Wednesday, 16 December 2015

माळेगाव यात्रेच्या नितोजनासाठी जिल्हा परिषद नांदेड येथे बैढक संपन्न

[गिरीश वाकोडीकर, प्रतिनिधी[


                            नांदेड    महाराष्टाील प्रसिध्द असलेल्या माळेगाव यात्रेसाठी विविध सुविधा व यात्रेकरूना सोय व्हावी यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत दि. 15 डिसेंबर रोजी यशवंतराव चव्हाण सभागृहात जिल्हा परिषद च्या अध्यक्षा सौ. मंगलाताई गुंडीले यांच्या अध्यक्षतेखाली विविध सुविधा पुरवण्यासाठी चर्चा होऊन संपन्न झाली.

मराठवाडयातील प्रसिध्द खंडोबा यात्रा माळेगाव येथे भरत असुन यामध्ये जिल्हा परिषद विभागां अंतर्गत प्रकारचे प्रदर्शन यात्रेचा  खर्चा बाबत निधी  पाणी पुरवठा यांच्यासह अनेक योजना शासनावतीने जिल्हा परिषद पुरवते त्यासाठी जिल्हा परिषद सभागृहात हया बैढकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कंधार लोहा तालुक्यातील सर्वच पदाधिकारी जिल्हा परिषद सदस्य व माळेगाव यात्रा कमीटी व ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने विविध सुचना जिल्हा परिषद प्रशासनाला कळवल्या त्यामध्ये मंदीराची देखभाल परिसरातील स्वच्छता, पाणी पुरवठा नियोजन मान्यवंराची व्यवस्था व व्यवसाईकाचे यांचे परवाने, आणि यात्रेतील विविध प्रदर्शन लावणी महोत्सव यासह अनेक विषयावर चर्चा करण्यात आली  यामध्ये महसुल विभागातील कर्मचारी अधिकारी यांनी यात्रेमध्ये नियोजन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी अश्विनी पाटील यांनी या बैढकीत यात्रेतील दुकानाचा परवाना ठेवणे, पाणी टंचाई निवारण टॅकरचे पाणी  स्वच्छ नसते, यात्रेकरूना शुध्दपाणी पुरवणे व परिसरातील शेतकÚयांना अग्रोवन व्दोर शेतीविषयक मार्गदर्शन करून कृषी प्रदर्शन भरवणे यासाठी मार्गदर्शन केले या यात्रेमध्ये पोलीस प्रशासनालय वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असुन यासाठी जिल्हयातील 200 पोलीस कर्मचारी व बाहेरचे 200 पोलीस कर्मचारी एकुण 400 व होमगार्ड 200 व 50 अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पोलीस निरीक्षक दोन उपपोलीस अधिक्षक राहणार असुन दरोडा पेट्रोलींग नाके चेक अवैध धंदे बंद यासाठी बंदोबस्त ठेवणार असल्याचे कंधार लोहयाचे उपविभागीय पोलीस अधिाकारी अशोक विरकर यांनी सांगितले या बैठकीत माजी सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण  पाटील चिखलीकर, पुरूाषोत्तम धोडंगे यांनी 75 हजार निधी दिला याच्या बरोबर कंधारचे पंचायत समिती सभापती पांडागळे यांनी 25 हजार तर जिल्हा परिषद सदस्या श्रीवास मोरे यांनी  11 हजार निधी कुस्तीसाठी बक्षीस म्हणुन दिला या बैढकीला जिल्हा परिषदचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभिमन्यु काळे, शिक्षणसभापती संजय बेळगे, समाज कल्याण सभापती पांडागळे, लोहा पंचायत समिती सभापती सौ.सौनाली ढगे, उपविभागीय अधिकारी कंधार, अश्विनी पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक विरकर.

No comments: