Tuesday, 8 December 2015

मुखेड येथे जागतिक संगणक साक्षरता रँली



मुखेड :- रियाज शेख
       तंत्रज्ञानाच्या युगात सर्वांना संगणकीय ज्ञानाची आवश्यकता आहे. प्रत्येक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. बँक असो की शासकीय कार्यालय, सार्वजनिक संस्था सर्वच क्षेत्र हे संगणकिय करण्यात येत आहे. म्हणुन सर्वांनी संगणकाचे ज्ञान घेने गरजेचे आहे. ज्यांची कम्प्यूटरवर कमांड, त्यांनाच जगभर डिमांड असे उदगार मुखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डाँ.अमितकुमार सोंडगे यांनी जागतिक संगणक साक्षरता सप्ताहानिमित्य आयोजीत कार्यक्रमात काढले.
      जागतिक संगणक साक्षरता सप्ताहानिमित्य मुखेड येथे भव्य संगणक साक्षरता रँली काढण्यात आली. मुख्याधिकारी डाँ.अमितकुमार सोंडगे यांच्या हस्ते रँलीस सुरुवात करण्यात आली. रँली मध्ये जिल्हा परिषद हायस्कुल मुलिंचे विद्यालय, शाहिर अण्णा भाऊ साठे महाविद्यालयातील दोन हजार विद्यार्थींनी सहभागी होत्या. 
कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी जोशी कम्प्युटर चे जय जोशी, आय.सी.टी.चे गजानन गेडेवाड, मादास कम्प्यूटर चे कैलास मादसवाड, आदित्य कम्प्यूटरचे बोळेगावे सर, जी.ए.कम्प्यूटर चे पवन शिरबरतळ आदींनी विशेष परिश्रम घेतले.

No comments: