नांदेड-15, कंधार तालुक्यातील पोखर्णी येथे सौरउर्जा दिव्याचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी संजय भोसीकर, अभियंता मयूरी केंद्रे, सरपंच गणेशराव शंखपाळे, उपसरपंच शिवाजी केंद्रे, अंकुश कल्याणकर, हनमंत पेटकर यांची उपस्थिती होती.
सौरउर्जेचा उपयोग शेती उपक्रमातही वापरता येतो. जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या निधी अंतर्गत तीन सौरउर्जा खांब पोखर्णी येथे बसविण्यात आले आहेत. यासाठी 1 लाख 25 हजार रुपयांचा सौरउर्जा दिव्यासाठी खर्च करण्यात आला आहे. गावस्तरावर लोडशेडींग लक्षात घेता सौरउर्जेच्या दिव्याचा उपयोग आवश्यक आहे. पुढील काळात अपारंपारीक उर्जास्त्रोत निर्मितीसाठी ग्रामस्थांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत जिल्हा परिषद सदस्या वर्षाताई भोसीकर यांनी व्यक्त केले.

No comments:
Post a Comment