मुखेड :- रियाज शेख
तालुक्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत मौजे आंबुलगा येथे 8 डिसेंबर रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी विविध लोककल्याणकारी निर्णयाचे ठराव घेण्यात आले.
या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.सुशिला संजय आकुलवाड होत्या. तर विनोद गोविंदवार उपसरपंच, ग्रामसेवक सह सर्व ग्रामपंचायत सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले. ज्यामध्ये गावातील प्रत्येक व्यक्तीच्या हाताला रोजगार उपलब्ध करुन देणार, पाणी प्रश्नावर विशेष व्यवस्थापन करणार, गावातील प्रत्येक घर नमुना नं 8 ला लावणार, निराधार, विधवा परितक्त्या यांचा प्रश्न लवकरच निकाली काढणार व त्यांना पेन्शन सुरु करणार, गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीची नावे अन्नसुरक्षेच्या यादीमध्ये समाविष्ट केली जाणार, गावातील गोरगरिब जनतेला तात्काळ रेशनकार्ड उपलब्ध करुन देणार असा ठराव सर्वानुमते पारित करण्यात अाला. या ग्रामसभेस गावातील महिला, पुरुषासह तरुण युवक गावकरी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment