीसाठी आपल्या किडन्या स्वस्तात विकल्याचं पुढे आलंय. पैशाच्या निकड असणाऱ्या शेतकऱ्यांना गळाला लावून त्यांना श्रीलंकेत घेऊन जाणं, आणि किडण्या काढण्याच्या सगळ्या कारवाईत शिवाजी कोळीची प्रमुख भूमिका असल्याचं बोललं जातयं.
२१- मनमाड: लासलगावमध्ये कांद्याचा लिलाव बंद, कांद्याचा भाव कोसळल्यामुळे शेतकरी संतप्त, नाशिक-येवला रोडवर शेतकऱ्यांचा रास्तारोको
नाशिक: कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोकोस सुरुवात केली आहे. लासलगावात आधी शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला. त्यानंतर आता रास्ता रोकोस सुरुवात झाली. कांद्याचे निर्यातमूल्य कमी न केल्यानं नाशिकच्या कांदा निर्यातदारांनी कांदा लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. यामुळं स्थानिक बाजारात शेतकऱ्याच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळतोय.
२२- पुण्यातील खडकी येथे वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील २० वर्षांची तरुणी ठार
२३- पश्चिम बंगालमधील सिलिगुडी रेल्वे स्थानकावर सापडली संशयास्पद ब२ग सापडली, बॉम्बशोधक पथक घटनास्थळी दाखल
२४- डोंबिवलीजवळ रेल्वे रुळाला तडा
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२५- महात्मा फुले पुतळ्यापासून मेणबत्ती पेटवून भीमसैनिकांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पूर्णाकृती पुतळ्यापर्यंत रॅली काढून महामानवास अभिवादन
२६- इस्लापूर; चुलत मामाच्या मुलानेच केला अत्याचार
२७- समाज कल्याणचे अंतरजातीय विवाहास प्रोत्साहन; चार लाभार्थ्यांना प्रत्येकी पन्नास हजारांचा धनादेश
२८- हदगाव; चाभारा येथे मुख्याध्यापकाच्या खोडसाळपणामुळे पाच शिक्षकांची वेतनवाढ रखडली
२९- डॉक्टरांअभावी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय बनले शोभेची वस्तू
30- बाबरी मस्जिद पाडण्याच्या घटनेला २३ वर्ष पूर्ण ; काळे झेंडे लावून मुस्लीम बांधवांनी केला निषेध
३१- किनवट नगर परिषद, कार्यालयाचे नावाचे नवीन फलक बसवून मराठी, इंग्रजी, उर्दू भाषेचा उल्लेख करणेबाबत तन्जिम-ए-इन्साफ तर्फे निवेदन
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
३२- ‘श्री-जान्हवी’ घेणार निरोप
गेली अडीच वर्षे मराठी घरांमध्ये हक्काचे स्थान मिळवलेल्या 'होणार सून मी ह्या घरची' या मालिकेतील श्री-जान्हवीसह गोखले कुटुंबीय या वर्षाखेरीस रसिकांचा निरोप घेणार आहेत. येत्या डिसेंबरअखेर वा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ही मालिका बंद होणार आह दिग्दर्शक-निर्माते मंदार देवस्थळी यांनीही या बातमीला दुजोरा दिला आहे. १५ जुलै २०१३ ला 'होणार सून..'चा पहिला भाग प्रसारित झाला. गेल्या अडीच वर्षांत या मालिकेचे ७५० वर भाग झाले. मालिका सुरू झाल्यापासून तिची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही. शशांक केतकर, तेजश्री प्रधान, मनोज कोल्हटकर, प्रसाद ओक, अशा शेलार, रोहिणी हट्टंगडींसह सहा सासवा यांच्या भूमिका कमालीच्या गाजल्या. सोशल मीडियावर जान्हवीच्या 'काहीही हं श्री' या संवादांसह तिच्या बाळंतपणाचे अनेक विनोद निर्माण झाले आणि सर्वदूर पसरले, ते या लोकप्रियतेमुळेच. जान्हवीची विस्मृती, श्री-जान्हवीचे लग्न, शशिकलाचे अतरंगी किस्से, पिंट्याचे अफेअर असे टप्पे गाठत आता ही मालिका शेवटच्या वळणावर येणार आहे. याबाबत बोलताना देवस्थळी म्हणाले, 'आम्ही मालिका बंद करत आहोत हे खरेच. असे असले तरी शेवटचा भाग कधी दाखवायचा, कथानक कसे वळवायचे याबाबत काहीही ठरलेले नाही.
३३- सलमानच्या हिट अँड रनप्रकरणी आज हायकोर्टात अंतिम सुनावणी
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
३४- शेतकऱ्याच्या विविध मागण्यांसाठी देवस्थान जमीन हक्क संघर्ष समिती माहूर तर्फे दि. ८ रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन
~~~~~~~~~~~~~~~
३५- 'शेतकऱ्यांसोबत भाव करतांना एकदा जरूर विचार करा' - मन हेलावून टाकणारा व्हिडीओ
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
साईराज ठक्के, प्रमोद बारडकर, राजन गरुड, सुमित मालेवार, अशोक वाघ, अनिकेत भोसले, विजय गौर, आनंद कृष्णापुरकर, अमित भुतडा, संतोष गव्हाणे, सत्यजित यादव, रिशी राठोड, डी.के. उमरीकर,
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
आप आपनी मंजिल पर कभी नही पहूंच पायेंगे, अगर भोंकने वाले कुत्तो को पत्थर मारोगे
[काव्या गायकवाड, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456,
8975495656

No comments:
Post a Comment