Wednesday, 9 December 2015

मुखेड येथे भव्य पशु पालक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन




मुखेड :-  रियाज शेख 


                              दुष्काळ जन्य परस्थित जनावरांचे आहार, चारा, रोग नियंत्रण इत्यादीचे नियोजन व दुष्काळ परिस्थितीत पशु पालनाचे नियोजन या विषयावर भव्य पशु पालक व शेकतरी मेळाव्याचे आयोजन आज 10 डिसेंबर रोज गुरुवार दुपारी 3 वाजता विकास गंगा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन विद्यालय शिकारा ता.मुखेड येथे आयोजन करण्यात आल्याची माहीती सिद्धार्थ दत्तात्रय जाधव यांनी दिली आहे. 
      महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुर, पशु वैद्यकिय व पशुविज्ञान महाविद्यालय उदगीर आणि विकास गंगा पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका विद्यालय शिकारा ता.मुखेड यांच्या संयुक्त विद्यमाने पशुपालक व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा.डाँ.अविनाश करपे सहयोगी अधिष्ठता प.वै.म.उदगीर, उदघाटक मुखेड भुषण डाँ.दिलीप पुंडे, प्रमुख मार्गदर्शक प्रा.डाँ.नंदकुमार गायकवाड़, प्रमुख अतिथी डाँ.एम.यु.गोहत्रे, गटविकास अधिकारी व्ही.एन. घोडके, कृषी अधिकारी एन.जी.मंथलवाड, डाँ.देवदे जी.डी., व्ही.के.नारनाळीकर, डाँ.डी.एन. मुर्कीकर, डाँ.विक्रम साळवे उपस्थित राहणार आहेत. 
      तरी या मेळाव्यास जास्तीत जास्त संख्येने पशुपालक व शेतकरी बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहण आयोजक सिद्धार्थ जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

No comments: