Thursday, 17 December 2015

अकोला येथे मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशन



अकोला येथे मराठा सेवा संघाच्या रौप्य  महोत्सवी महाअधिवेशन


नांदेड [गिरीश वाकोडीकर]―
                   
                      महाराष्ट८ीय अकोला येथे मराठा सेवा संघाच्यावतीने रौप्य महोत्सवी वर्ष निमीत महाअधिवेशन दि. 24,25 व 26  डिसेंबर 2015 रोजी होणार असुन या रौप्य महोत्सवाला देशातील हजारो मराठा सेवासंघाचे कार्यकर्ते येणार असल्याचे पत्रकार परिषदेत मराठासेवा संघाचे प्रदेश अध्यक्ष प्रा. कामाजी पवार यांनी नांदेड येथील सिटी प्राईड हाॅटेल मध्ये पत्रकार परिषेदेत सांगितले.

अॅड पुरूषोत्तम खेडेकर यांनी समविचारी मराठा अधिकाÚयांना एकत्र घेवून स्थापन केलेली मराठा सेवा संघ ही वैचारीक चळवळ 2015 साली आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे.   दिनांक 24,25 व 26 डिसेंबर 2015  रोजी मराठा सेवा संघाच्या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाचे आयोजन अकोला येथे  आयोजीत करण्यात आले असून मनोरंजन, प्रबोधन, महिला व युवकांचे विविध प्रश्न यासह अनेक जाती जमातीच्या 31 संघटनाचे प्रदेश प्रतिनिधी या निमित्ताने एकाच विचार मंचावर आणण्याचा अभिनव उपक्रम मराठा सेवा संघाने केला आहे. अठरा पगड जातीच्या बहुजन संघटनांचे प्रतिनिधी एकाच विचार मंचावर येत असलेल्या या आगळया वेगळया अधिवेशनाकडे संपुर्ण देशाचे लक्ष लागले आहे. जगभरातून लाखों मराठा बहुजन बांधव या अधिवेशनासाठी उपस्थित राहणार असून अकोला जिल्हा मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड सर्व 33 कक्ष जļयत  तयारीला लागलेले आहेत.

गुरूवार 24 डिसेंबर दुपारी 1 वाजता अकोला शहरातून भव्य मिरवणूकीने या अधिवेशनाची सुरूवात होत असून  संध्याकाळी 7 वाजता मराठी चित्रपट कलावंचाताचा कला अधिष्कार असलेल्या रंग वेध या कार्यक्रमाची रसिक प्रेक्षकांना मेजवानी भेटणार आहे.

शुक्रवार 25 डिसेंबर सकाळी मंत्री शिवश्री नितीनजी गडकरी यांचे हस्ते या रौप्य महोत्सवी महाअधिवेशनाचे उदघाटन संस्थापक अध्यक्ष अॅड. पुरूषोत्तम खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली होत असुन यावेळी युवराज संभाजी राजे, प्रदेश काॅग्रेस अध्यक्ष खा. अशोक चव्हाण,राष्ट८वादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, महसुल मंत्री एकनाथराव खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, विरोध पक्ष नेते, धनंजय मुंडे, राज्यमंत्री प्रवीण पोटे यांचेसह बहुसंख्य  आमदार, खासदार, उद्योजक, सिनेनाटय कलावंत उपस्थित राहणार असून  या अधिवेशनाला अकोला जिल्हयाचे पालक मंत्री डाॅ. रणजीत पाटील स्वागताध्यक्ष म्हणून लाभलेले आहेत.

यावेळी डाॅ. रूख्माबाई राउत आरोग्य कक्षातर्फ आत्महत्याग्रस्त शेतकÚयांच्या कुटूंबाना आर्थिक मदतीचे वाटप करण्यांत येणार आहे. देशाची निम्मी लोकसंख्या  महिलांची असून समाज परिवर्तणात महिलांच्या  सहभागाचे महत्व अधारेखीत करत समाजकारण, राजकारण व उद्योगक्षेत्रात मराठा महिलांचे स्थान, सहभाग आणि उपाय याविषयांवरील सत्र दुपारी 2 ते 4 आयोजीत केले आहे.  माजी आमदार रेखाताई खेडेकर, खा. भावना गवळी, खा. वंदनाताई चव्हाण, माजी मंत्री सुर्यकांता पाटील, चित्रपट निर्माता अॅड. समृध्दी पोरे, सिनेअभिनेत्री प्रा. स्मिताताई देशमुख, जमात ऐ इस्लामी हिंदच्या शाहिस्ता कादरी, यांच्यासह अनेक माता भगिनींच्या सहभागातून महत्वपुर्ण विचारमंथन होणार आहे. दुपारी 4 ते 7 युवकांसाठी प्रदेश व प्रशासकीय सेवा संधी या विषयांवरील सत्रात आय.ए.एस. आय.पी.एस. आय.एफ.एस. अधिकारी प्रभाकरराव देशमुख, मधुकरराव कोकाटे, ज्ञानेश्वर  पाटील, प्रतिक ठुबे, आशिष ठाकरे, हर्षल भोयर, अनिता पाटील, मोक्षदा पाटील, स्वप्नील खेडेकर इत्यादी उपस्थितांचा मार्गदर्शन करणार आहेत. 4 थ्या सत्रात उपस्थितांच्या मनोरंजनासाठी चित्रपट टि.व्ही. नाटय, कलावरांचा सहभाग असलेल्या संगीत रजनी  चे आयोजन करण्यांत आले आहे.
शनिवार 26 डिसेंबर सकाळी 9 वा. शहिरांचे पोवाडे, प्रसिध्द सप्त खंजेरी वादक सत्यपाल महाराजांची सत्यवाणली हया कार्यक्रमा नंतर विविध जाती जमातीच्या सामाजीक संघटनाचे पदाधिकारी यांचा सहभाग  असलेल्या महासंवादाचे आयोजन माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांचे अध्यक्षतेखाली होणार असून मागील 25 वर्षात मराठा सेवा संघाने इतर जाती संघटनांशी निर्माण केलेले सलोख्याचे संबंध अधिक दृढ मुल करण्यासाठी अभिनव पाउल उचलण्यांत येत आहे. दूसÚया सत्रात प्रदेश अध्यक्ष कामाजी पवार यांच्याअध्यक्षेतेखाली महाराष्ट८ा बाहेरील मराठा समाज व त्यांचासमन्वये या विषयावर विचार मंथन होणार असून 18 राज्यातील मराठा समाजाचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.

समारोपीय सत्र दुपारी 3 ते 6 संस्थापक उपाध्यक्ष वसंतराव बेडसे यांच्या अध्यक्षतेखाली होत असून न्यायमूर्ती बि.जी.कोळसे पाटील, शि.भ.प. शिवराज महाराज शि.भ.प. बद्रनाथ महाराज तनपुरे, ब्रिगेडीयर सुधिर सावंत, जेष्ठ पत्रकार ज्ञानेश महराज, प्रकाश पोहरे, जेष्ठ विचारवंत डाॅ.आ.ह. साळुखे,मा.म.देशमुख, लाॅर्ड बुध्दा पॅनलचे भैयाजी खेडकर इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. रात्री 7 ते 10 हास्य सम्राट अॅड. अनंत खेडकर यांच्या मायबोली हास्यकवी संमेलनाचा रसिकांना आस्वाद घेणार आहे. या अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी प्रदेश अध्यक्ष कामाजी पवार, प्रदेश महासचिव मधुकर मेहकरे, उपाध्यक्ष दिलीप साबळे, अशोक महाले अकोला जिल्हाध्यक्ष डाॅ. पुरूषोत्तम तायडे, प्रा. प्रदिप चोरे, संभाजी बिग्रेड चे जिल्हाध्यक्ष पंकज जायले, जिजाउ ब्रिगेडच्या इंदूताई देशमुख वीर भगतसिंग विद्यार्थी परिषेदेचे शिवाजी भोसले यांचेसह सर्व 33 कक्षांचे सर्व पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत.

आपल्या जिल्हयातील हजारो समाज बांधवानी या अधिवेशनाला सहकूटूंब उपस्थि राहावे असे आवाहान या पत्रकार परिषेदेला खाली पदाधिकाÚयांनी केले.

शिवाजी राजे पाटील, प्रा.डाॅ. गणेशराव शिंदे žविभागीय अध्यक्ष― इंजी. शे.रा.पाटील, इंजी व्ही.टी. शिंदे, डाॅ.सुरेश कदम, सदाशिव पाटील, पंडीतराव कदम, पंडीतराव पवळे, शामसुंदर शिंदे, जिल्हाध्यक्ष डाॅ. सोपानराव क्षीरसागर, जिल्हाकार्याध्यक्ष उध्दवराव सुर्यवंशी एन.जी. कल्याणकर, सचिव रमेशराव पवार, गणेश बहेगांवकर, प्रा. राधाकृष्ण होगे,प्रल्हाद दुपरडे, पी.के.कदम, बळवंत पवळे, शंकर जाधव, सतीश देशमुख, सतीश जाधव, सुरेश सोळंके, प्रा. अशोक खुंडे, कामाजी कल्याणकर, किशन वाकोरे, डाॅ.राजीव पाटील, मधुकर महराज बारूळकर, शिवाजी पाटील, रामदास चव्हाण, व सर्व कक्षाचे  अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे.

No comments: