Tuesday, 8 December 2015

नमस्कार लाईव्ह ०८-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ०८-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- ऑनलाईन चॅटिंगद्वारे पुसदच्या तरुणांचं ब्रेश वॉश, ISIS चा कट उधळला
                         यवतमाळच्या पुसदमधील सहा तरुण आयएसआयएसच्या मार्गावर असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑनलाईन चॅट करुन या तरुणांचं ब्रेन वॉश केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांवर केलेल्या हल्ल्यामुळे या तरुणांचं बिंग फुटलं. या प्रकरणी तीन जणांना अटक झाली असून तिघे फरार आहे. 

२- सीरियातल्या शरणार्थींना घेऊन येणारी बोट बुडाली असून त्या बोटीतील सहा लहान मुलांचा करूण अंत
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- नितीन गडकरी वाहतूक कोंडीत 2 तास
                  केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरीच काल सोमवारी दिल्लीच्या ट्रॅफिकमध्ये तब्बल 2 तास अडकून पडले होते. दिल्ली एअरपोर्टकडे जात असताना गडकरींना महिपालपूर पुलावर दोन तास दिल्लीच्या वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागलं. यावरून गडकरींनी अर्थातच एनएचएआयच्या अधिकार्‍यांना फटकारलं देखील पण या निमित्ताने दिल्लीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा चर्चेला आलाय. म्हणूनच गडकरींनी संबंधित अधिकार्‍यांना यावर तत्काळ तोडगा काढण्याचे आदेश दिले आहे. 

४- ११ डिसेंबरला महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता
५- नागपुरात 'जय महाराष्ट्र' विरुद्ध 'जय विदर्भ'च्या घोषणा
६- सरकार राजकीय सूडबुद्धीने वागतेय - राहुल गांधी
                नॅशनल हेराल्ड प्रकरणात भाजप सरकार सूडबुद्धीने वागत असल्याचा आरोप काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. भाजप सरकार सूडबुद्धीने वागले तरी, मी थांबणार नाही. मी सरकारला प्रश्न विचारुन दबाव निर्माण करण्याचे काम चालूच ठेवणार असे राहुल गांधी म्हणाले. 

७- चित्रपट निर्माता साजिद नाडियावालाच्या घरावर आणि ऑफिसवर आयकर विभागाचा अधिका-यांनी छापा
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
८- कांदिवलीतील आग वनखात्याने लावली, शिवसेना आमदाराचा गंभीर आरोप
                  कांदिवलीमधील दामू नगर झोपडपट्टीला लागलेली आग वनखात्यानं जाणूनबुजून लावली असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी केला आहे. वनखात्याला इथली झोपडपट्टी हटवायची होती. त्यामुळं वनखाते आणि इतर अधिकाऱ्यांनी मिळून हा घातपात घडवून आणल्याचंही सुर्वे यांनी म्हटलं आहे. 

९- सरकारची सत्तेत राहण्याची लायकी नाही: नारायण राणे
                   सरकारची सत्तेत राहण्य़ाची लायकी नसल्याची घणाघाती टीका नाराणय राणेंनी केली आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांकडे गृहखातं असतानाही नागपुरात गुंडाराज असल्याची टीकाही राणेंनी यावेळी केली. ‘3000 शेतकऱ्यांच्या आत्महत्येसाठी हे सरकार जबाबदार असून या सरकारवर 302चं कलम लावा.’ असंही राणे म्हणाले. ‘तसेच हे सरकार म्हणजे फेकू सरकार आहे.’ असल्याची बोचरी टीकाही राणेंनी केली. 

१०- विधानपरिषेदेसाठी आघाडी पाठोपाठ युतीचं जागावाटप जाहीर, भाजप ५, तर शिवसेना ३ जागांवर लढणार
११- शनी शिंगणापूर प्रकरणी मुंबई धर्मदाय आयुक्ताकडे अहवाल सादर
                      शनी शिंगणापूर प्रकरणी मुंबई धर्मदाय आयुक्तांकडे अहवाल सादर करण्यात आलाय. नगर सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी सोमवारी सीसीटीव्ही फुटेजसह अहवाल सादर केलाय. नगर धर्मादाय आयुक्तालयानं नुकतीच घटनास्थळाची पाहणी केलीय. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍यातली दृश्य आणि विश्वास्तंाशी चर्चा करुन अहवाल तयार केला. अहवालात सीसीटीव्हीनुसार घडलेला घटनाक्रम, गावबंद आणि दुग्धअभिषेकाचा उल्लेख करण्यात आलाय. फक्त वस्तुस्थिती नमूद करण्यात आली असून कोणताही अभिप्राय नाही. मुंबई धर्मादाय आयुक्तांकडून अहवाल मागवला असून सरकारला सादर करण्यात येणार आहे. या अधिवेशनात शनी शिंग्णापूरचा मुद्दा उपस्थित होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा अहवाल पाठवण्यात आलाय

१२- उच्चभ्रू दक्षिण मुंबईत सर्वाधिक बलात्कार
                 ज्या शक्ती मिल सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईसह अवघा देश हादरला, त्या शक्ती मिलचा परिसर अद्याप असुरक्षित असल्याचं मुंबईतील एका समाजिक संस्थेच्या अहवालातून समोर आलं आहे. मुंबईतील दक्षिण-मध्य मुंबईचा भाग महिला आणि लहान मुलांसाठी अत्यंत असुरक्षित असल्याचं प्रजा फाऊंडेशनच्या अहवालात म्हटलं आहे 

१३- छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात पोलिस आणि माओवाद्यांमध्ये चकमक, पाच जवान जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- तुऴजापूर : ठेकेदारांचे पैसे थकविल्यामुळे तुऴजाभवानी मंदिरातील लाडूचे प्रसाद वाटप केले बंद
१५- औरंगाबाद : महिला पोलिसाला दोन दुचाकीस्वाराकडून मारहाण आणि छेडछाड
१६- नागपुर येथे दुचाकी चोरणारी टोळी गजाआड, १७ दुचाकी वाहने जप्त, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
१७- कोल्हापूर : तिरुपती देवस्थानकडून भेट मिऴालेल्या महालक्ष्मीच्या शालूचा लिलाव बोलीदार मिळाला नसल्याने रद्द
१८- ठाणे : शहापुर तालुक्यातील दहिगाव येथे ४४ जणांना गॅस्ट्रोची लागण
१९- विशाखापट्टणम येथील नौदलाच्या शस्त्रास्त्र डेपोला लागलेल्या आगीमध्ये ५ जण जखमी
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२०- २०१६ मध्ये आयपीएल स्पर्धा ९ एप्रिल ते २९ मे दरम्यान खेळवली जाणार. ६ फेब्रुवारीला होणार खेळाडूंचा लिलाव
२१- संजय दत्तची शिक्षा कमी करण्याचा प्रस्ताव नाही, गृहराज्यमंत्री राम शिंदे यांची माहिती
२२- संजय दत्त 7 मार्चला कायमचा सुटण्याची शक्यता
                      मुंबईतील 1993 च्या साखळी स्फोटात अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी जेलमध्ये असलेला आरोपी अभिनेता संजय दत्त लवकरच कायमचा जेलबाहेर येणार आहे. संजय दत्त येत्या मार्च महिन्यात सुटण्याची शक्यता आहे. संजय दत्त सध्या पुण्याच्या येरवडा जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात 7 मार्चला तो कायमचा जेलबाहेर येण्याची दाट शक्यता आहे.

२३- आयपीएलमध्ये पुणे आणि राजकोट या दोन नव्या संघांचा समावेश
२४- ख्रिसमस ऑफर: 603 रुपयात गोएअरने करा विमान प्रवास
                   या ऑफरनुसार विमान प्रवास भाडं  603 रुपये (फक्त बेस फेअर आणि इंधन चार्ज) आहे. ही ऑफर फक्त 8 डिसेंबरपर्यंतच आहे. तर 30 सप्टेंबर 2016 पर्यंत तुम्ही बुकींग करु शकता. तसंच 25 बुकिंगवर एक मोफत तिकीट मिळण्याची संधी आहे. 

२५- हृतिक रोशन व राकेश रोशन विरोधात कॉपीराईट उल्लंघनाची तक्रार
               अभिनेता हृतिक रोशन आणि पिता राकेश रोशन यांचा आगामी चित्रपट अडचणीत येण्याची शक्यता आहे. मॉडेल-अभिनेता सुधांशू पांडेने रोशन पितापुत्राविरोधात आपल्या ‘फर्माईश’ या आगामी चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद चोरल्याची तक्रार नोंदवली आहे 

२६- सनी लिऑन बनणार 'संस्कारी
                बोल्ड व हॉट दृश्यांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री सनी लिऑन ही लवकरच 'संस्कारी' बनणार आहे. सलमान खानचा 'रेडी' व अक्षय कुमारचा 'थॅक यू' चित्रपट लिहीणारे इक्रम अख्तर हे 'यारों की बारात' या चित्रपटाच्या माध्यमातून लवकरच दिग्दर्शनात उतरणार आहेत. तीन मित्रांच्या या चित्रपटात सनी एक पंजाबी तरूणीची भूमिका करणार असून परदेशी शिक्षण घेतलेले असूनही ती संस्कार जपणारी, भारतीय पेहरावात वावरणारी तरूणी साकारणार आहे. पण संस्कारी मुलीची भूमिका करतानाच ती त्या तीन मित्रांच्या कल्पनाविलासातील एक हॉट तरूणी रंगवणार आहे.

२७- तामिळनाडूतील भीषण परिस्थितीमुळे दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांतने वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं रद्द
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२८- मुखेड येथे जागतिक संगणक साक्षरता रँली
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_76.html
~~~~~~~~~~~~~~~
२९- नांदेड; कौठा परिसरातील रस्त्याची अवस्था खड्डेमय
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_53.html
~~~~~~~~~~~~~~~
30- महाराष्ट्रात काही भागात ११ डिसेंबर रोजी मुसळधार पावसासह गारपिटीचा हवामान खात्याचा अंदाज
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_17.html
                पुण्यासह मध्य महाराष्ट्र , मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. 11 डिसेंबरला गारपीट होऊ शकते असा अंदाज वर्तवण्यात आलाय. महाराष्ट्रासह तेलंगणामध्येही पावसाची शक्यता असल्याचं पुणे वेधशाळेने सांगितलं आहे.  महाराष्ट्रात ज्या ठिकाणी गारपीट होणार त्या ठिकाणची माहिती हवामान खात्याच्या वेबसाईटवर 4 तास आधी उपलब्ध करण्यात येणार असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे.  

~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
नाते हे हृदयात असले पाहिजे, शब्दात नाही...
आणि नाराजी ही शब्दात असली पाहिजे हृदयात नाही.....
[विठ्ठल धर्माधिकारी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
स्वतंत्र विदर्भाची मागणी योग्य आहे का?
अ- होय
ब- नाही
क- तटस्थ
http://namaskarlivenanded.blogspot.in/?m=0
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
केक, चॉकलेट, टेडी, बुके, ड्राय फ्रुट, स्वीट्स आणि बरच काही.........
फक्त १५ रुपयांपासून बुके उपलब्ध
<<<कार डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन, घरांची आर्टिफिशिअल सजावट, पेबल्स, लकी प्लांट>>>
प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
जिथे वाचकाच बनतात रिपोर्टर, पाठवा आपल्याकडील बतिमी 8975495656 च्या Whats Up वर,
नमस्कार लाईव्हच्या वाचकांच्या उदंड प्रतिसादाबद्दल वाचकांचे अभिनंदन.
राज्यातील पहिले सोशल मिडिया न्यूज चॅनेल 'नमस्कार लाईव्ह'
जे पोहोचतेय महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात,
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत, अगदी काही वेळातच
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments: