Monday, 7 December 2015

परभणी - सोनपेठ येथील आरोग्य केंद्र बनले शोभेची वस्तू







[परभणी, प्रतिनिधी]
नियमित औषध गोळ्या तुटवड्यामुळे रुग्णांचे हाल  (परभणी -सोनपेठ  ) नव्वद हजार लोकसंख्या असलेल्या सोनपेठ तालुक्याला शहराच्या ठिकाणी एकच प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहे. परंतु या आरोग्य केंद्रात मुलभुत सोयीसुविधांचा नेहमीच अभाव भासत असल्याने तालुक्यातील गोरगरिब रुग्णांना मात्र खाजगी दवाखान्याच्या अधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे सोनपेठ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे एक शोभेची वस्तू बनले आहे.
सोनपेठ तालुक्यात सरासरी 90 हजार लोक रहातात. या नागरिकांचे आरोग्य सेवेसाठी तालुक्याच्या ठिकाणी एकच प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राची ईमारत मोडकळीला आली असुन डाॅक्टरांच्या  निवास्थानची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या दवाखान्याच्या परिसरातील  आनेक नागरीक आरोग्य केंद्रात दररोज शैचासाठी येतात. त्यामुळे दवाखान्यात दुर्गंधी पसरलेली दिसुन येते. याठिकाणी प्रसुतीसाठीच्या योग्य त्या  सुविधा उपलब्ध नसुन कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बंद आहेत.सर्पदंस , विंचू दंस,  कुत्रा तसेच ईतर पाळीव प्राणी दंस व मुलांना दिल्या जाणा-या लसिकरणाच्या औषधींचा तुटवडा तर नित्याचाच होय.रक्तदाब व सुगर सारख्या अजारांच्या रुग्णांचे औषध गोळ्या अभावी हाल सुरू आहेत. 
मागील दोन वर्षापूर्वी सोनपेठ येथे ग्रामीण रुग्णालया मंजूर झाले असुन पुरेशा निधी अभावी त्याचे बांधकाम अर्ध्यावरच रखडले आहे. राजकीय मतभेदांपोठी कोणत्याही लोकप्रतिनिधीना या महत्त्वाच्या बाबींकडे लक्ष देण्यासाठी वेळच दिसत नाही. या एकंदरीत परिस्थितीचा त्रास मात्र सामान्य रुग्णांना भोगावा लागत आहे. जिल्हाप्रशासनाने या सर्व बाबिंकडे लक्ष देण्याची नितांत गरज आहे.
** रविंद्र देशमुख - परभणी **

No comments: