देगलूर - [प्रतिनिधी, संदीप देसाई]
देगलूर शहरातील पोलीस स्टेशन लगतच्या भागातील टीन शेड लावून काही लोकांनी अरीक्रमण केले आहे. ते अतिक्रमण व शहरातील अनेक भागात रस्त्यावर दुकाने थाटून बसलेली आहेत. त्यांच्यावर कार्यवाही करण्यसाठी 'दबंग सियो' म्हणून शहरात ओळखले जाणारे देगलूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी आपली टीम सज्ज ठेवल्याचे वृत्त आहे. पोलीस प्रशासनाला पण सूचना दिल्याचे कळते.
नगर परिषदेच्या हालचालीवरून कार्यवाही अटळ आहे असे दिसून येते.
पुढील दोन दिवसात अतिक्रमण करणाऱ्यावर कार्यवाही होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे .


No comments:
Post a Comment