Wednesday, 16 December 2015

नमस्कार लाईव्ह १६-१२-२०१५चे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह १६-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
[अंतरराष्ट्रीय]
१- बोको हराम या दहशतवादी संघटनेच्या अतिरेक्यांनी नायजेरियातील तीन गावांवर केलेल्या हल्ल्यात ३० जण ठार 

२- ई-मेल वरुन धमकी मिळाल्यानंतर बंद करण्यात आलेल्या अमेरिकेतील लॉस एंजिल्समधील शाळा बुधवारी उघडणार. हजारपेक्षा जास्त शाळा बंद  
~~~~~~~~~~~~~~~
[राष्ट्रीय]
३- पेट्रोल, डिझेवरील एक्साईज ड्युटीत वाढ, पेट्रोलवरील एक्साईजमध्ये 30 पैसे तर डिझेलमधील एक्साईमध्ये 1.17 रुपयांनी वाढ 

४- दोन लाखांपेक्षा जास्त व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य  
                    दोन लाख किंवा त्यापेक्षा जास्त किंमतीचा कोणताही आर्थिक व्यवहार करताना पॅन कार्ड सादर करणं अनिवार्य असणार आहे. यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडून सूचना जाहीर करणार असल्याची माहिती अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली. यापूर्वी एक लाखापेक्षा जास्त किंमतीच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड अनिवार्य करण्याची घोषणा अरुण जेटली यांनी अर्थसंकल्प सादर करताना केली होती. मात्र ही मर्यादा आता दोन लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याचं कळतं. 1 जानेवारी 2016 पासून या निर्णयाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

५- भर विधानसभेत पॉर्न पाहणाऱ्या काँग्रेस आमदाराचं निलंबन 
                    ओदिशा विधानसभेत मोबाईलवर पॉर्न पाहताना पकडल्या गेलेल्या आमदारावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी काँग्रेस आमदार नब किशोर दास यांनी प्रश्नोत्तराच्या काळात फोनवर पॉर्न पाहत असल्याचं उघड झालं. दास यांनी मात्र चुकून पेज ओपन झाल्याचा दावा केला आहे. दास यांचं पितळ उघड पडल्यानंतर ओदिशा विधानसभेतील विरोधीपक्षातल्या आमदारांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली. त्यानंतर सभागृहातून सात दिवसांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं. नब किशोर दास हे ओदिशाच्या झारसुगडातील काँग्रेसचे आमदार आहेत.

६- पंतप्रधानपदासाठी मीच योग्य : आझम खान 
                      समाजवादी पक्षाचे आझम खान यांनी  नरेंद्र मोदींपेक्षा आपणच देशात सध्या पंतप्रधानपदासाठी मी योग्य व्यक्ती असल्याचा दावा केलाय. मोदी यांनी राजीनामा दिल्यानंतर सर्व खासदार पंतप्रधानपदासाठी माझी निवड करतील, असे धक्कादायक वक्तव्य केलेय. पंतप्रधानपद मिळाल्यानंतर देशाला प्रगती पथावर घेऊन जात मी एक चांगला संदेश देईन, असे ते म्हणालेत. पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव माझ्या नावाला पाठिंबा देतील, असा दावाही केलाय.

७- २००० सीसी पेक्षा जास्त क्षमतेचे इंजिन असलेल्या गाडयांवर दिल्लीत सर्वोच्च न्यायालयाची बंदी 
८- केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत योजनेसाठी वर्ल्ड बँक देणार १० हजार कोटींचे कर्ज 
~~~~~~~~~~~~~~~
[राज्य]
९- साईप्रसाद चिटफंड घोटाळा प्रकरणी बाळासाहेब भापकर यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई, बंगल्यावर छापा आणि दोन कार्यालयेही सील 

१०- मुंबईतल्या देवनारमध्ये 40 वर्षीय महिलेचा मृतदेह, मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरून विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न, ओळख मात्र अस्पष्ट 
                       मुंबईतल्या देवनार पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 40 वर्षीय महिलेचा मृतदेह सापडल्यानं खळबळ माजली आहे. मृतदेहाचे हात-पाय कापून ते बँगमध्ये भरून नाल्यात फेकण्यात आले. तर दुसऱ्या बॅगेत संपूर्ण धड टाकून ते नाल्यात फेकण्यात आलं होतं. एका रहिवाशानं ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस या हत्या प्रकरणाचा तपास करत आहे. देवनार पोलीस स्टेशनच्या इंडियन ऑईल नगरमधील नाल्यात हा मृतदेह आढळून आला आहे. अदयाप या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

११- नागपुरात विधानभवनाजवळ आंदोलकांवर लाठीचार्ज, १० जखमी 
                 हिवाळी अधिवेशनाची नागपूरच्या विधानभवनाबाहेर आंदोलन करणाऱ्या ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार करण्यात आला आहे. त्यामुळे विधानभवन परिसरात काही काळ तणावाचं वातावरण होतं. या आंदोलनात 10 आंदोलक जखमी झाले आहे. विधानभवनाजवळ टेकडी रोडवर हा मोर्चा सुरू होता. बाहेरचे बॅरिकेट्स तोडून आंदोलनकर्त्यांनी विधानभवन परिसरात शिरण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलिसांना आक्रमक होत आंदोलकांवर लाठीमार करावा लागला. ग्रामपंचायतीचे संगणक परिचालकांनी काल दुपारपासून मोर्चा काढला होता. आज आंदोलकांनी विधानभवनाजवळ जाण्याचा प्रयत्न सुरु केला. यावेळी पोलिसांना त्यांना अडवण्याचा प्रयत्नही केला. मात्र आंदोलकांचा रेटा पाहता पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला.

१२- चेन्नई पूरग्रस्तांसाठी खिलाडी अक्षयकुमारचा मदतीचा हात 
                  चेन्नईतील पुराची दृश्यं पाहून अक्षयकुमारने पीडितांना मदत करण्याची इच्छा व्यक्त केली. त्याने दिग्दर्शक मित्र प्रियदर्शनला फोन करुन याबाबत विचारणा केली. त्यांनी अक्षयला सुहासिनी मणिरत्नमशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, अशी माहिती आहे. सुहासिनी मणिरत्नम यांनी सुचवल्याप्रमाणे अक्षयकुमारने 1 कोटी रुपये भूमिका ट्रस्टला दान केले. संबंधित ट्रस्टतर्फे चेन्नईतील पूरग्रस्तांसाठी जेवणाची व्यवस्था केली जाते. ट्रस्टचे प्रमुख, निर्माते जयेंद्र यांच्याकडे अक्षयने मदतीचा चेक सुपूर्द केला.

१३- कानशीलात लगावल्याने चित्रकार हेमा उपाध्याय यांची हत्या 
                      चित्रकार हेमा उपाध्याय यांच्या हत्या प्रकरणाला नवनवीन वळणं मिळत आहेत. हेमा यांनी चपराक लगावल्यामुळेच त्यांची हत्या केल्याची कबुली मुख्य आरोपी विद्याधरने शेजाऱ्याला फोनवर दिल्याची माहिती आहे. वादावादीनंतर हेमा यांनी विद्याधरला कानशीलात लगावली होती, त्यानंतर रागाच्या भरात त्याने हेमा आणि त्यांचे वकील हरिश यांची हत्या केल्याचं वृत्त आहे. विद्याधर राजभरला त्याच्या शेजाऱ्याने उधारीवर 30 हजार रुपये दिले होते. ते परत मागण्यासाठी त्याने विद्याधरला 13 डिसेंबरला फोन केला. त्यावेळी, हेमा यांच्यासोबत झालेल्या भांडणानंतर त्यांनी आपल्यावर हात उचलला, याच्या रागातून त्यांचा काटा केल्याची कबुली विद्याधरने दिली. भांडणात मध्यस्थी करणाऱ्या हरिश यांचाही जीव घेतल्याचं आरोपीने म्हटलं.

~~~~~~~~~~~~~~~
[प्रादेशिक]
१४- नागपूर; हिवाळी अधिवेशनावर संगणक परीचालाकांचा भव्य मोर्चा 


१५- लातूर; नीलगा तालूक्याती वाडीशिलोड येथील राशन दुकानाचे भाव नियमित करणेबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन 

१६- मनमाड: शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पाडले, निर्यातमूल्य कमी होऊनही कांद्याचे दर पडल्यानं संताप 

१७- शिर्डी पदयात्रींना भरधाव कारनं उडवलं; एकाचा मृत्यू, 4 जखमी 
                            मुंबईतील मालाड येथील कुरार भागातून ओम साई ग्रुप पालखी पदयात्री सेवा संघाचे 100 साईभक्त शिर्डीसाठी 100 पदयात्रेला निघाले होते. त्याचवेळी नाशिक महामार्गावरून शिर्डीकडे जात असताना भिवंडी तालुक्यातील पडघा पोलीस स्टेशन क्षेत्रातील  कुकसे भोईर पाडा या गावांच्या हद्दीतून हे साई भक्त पायी चालले असताना हा अपघात झाला. अपघातात सुधीर कलप या २३ वर्षीय युवकाचा मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर इतर चार जण जखमी असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याने त्यास भिवंडी येथील खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे.

१८- गडचिरोलीत सातवीतील विद्यार्थिनीवर शाळा चपराश्यांकडून बलात्कार 
                    गडचिरोली : जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात एका जिल्हा परिषद शाळेत सातवीतल्या विद्यार्थिनीवर शाळेतल्याच दोन चपराश्यांनी बलात्कार केल्याचं उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलेय. ही विद्यार्थिनी गेले काही दिवस आजारी होती. तिला तिच्या घरी सोडण्याची जबाबदारी या दोघांवर टाकण्यात आली होती. मात्र त्या नराधमांनी वाटेत दुब्बागुडमच्या जंगलात मुलीवर बलात्कार केला. त्यानंतर तिला तिच्या घरीही सोडले.

१९- पनवेलमध्ये स्कूलबसमध्ये चिमुरडीची छेडछाड 
                      पनवेल : येथील खांदा कॉलनी सेक्टर १३ मधल्या न्यू होरायझन स्कूलमधल्या एका साडेतीन वर्षांच्या चिमुरडीची बसमध्ये छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी स्कूल बसच्या क्लिनरला अटक करण्यात आली आहे. या प्रकारामुळे पुन्हा एकदा लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय. तसंच पालक वर्गात घबराट निर्माण झालीय. क्लीनर दोषी आढळल्यास कारवाई करणार असल्याचे शाळा प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

२०- घाटकोपर मेट्रो स्थानकात तरुणीची आत्महत्या, स्वच्छतागृहात विषप्राशन 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२१- इस्त्रो पीएसएलव्ही प्रक्षेपकातून सिंगापूरच्या सहा उपग्रहांचे आज संध्याकाळी ६ वाजता श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण करणार
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड]
२२- मुखेड, लोह्यात तहसीलदारांना घेराव, राशनकार्डधारकांचा मुखेडकाढे तर मग्रारोहयो मजुरांचा लोह्यात घेराव
२३- जुन्या नांदेडमधील पळवून नेलेल्या दोन मुलींची राजस्थान मधून सुटका; दोन्ही आरोपी नांदेडचेच; आरोपीला पाच दिवसाची पोलीस कोठडी
२४- उच्च न्यायालयाची मनापा प्रशासनाला चपराक; लीडिंग फायरमन दासरे यांना सेवेत घेण्याचे आदेश
२५- नायगाव नगरपंचायत निवडणुकीची धुमश्चक्री; सर्वच पक्षात बद्खोरीची शक्यता
२६- येत्या मार्च अखेरपर्यंत गरातमुक्त, डासमुक्त, हागणदारीमुक्त होणाऱ्या गावांना प्राधान्य - अभिमन्यू काळे
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
२७- माळेगाव ग्रामपंचायतचे अधिकार पुर्वी सारखेच ठेवा, स्थानिकांची मागणी
http://goo.gl/C4s3wd
~~~~~~~~~~~~~~~
२८- माळेगाव यात्रेच्या नितोजनासाठी जिल्हा परिषद नांदेड येथे बैढक संपन्न
http://goo.gl/tY7MDS
~~~~~~~~~~~~~~~
[वाढदिवस]
हेमंत पाटील, महेश बोंबले, राज तिडके, कैलाश बिच्चेवार, संदीप सिंगारे, ज्ञानेश्वर भोसले, संतोष साबळे, संतोष मालीवाल, सुनील कुमार, आशु शेख, विक्रम व्यास, वासिम शेख, नितीन काकडे
~~~~~~~~~~~~~~~
[सुविचार]
वादळ येतात तितक्याच वेगात निघून जातात, वादळे ही तितकी महत्वाची नसतात, आपण त्यांच्याशी झुंज कशी दिली हे महत्वाचे
[महेश भोयर, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हवर नोंदवा आपले मत, खालील लिंकला क्लिक करून--
सध्याच्या घडामोडी पाहता पाकिस्तान दाउदला भारताच्या ताब्यात देईल का?
http://goo.gl/wMLuSZ
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस.
स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  * *  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता-> ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
http://goo.gl/d9htfL
~~~~~~~~~~~~~~~
ढिंच्याक चॉकलेट
*  *  *  *  *
वाढदिवसाचे चॉकलेट, 'आय.लव्ह.यु.' चॉकलेट, 'Thanks' चॉकलेट, 'Congratulation' चॉकलेट, 'Lips' Shapeचॉकलेट, 'Hurt' Shapeचॉकलेट.
खाण्यासाठीचे पोटलीचे चॉकलेट, गिफ्टसाठी पॅकिंगचे चॉकलेट...
ढिंचाक चॉकलेट होममेड असून शुद्ध शाकाहारी आहेत.
फक्त पाच मिनिटात प्रत्येकाच्या नावाचे चॉकलेट लगेच तयार करून मिळेल....
....संपूर्ण भारतात होम डिलिव्हरी.....
संपर्क- 9423785456, 7350625656
http://goo.gl/5rLfsP
*****************
आमच्याकडे आहे १२०० Whats Up ग्रुपची कनेक्टीव्हिटी,
आपली जाहिरात पोहचवा नमस्कार लाईव्हच्यामाध्यमातून, जास्तीत-जास्त लोकांपर्यंत,
एक महिन्यात ६० लाखांपेक्षा जास्त वेळा....
आमचा जाहिरातीसाठीचा संपर्क
बाहेती- 9423785456,
गायकवाड- 8975495656
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN

No comments: