Friday, 11 December 2015

मुखेड येथे काळ्याबाजारात विकणारा राँकेल चा अवैध साठा जप्त, राँकेलमाफियाला सोडुन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल



मुखेड :-  रियाज शेख
      शहरातील मुख्य मार्गावरिल एका काँम्प्लेक्स मध्ये राँकेल माफियाने साठवुन ठेवलेल्या 16 टाक्यामधील 2700 लिटर निळे राँकेल मुखेड तहसील प्रशासनाने जप्त केले. याबाबत पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार व्यंकट गोविंदवार यांच्या तक्रारीवरुन मुखेड पोलिस ठाण्यामध्ये गु.र.नं.60/15 कलम 3,7, जिवनावश्यक वस्तु कायदा 1955 प्रमाणे अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण हे करत आहेत. याप्रकरणामध्ये राँकेलमाफियांशी आर्थिक देवाण घेवाण करुन पुरवठा विभाग राँकेल माफियांना सोडुन अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा शहरात होत आहे. विशेष म्हणजे नायब तहसीलदारांनी तक्रारी मध्ये 32 टाक्यांचा उल्लेख केला आहे. परंतु पोलिस स्थानकाच्या परिसरात फक्त 16 टाक्या पाहवयास मिळाल्या.
       मुखेड शहरात व तालुक्यात सर्रास पणे किरकोळ व घाऊक राँकेल विक्रेते हे राँकेल गरिबांना व शिधापत्रिका धारकांना देण्याऐवजी काळ्याबाजारात चढ्या दराने विक्री करत असल्याची तक्रार आज पर्यंत अनेक सामाजिक कार्यकर्ते, लाभार्थि-यांनी पुरवठा प्रशासनास केली आहे. व राँकेल विक्रेत्यांची माहीती अधिकाराखाली माहीती मागीतली परंतु राँकेलमाफियांशी आर्थिक देवाण घेवाण करणारे पुरवठा विभागाने आजपर्यत कोणतीही माहीती दिली नाही. गरिबांच्या छोपड्यामध्ये दिवा लागावा, चुल पटावी या उद्देश्याने शासनाने पुरवठा विभागामार्फत किरकोळ व घाऊक विक्रेत्याद्वारे गरिबांना व शिधापत्रिका धारकांना राँकेल पुरवठा केला जातो. परंतु गरीब व शिधापत्रिकाधारकांना सोडुन काही राँकेल विक्रेते राँकेलमाफिया बनुन राँकेल चढ्या दराने काळ्याबाजारात विकत आहेत. याबाबत अनेकांनी तक्रार केली आहे. 
       दि. 9 डिसेंबर रोजी नायब तहसीलदार गोविंदवार यांनी पोलिस स्थानकात दिलेल्या तक्रारीनुसार  तहसीलदार सुरेश घोळवे यांनी पुरवठा विभागास शहरातील मुख्यमार्गावरील एका काँम्प्लेक्स मध्ये छापा टाकण्याचे लेखी आदेश दिले. त्यानंतर नायब तहसीलदार एस.एम.पांडे यांनी सदर काँम्प्लेक्स येथे छापा टाकुन तेथील राँकेल च्या 14 भरलेल्या टाक्या, दोन अर्ध्ये भरलेल्या टाक्या अंदाजे 2700 लिटर 54000 किंमत सह 16 रिकाम्या टाक्या जप्त केले. याबाबत मुखेड पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले. 
    पुरवठा विभागाने मोठ्या राँकेलमाफियाला सोडुन अज्ञात आरोपीवर गुन्हा नोंदवला असल्याची चर्चा शहरात सुरु आहे.

No comments: