Wednesday, 16 December 2015

माळेगाव ग्रामपंचायतचे अधिकार पुर्वी सारखेच ठेवा, स्थानिकांची मागणी



                       नांदेड      दरवर्षी प्रमाणे माळेगाव येथे खंडोबाची यात्रा भरते व ही  भरवण्यामध्ये माळेगाव ग्रामपंचायत या मोठा वाटा असुन जिल्हा प्रशासन या ग्रामपंचायतचे काही अधिकार काढुन घेण्याची  तयारी करीत असुन ते काढुन ने घेता पुर्वी सारखेच्य ठेवावे अन्यथा ग्रामपंचायत सदस्य विजय वाघमारे व सर्वच सदस्य आणि सरपंच आमही राजीनामे  देवु असा इशारा येथील सरपंच गोविंद राठोड यांनी या बैढकीमध्ये जिल्हा परिषद प्रशासनाला केला आहे.
यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या बैढकीमध्ये माळेगाव ग्रामपंचायतने कुठलाच प्रकारच्या टॅक्स घेऊन नये जिल्हा परिषद सर्वच निधी पुरवणार असल्याचे सांगितले असता माळेगाव येथील सरपंच व सहा सदस्यानी यावर अक्षेप घेत हा निर्णय रद्द करावा  व आम्हाला यात्रेमध्ये हाॅटेल व्यवसायीक व दुकानदार यांच्याकडुन निधी घेण्यासाठी पुर्वी सारखे नियम ठेवावे अशी मागणी बैढकीत करण्यात आली आम्ही हा निधी देणगी रूपात 100 रूपये प्रत्येक दुकानाला घेत आहोत हा निधी यात्रा संपल्यावर स्वच्छतेसाठी वापरावा लागतो, व ग्रामपंचायत यांचे नियोजन करते यावेळेस सुडबुध्दीने हा निर्णय घेत असल्याचा आरोप ग्रामपचायंत सदस्य विजय वाघमारे यांनी जिल्हा परिषद मध्ये झालेल्या बैढकीत केला यावरून माळेगावचे सरपंच व सदस्य यांनी कठोर भुमीका घेत पुर्वी सारखेच नियम ठेवावे अन्यथा आम्ही आपले राजीनामे मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे पाठवणार असल्याचे सरपंच गोविंद राठोड व सदस्य विजय वाघमारे यांनी बैठकीत केले.

No comments: