विजय नगर मध्ये हाडांचे तपासणी शिबिर
नांदेड, दि.17- (प्रतिनिधी)
शहरातील विजय नगर मधील गंगोत्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र सुधाकुंज बिल्डिंग मध्ये हाडांची ठिसुळता मोफत तपासणी शिबिर दि.19 डिसेंबर रोजी सकाळी दहा ते पाच वाजता दरम्यान होणार आहे. या शिबिराचे उदघाटन युवक कॉग्रेसचे लोकसभाअध्यक्ष तिरुपती कोंढेकर व विठ्ठल पाटील डक यांच्या हस्ते होणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ.कल्पनाताई डोंगळीकर व नगरसेविका वैशाली मिलिंद देशमुख आदी उपस्थित राहणार आहेत. तरी रुग्नानी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन युवक काँग्रेस चे सरचिटणीस निखिल पाटील चौधरी यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment