Thursday, 10 December 2015

नमस्कार लाईव्ह १०-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १०-१२-२०१५ सायंकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- २६/११ मुंबई हल्ला : पाकिस्तानी कोर्टात साक्षीदार पलटला, म्हटला जिवंत आहे कसाब 
                        मुंबई हल्ला प्रकरणी पाकिस्तानच्या सरकारी पक्षाला आज शरमेने मान खाली  घालावी लागली आहे. या प्रकरणी प्रमुख साक्षीदाराने आपली साक्ष बदलली आणि म्हटला हल्ल्यानंतर जिवंत पकडण्यात आलेला आणि फाशी देण्यात आलेला एकमेव बंदुकधारी अजमल कसाब जिवंत आहे.  कोर्टाच्या एका अधिकाऱ्याने सांगिले की 'फरिदकोटच्या प्राथमिक विद्यालयाचे हेडमास्टर मुदस्सिर लखवी यांनी कोर्टात सांगितले की त्यांनी कसाबला शिकविले आहे, पण तो जिवंत आहे. अजमल कसाब या शाळेत तीन वर्ष शिकला होता.

~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
२- राजकीय वारे कुठे वाहतायेत, हे लक्षात घेण्यासाठी पवारांना भेटावं - नरेंद्र मोदी 
३- 'सलमानच्या केसमध्ये मुंबई पोलिसांना चिक्कार पैसा मिळाला असणार' - आभा सिंह 
                सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणी हायकोर्टाने दिलेल्या निकालाबाबत याचिकाकर्त्या वकील आभा सिंह यांनी अत्यंत उद्विग्न प्रतिकिया दिली आहे. ‘सलमान खानच्या केसमध्ये मुंबई पोलिसांना चिक्कार पैसा मिळाला असणार.’ असा गंभीर आरोप आभा सिंह यांनी केला. ‘या प्रकरणात कमाल खान हा महत्वाचा साक्षीदार असतानाही पोलिसांनी त्याला देशाबाहेक कसं काय जाऊ दिलं? तर दुसरीकडे रवींद्र पाटील यांना अटक करुन त्यांची साक्ष घेण्यात आली. तसेच रवींद्र पाटील यांचा मृत्यू कोणत्या अवस्थेत झाला? हे देखील अद्यापपर्यंत माहित पडू शकलेलं नाही.’ असे अनेक प्रश्न आभा सिंह यांनी उपस्थित केले.

४- सुलमान सुटला : सत्र न्यायलाय आणि हायकोर्टाच्या निकालातील फरक 
सत्र न्यायालय : कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलची साक्ष ग्राह्य

उच्च न्यायालय : कॉन्स्टेबल रवींद्र पाटीलची साक्ष विश्वासार्ह नाही

सत्र न्यायालय : अशोक सिंह गाडी चालवत नव्हता

उच्च न्यायालय : अशोक सिंहची साक्ष ग्राह्य धरली जावी

सत्र न्यायालय : अपघातानंतरच गाडीचा टायर फुटला

उच्च न्यायालय : टायर कधी फुटला हे सिद्ध होत नाही

सत्र न्यायालय : सलमान त्या रात्री दारू प्यायला होता

उच्च न्यायालय : सलमान दारू प्याल्याचं सिद्ध होत नाही

सत्र न्यायालय : सलमानच गाडी चालवत होता

उच्च न्यायालय : सलमानच गाडी चालवत असल्याचं सिद्ध होत नाही

सत्र न्यायालय : गाडीमध्ये फक्त तीघेच होते

उच्च न्यायालय : गाडीत असलेल्या कमाल खानची साक्ष का घेतली नाही?

सत्र न्यायालय : सलमानच्या रक्तामध्ये अल्कोहोल आढळलं.

उच्च न्यायालय : रक्ताची तपासणी करताना अक्षम्य चुका

सत्र न्यायालय : सलमानला 5 वर्ष शिक्षा आणि 25 हजाराचा दंड


उच्च न्यायालय : सलमानची निर्दोष मुक्तता 


५- निकालाचा अभ्यास करून पुढचा निर्णय घेऊ – एकनाथ खडसे  
                    अभिनेता सलमान खान याच्याविरोधातील फूटपाथ अपघात प्रकरणी उच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे, याचा अभ्यास करून त्यानंतरच राज्य सरकार पुढे काय करायचं याचा निर्णय घेईल, असं महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज (गुरुवारी) स्पष्ट केलं. फूटपाथ अपघात प्रकरणात सलमान खानवर लावण्यात आलेल्या सर्व आरोपांतून आज (गुरूवारी) उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली. त्यानंतर खडसे यांनी ही प्रतिक्रिया दिली. उच्च न्यायालयाने काय निकाल दिला आहे, याची प्रत आम्हाला मिळालेली नाही. त्याची प्रत मिळाल्यावर त्याचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर गरज वाटल्यास या प्रकरणी राज्याच्या महाधिवक्त्यांचा सल्ला मागविण्यात येईल आणि त्यानंतर सरकार सर्वोच्च न्यायालयात जायचे की नाही, याचा निर्णय घेईल, असं खडसेंनी स्पष्ट केलं.

६- २६/११ मुंबई हल्ल्याप्रकरणी आरोपी डेव्हिड हेडलीची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साक्ष 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य] 
७- अमृतमहोत्सव सोहऴा - केंद्रीय कृषीमंत्री असताना खात्याचे काम करताना आलेख कायम चढता ठेवल्याचे समाधान- शरद पवार 
८- राज्यातल्या काही साखर कारखान्यांनी थकवले शेतकर्‍यांचे 1800 कोटी रुपये 
                    राज्यातल्या साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकर्‍यांचे जवळपास साडे अठराशे कोटी रुपये थकवले आहेत. हायकोर्टाचे आदेश असूनही कारखानदार पैसे देण्यास टाळाटाळ करताहेत. त्यामुळं साखर आयुक्त आणि सरकारच्या विरोधात कोर्टाचा अवमान केल्याची याचिका स्वाभिमानी शेतकरी संघटना दाखल करणार आहे. तर दुसरीकडे साखर कामगारांनीही कारखानदारांच्या विरोधात दंड थोपटले आहेत. साखरेचे दर पडल्याचं कारण देत कारखानदार पैसे देण्यास टाळाटाळ करताहेत. चालू हंगामातील थकबाकी 1255 कोटी  रुपयांपर्यंत गेली आहे. कोर्टाचे आदेश असतानाही पैसे दिले जात नाहीत, म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोर्टात धाव घेतलीय. तर येत्या 13 डिसेंबरला चक्का जाम आंदोलनाचा इशाराही दिला आहे.

९- ‘तोयबा’चा दहशतवादी मुंबई विमानतळावर जेरबंद 
                     देशातील काही धार्मिक नेते, पोलिस अधिकारी आणि पत्रकार यांच्यासह महत्त्वाच्या व्यक्तींना जिवे मारण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप असलेल्या 'लष्कर-ए-तोयबा'च्या खतरनाक दहशतवाद्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईत अटक केल्याने खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्याला रियाधहून भारतात आणण्यात आले असून, पुढील तपासासाठी बेंगळुरूला नेण्यात आले आहे.

१०- 'मोठ्या लोकांनी दारु पिणं सोडावं', सलमानच्या निकालावर आझमींची प्रतिक्रिया 
                   हिट अँड रन प्रकरणी सलमान विरोधात कोणताही पुरावा मिळाला नाही, त्यामुळे सलमानला निर्दोष सोडण्यात आलं. त्यामुळे मी सलमान खान यांचं अभिनंदन करतो. अशी प्रतिकिया समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी दिली. मात्र, यापुढे जाऊन त्यांनी सलमानला अप्रत्यक्षपणे सल्लाही दिला. ‘मोठे लोकं दारु पिऊन गरीबांना चिरडतात. त्यामुळे अशा मोठ्या लोकांनी आपलं दारु पिणं सोडावं. तसेच ज्याप्रमाणे राज्य सरकारने महाराष्ट्रात गुटखा बंदी झाली त्याचप्रमाणे त्यांनी महाराष्ट्रात दारुबंदी आणावी.’ असंही आझमी म्हणाले.

११- सलमानच्या खानच्या सुटकेचा निर्णय दुर्देवी -शिवसेना 
१२- कुर्ला येथे भीषण आग, ५ गोदामं खाक 
                   कांदिवलीच्या दामूनगर झोपडपट्टीतील अग्नितांडव ताजं असतानाच बुधवारी रात्री कुर्ला येथे गोदामांना भीषण आग लागल्याची घटना घडली असून या आगीने कुर्ल्यातील रहिवाशांची झोप उडवली. कुर्ला येथील रोकैया इस्टेटमध्ये बुधवारी रात्री ही आग लागली. येथे दाटीवाटीने गोदामं असल्याने आग वेगाने पसरली आणि काही मिनिटांतच पाच गोदामं आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीची वर्दी मिळताच १० बंबांसह तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांच्या थर्थीच्या प्रयत्नांमुळे पुढच्या दोन तासांत आग आटोक्यात आणण्यात यश आलं मात्र तोपर्यंत लाखोंचं नुकसान झालं होतं.

१३- एक ऑक्टोंबरपासून तामिऴनाडूत पावसाशी संबंधित विविध दुर्घटनांमध्ये ३४७ मृत्यू 
१४- गुटख्यावर बंदी घातली आहे. आता दारुवरही बंदी घाला - अबू आझमी 
~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१५- कोल्हापूर; ‘आई-बाबा आमच्याशी तरी बोला, फेसबुक-व्हॉट्स अॅप टाळा’ 
                 आजकाल सोशल मीडियाच्या वापरात पालक इतक गुंतलेत की, त्यांना आपल्या मुलांकडे लक्ष द्यायला वेळच नाही. त्यामुळे पालक आणि मुलांच्या मधील संवादच हरवत चाललाय. यासाठीच ‘पालकांनो,आमच्यासाठी वेळ द्या’ अशी आर्तहाक कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड मधील सुरुते इथल्या मराठी शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी एका आगळ्या वेगळ्या प्रभात फेरीच्या माध्यमातून दिलीय.

१६- शाळेतील मुलीचे काढले अश्लील फोटो, वडिलांना पाठवण्याची दिली धमकी 
                       दिल्लीतील एका प्रतिष्ठित शाळेतील मुलीला मागील एक आठवड्यापासून अनोळखी व्यक्ती ब्लॅकमेल करत आहे. हा व्यक्ती मुलीला फोन करून भेटण्यास बोलवत आहे. जेव्हा मुलगी नाही म्हणाली तर तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. पीडित मुलगी जेव्हा या संदर्भात पोलिसांत तक्रार करण्यासाठी गेली असता. आरोपीने फोटोशॉपव्दारे मुलीचे अश्लील फोटो बनवून व्हाट्सअॅपवर पाठवले. यामुळे मुलगी पोलिसांच्या समोरच रडायला लागली. सायबर सेलचे अधिकारी फिरोज यांनी तिची समजूत काढून तक्रार लिहून घेतली आहे. पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. मुलीच्या सांगण्यानुसार आरोपीने तिचे फेसबुक आयडी हॅक करून तिला एकटीला भेटायला बोलवतो आहे. जेव्हा भेटण्यास विरोध केला तेव्हा तुझ्या बॉयफ्रेंड सोबतचा फोटो माझ्याकडे आहे. सहारागंजला आपल्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेली त्यावेळी तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याव्दारे तुमचे फोटो घेतले आहेत. तू भेटायला नाही आली तर हे फोटो तुझ्या वडिलांना पाठवेल अशी धमकी दिली.

~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
१७- सलमान सुटला : 'हॉटेलमध्ये या, कितीही खा; इच्छेनुसार बिल द्या' 
                    हिट अँड रन प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता सलमान खानची सर्व आरोपातून निर्दोष सुटका केल्यानंतर त्याचे चाहते ठिकठिकाणी जल्लोष करत आहेत. मुंबईतील ‘भाईजान्झ’ रेस्टॉरंटही सलमान निर्दोष सुटल्याने ऑफर देत आहे. ‘मेक युवर ओन बील’, अशी ऑफर रेस्टॉरंटने आज दिली आहे. हॉटेलमध्ये या, पोटभर जेवा आणि तुमच्या इच्छेनुसार बिल द्या, अशी ही ऑफर आहे. सलमान खानच्या पाच चाहत्यांनी त्याच्या सन्मानार्थ हे ‘भाईजान्झ’ रेस्टॉरंट सुरु केलं आहे. राहुल कनाल, तबरेज शेख, सोहेल सिद्धीकी, खुर्शीद खान, जफर सय्यद युसूफ, अशी रेस्टॉरंट सुरु करणाऱ्या चाहत्यांची नावं आहेत. वांद्र्यातील कार्टर रोडवर हे रेस्टॉरंट आहे.

१८- 15 मिनिटांच्या चार्जिंगमध्ये 6 तासांचं बॅटरी बॅकअप, ‘मोटो G टर्बो’ भारतात लॉन्च 
                     मोटोरोलाचा बहुप्रतीक्षित ‘मोटो G टर्बो’ स्मार्टफोन अखेर भारतात लॉन्च झाला आहे. 14 हजार 499 रुपये किंमत असणाऱ्या या स्मार्टफोनची भारतात आजपासून विक्री सुरु झाली आहे. मोटोरोलाने इतर स्मार्टफोनप्रमाणे ‘मोटो G टर्बो’ हा स्मार्टफोनही फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग वेबसाईटवर विक्रीसाठी ठेवला आहे. ड्युअल सिम सपोर्ट असलेला हा स्मार्टफोन काळा आणि पांढरा या दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे.

१९- किंगफिशर एअरलाईन्सच्या कर्ज थकबाकी प्रकरणात सीबीआयने यूबी समूहाचे चेअरमन विजय मल्ल्या यांची चौकशी 
२०- आम्हाला नुकसानभरपाई पाहिजे. आमच्याकडे पैसे असते तर, आम्ही रस्त्यावर झोपलो नसतो - अब्दुल्लाह, हिट अँड रन खटल्यातील पीडित 
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२१- जळगाव; पाचोरा ते वरखेड़ी दरम्यान वाहतुकीला अडथळे, अपघाताची दाट शक्यता
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_29.html
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहे यापेक्षा तुमचे स्वतः बद्दल काय मत आहे हे महत्वाचे
[नीलम कुलकर्णी, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
स्वतंत्र विदर्भाची मागणी योग्य आहे का?
अ- होय
ब- नाही
क- तटस्थ
http://namaskarlivenanded.blogspot.in/?m=0
~~~~~~~~~~~~~~~
[जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
संपर्क- 9423785456, 7350625656
*****************
१२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचावा एक लाखांपेक्षा जास्त लोकांपर्यंत,
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments: