Saturday, 12 December 2015

मुखेड न्यायालयासमोरच देशी दारु दुकानाचा घाट नागरिकांसह वडार संघाचा तीव्र विरोध



"मुखेड न्यायालयासमोरच देशी दारु दुकानाचा घाट नागरिकांसह वडार संघाचा तीव्र विरोध"

मुखेड :-शेख बबलु मुल्ला वार्ताहर


         मुखेड शहराच्या न्यायालया समोरच ५० फुटावर व मंदिरा जवळच नविन देशी दारुचे दुकान येत असुन सदर दुकानास या परिसरातील नागरिक आणि वडार समाज संघाने प्रदेशाध्यक्ष डाॅ.श्रावण रँपनवाड यांच्या नेतृत्वात दुकानास. विरोध दर्शविला असून तीव्र आंदोलनाचे इशारा निवेदन न.पा.व तहसीलदार ला दिले आहे. मुखेड शहरातील मुख्य रस्यावर जिल्हा सत्र न्यायायय व दिवाणी न्यायालय असुन सदर न्यायालयाच्या प्रवेश व्दारा समोर ५० फुटावर नवीन देशी दारूचे श्री सुरेश तोडनकनकर रा.बागमंडल जि.रायगड यांच्या  नावे  असलेले दुकान येत असुन या दुकान दारासमोर विरोध करत नागरिकांनी व वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष डाॅ.श्रावण रँपनवाड यांनी तिव्र विरोध केला आहे.हे दुकान कोर्टा समोर मंदिराच्या अतिशय जवळ आहे.तसेच दुकानाच्या बाजूनेच या भागातील महीला व नागरिक जाण्याचा रस्ता आहे. शिवाय समोर कोर्ट बाजूला तिन बँका व व्यापारपेठ आहे परिसरात कोचिंग क्लासेसही असल्याने विध्यार्थी व विद्यार्थीनी गर्दी
येथे असते. त्यामुळे देशी दारू चे मोठे दुष्परिणाम होणार आहेत.या परिसरातील महीला व नागरीकांना देशी दारु पिण्यास येणा-यांचा प्रचंड त्रास होणार आहेत. शिवाय अनेक वेळा देशी दारूचे  बळी हे  वडारा री तळागाळातील समाजच ठरले आहे यामुळे आधीच मुखेड मध्ये अनेक बार व देशी दारुचे दुकाने असताना आजुनही देशी दारुचे दुकान शहरातील कोर्ट,मंदिरा परिसरात येणे संतापजनक आहे कोर्टासमोर व मारोती मंदिरा नजिक येऊ घातलेल्या या नविन देशी दारु दुकानास न.पा.प्रशासनाने नाहरकत प्रमाणपत्र देउन मान्यता दिली आहे.सदर नाहरकत व मान्यता रद्द न झाल्यास सदर परिसरातील नागरीकांसह वडार समाज संप तीव्र आंदोलन करणार असून धरने,उपोषणे व मोर्चा आदीसह विविध आंदोलने उभे करण्याचा निर्धार वडार समाज संघाचे प्रदेशाध्यक्ष डाॅ. श्रावण रँपनवाड यांनी व्यक्त केला आहे.सदर आंदोलनास बार असोसिएशन व महिलांची मदत देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे निवेदनावर डाॅ. श्रावण रँपनवाड यांच्या सह अशोक जाजु ,गोवींद बियाणी,महेंद्र गादेकर, गोवर्धन पवार, बलभीम पत्की, गंगाधर कुमदळे,विद्याधर नंदगावकर,भुमाबाई पाटील, गजानन पेंडकर,गोविंद पोलावार,आदींसह दिला आहे.

No comments: