Friday, 11 December 2015

नमस्कार लाईव्ह ११-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

नमस्कार लाईव्ह ११-१२-२०१५ सकाळचे बातमीपत्र

सविस्तर बातमीपत्र वाचण्यासाठी लिंक क्लिक करा
~~~~~~~~~~~~~~~
 [आंतरराष्ट्रीय]
१- इसिस या दहशतवादी संघटनेसाठी काम करणारा मोहम्मद सिराजुद्दीन याची इंडियन ऑइल कंपनीतून हकालपट्टी 

२- बांगलादेशमधील दिनाजपूरच्या इस्कॉन मंदिरात झाला गोळीबार, दोन भक्त ठार 

३- लढाऊ विमानांच्या हल्ल्यात इसिस या दहशतवादी संघटनेच्या वित्तप्रमुखाचा झाला मृत्यू 
~~~~~~~~~~~~~~~
 [राष्ट्रीय]
४- अरविंद केजरीवाल मुख्यमंत्रीपद सोडणार 
                  दिल्लीच्या राजकारणात नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. कारण अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या तयारीत आहेत. पंजाब निवडणुकीत विजय मिळावा यासाठी रणनीती आखण्यासाठी या हालचाली सुरु आहेत. केजरीवालांचा उत्तराधिकारी म्हणून मनिष सिसोदिया मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात. या आश्चर्यकारक हालचालींमुळे दिल्लीपासून – पंजाबपर्यंतच्या राजकारणात वादळ उठण्याची शक्यता आहे.

५- विदेशी जन्माचा मुद्दा सोनियांनीच उपस्थित केला: पवार 
                विदेशी जन्मचा मुद्दा आम्ही नाही तर सोनिया गांधी यांनीच उपस्थित केला होता, असा दावा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाच्या संपादकीय मुलाखतीत पवारांनी या गोष्टीचा खुलासा केला.  सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यांवरुन शरद पवार, तारिख अन्वर आणि पी संगमा काँग्रेसमधून बाहेर पडले आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली होती. पवार म्हणाले की, मे, 1999 मध्ये काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत सोनियांनी अचानक एक कागद काढला आणि तो वाचायला सुरुवात केली. ‘माझा जन्म परदेशातला असून, निवडणूक प्रचाराचा हा मुद्दा झाल्यास त्याचा पक्षाच्या कामगिरीवर काय परिणाम होईल याचा विचार करायला हवा. भाजपने विदेशी जन्माचा विषय निवडणूक प्रचाराचा मुद्दा बनवलेला दिसत आहे. यावर प्रत्येकाने आपलं मत मांडावं, असं सोनिया म्हणाल्या होत्या. त्यावर सोनियांच्या अत्यंत विश्वासातले नेते पीए संगमा म्हणाले की, ‘सोनिया गांधी परकीय आहेत, हा आरोप शंभर टक्के होईल. जन्माने भारतीय असणाऱ्या अनेक व्यक्ती पक्षात असताना आपण त्यांचा विचार न करता एका विदेशी व्यक्तीचा विचार करतो याचा अजिबातच परिणाम होणार नाही असं मानणं भाबडेपणाचं ठरेल. पण आपण या टीकेला कसं उत्तर देण्यासाठी तयार असायला हवं. मी देखील पीए संगामा यांच्या मताशी सहमत असल्याचं सांगितलं.

६- मॅगी पुन्हा अडचणीत? अन्न आणि औषध प्रशासनाने मॅगीविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल केली याचिका, कोर्टाची नेस्लेसह महाराष्ट्र सरकारला नोटीस 

७- दुष्काळामुळे कर्नाटकच्या हुबळीमधील लाल मिरच्यांच्या पिकाच्या उत्पादनावर झाला परिणाम, भााव वाढण्याची शक्यता 

८- शीतपेयांवर ४० टक्के कर लावण्याचा केंद्र सरकारचा विचार 

९- चेन्नईतील पूराच्या पार्श्वभूमीवर चर्च ऑफ साऊथ इंडिया या ख्रिस्ती संघटनेने ख्रिसमसचा सण साजरा न करण्याचा निर्णय 
~~~~~~~~~~~~~~~
 [राज्य] 
१०- श्रीहरी आणे यांना बडतर्फ करण्याची शिवसेनेची मागणी, विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन 
                  महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भाबाबात केलेल्या वक्तव्याविरोधात शिवसेना हक्कभंग आणणार आहे. श्रीहरी अणेंच्या वक्तव्याविरोधात शिवसेनेमध्ये मोठी नाराजी आहे. शिवसेनेच्या आमदारांनी आज विधानसभेच्या बाहेर आंदोलन करत अणेंना बडतर्फ करण्याची मागणी केली. शिवसेनेने नेहमीच अखंड महाराष्ट्राचा पुरस्कार केला आहे. त्यामुळेच अणे यांनी वेगळ्या विदर्भाबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना चांगलीच आक्रमक झाली. महाराष्ट्र तोडण्याची भाषा करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहीजे असं शिवसेना आमदारांचं म्हणणं आहे.

११- मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एफडीच्या ठेवीत गैरव्यवहार, सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांची कबुली 

१२- मुंबई- पुणे महामार्गावर एस टीला टोलमाफी नाहीच, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांचं विधानसभेत लेखी उत्तर 

१३- विधानसभा आणि विधानपरिषदेत विरोधकांचा गदारोळ, शेतकरी कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक 

१४- चंबळ खोऱ्यातील लुटारूंपेक्षा RTO भयंकर : गडकरी 
                   केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ‘आरटीओ’मधील भ्रष्टाचारावरून हल्लाबोल केला आहे. चंबळच्या खोऱ्यातील लुटारुंपेक्षा जास्त लूट ‘आरटीओ’मध्ये होत असल्याचा घणाघात गडकरींनी केला. देशातील सर्वाधिक भ्रष्ट खातं म्हणून आरटीओ ओळखलं जात असल्याचंही गडकरी म्हणाले. नवा मोटार कायदा लागू करण्यास होणाऱ्या विलंबावर त्यांनी चिंता व्यक्त केली. मात्र त्याचवेळी गडकरींनी ‘रस्ते वाहतूक आणि सुरक्षितता विधेयक’ लागू झाल्यानंतर आरटीओमध्ये बदल होईल, असा विश्वासही व्यक्त केला. पण आरटीओतील पारदर्शी आणि संगणकीकरणाला होत असलेल्या विरोधावर गडकरींनी नाराजी वर्तवली. स्वत: आरटीओतील अधिकाऱ्यांनीच काही मंत्र्यांना, खासदारांना याला विरोध करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोपही गडकरींनी केला.

१५- राज्यात 1 ते 20 विद्यार्थी असलेल्या तब्बल 12 हजार शाळा करणर बंद 
                   राज्यात पटसंख्या केवळ 1 ते 20 इतकीच असलेल्या तब्बल 12 हजार शाळा असल्याची माहिती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानसभेत दिली. त्यामुळे अशा शाळा बंद करुन त्या शिक्षकांना इतरत्र स्थलातंरीत करणार असल्याचं तावडेंनी सांगितलं.  “पटसंख्या कमीही असली तरी सरकारला त्या १२ हजार शाळांमधल्या शिक्षकांचा पगार द्यावाच लागतो. त्यामुळे एकीकडे हजारो शाळा अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत आणि दुसरीकडे हजारो अनुदानित शाळांमध्ये विद्यार्थीच नाहीत. अशी परिस्थिती आहे” असं तावडे म्हणाले. मात्र, दुर्गम भागात असलेल्या शाळांना वगळून इतर शाळा बंद केल्या जातील. असंही तावडेंनी आवर्जून सांगितलं.

~~~~~~~~~~~~~~~
 [प्रादेशिक]
१६- अॅम्ब्युलन्समध्ये ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, बाळाचा मृत्यू 
                    ठाण्यात एका अॅम्ब्युलन्समधल्या ऑक्सिजनच्या सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे एका दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडलीये. तर डॉक्टर आणि नर्स किरकोळ जखमी झाले आहे. या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांची तावदानंसुद्धा फुटली. तसंच दुसर्‍या अॅम्ब्युलन्सही पेट घेतला. भिवंडीमधल्या काल्हेरमध्ये राहणार्‍या मनीष जैन यांचं एका दिवसाचं बाळ आजारी होतं. त्याला श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे ठाण्यातल्या वर्तकनगर परिसरात असणार्‍या वेदांत हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले होतं. त्यानंतर त्याला मुंबईच्या सूर्या नर्सिंग होममध्ये नेण्यात येणार होतं. पण, अॅम्ब्युलन्समधल्या ऑक्सिजन सिलेंडरनं पेट घेतला. डॉक्टर भवनदीप गर्ग आणि परिचारिका लीला चाको हे किरकोळ जखमी झाले या घटनेनंतर या दोघांनी गाडीतून पळ काढला. त्यामुळे त्यांचा जीव वाचला त्यांच्यावर ठाण्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर एक दिवसाच्या बाळाची आई कीर्ती जैन हिच्यावर भिवंडी येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत

१७- प्रवाशाचा एक ट्विट, चिमुकल्याला धावत्या रेल्वेत दुधाची व्यवस्था 
                    10 डिसेंबरला माण्डुवाडीह-नवी दिल्ली सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून सत्येंद्र यादव आपल्या कुटुंबासोबत प्रवास करत होते. अनेक ठिकाणी ट्रेन क्रॉसिंग आणि सिग्नलला थांबत होती. त्यामुळे ट्रेन प्रचंड उशिरा होती आणि नेमकी याचवेळी सत्येंद्र यादव यांच्या दीड वर्षाच्या मुलाने दूध पिण्यासाठी रडायला सुरुवात केली. मुलाचं रडणं सुरु झाल्यानं सत्येंद्र यांच्या पत्नीने त्यांना दूध आणण्यास सांगितलं. मात्र, ट्रेन ज्या स्थानकांवर थांबत होती, तिथे दूध मिळत नव्हतं. सत्येंद्र यादव यांना काहीच सूचत नव्हतं. मग त्यांनी त्यांच्या मोबाईलवरुन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना मेन्शन करुन एक ट्वीट केला. ट्वीटमध्ये म्हटलं, “’ट्रेन खूप लेट आहे. माझ्या दीड वर्षाच्या मुलाला दूध हवं आहे. इथे कुठेच दूध उपलब्ध नाही.” ट्वीट मिळताच सुरेश प्रभू यांनी सत्येंद्र यांना रिप्लाय दिला आणि संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर मागितला. त्यानंतर सत्येंद्र यांनी त्यांच्या भावाचा मोबाईल नंबर दिला. सुरेश प्रभू यांनी चिमुरड्यासाठी दूध मिळवून देण्याचं आश्वासन दिलं. सुरेश प्रभू यांनी गाडी कुठल्या स्थानकांनजीक आहे, याची माहिती घेऊन संबंधित प्रशासनाला कळवलं आणि दीड वर्षाच्या चिमुरड्यासाठी अवघ्या 10 मिनिटांच्या आत दुधाची व्यवस्था करुन दिली.

१८- औरंगाबाद: 'त्या' मुलीच्या मावशीने आणखी पाच मुलींना विकलं होतं 
                      औरंगाबादमध्ये एका ऊस कामगाराच्या मुलीची अवघ्या 1 लाख 20 हजारांना विक्री केल्याची धक्कादायक घटना ताजी असताना, आता आणखी पाच मुलींची विक्री केल्याची कबुली या आरोपींनी दिली आहे. यापैकी तीन मुलींना गुजरातमध्ये विकलं तर दोन मुली महाराष्ट्रात विकल्या आहेत. औरंगाबादमध्ये सारिका अग्रवाल या विवाहितेच्या छळाचं प्रकरण समोर आल्यानंतर आता याला वेगळं वळण मिळालं आहे. सारिकाच्या मानलेल्या मावशीने सारिकाची विक्री 1 लाख 20 हजार रुपयांना केली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी सुवर्णा वंजारे, विठ्ठल पवार, धुराजी सूर्यनारायण, सुरेखा बावणेला 12 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

१९- कांदिवलीतील दामूनगर झोपडपट्टीतील आग प्रकरण: एसएआरए योजनेअंतर्गत नागरिकांना त्याच ठिकाणी घरं देण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 

२०- विशाखापट्टणम येथील गन्नेला गावात पोलिस व नक्षलवाद्यांदरम्यान चकमक, २ नक्षलवादी ठार 
२१- जम्मू-श्रीनगर महामार्गावर कोसळली दरड, वाहतूक ठप्प 

२२- नवी दिल्ली: एम्सच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वाराजवळच्या रस्त्यावर मोठी क्रेन कोसळल्याने झाली वाहतूक कोंडी 

२३- नॉएडा येथील सेक्टर १०० येथील एका इमारतीच्या ८ व्या मजल्यावरून पडल्याने एका मुलीचा मृत्यू 
२४- काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी २ दिवसांच्या आसाम दौऱ्यावर 

२५- बंगऴुरु : कोडीगेहल्ली येेथे अल्पवयीन मुलीवर शेजा-याकडून बलात्कार केल्याची धक्कादायक घटना 
~~~~~~~~~~~~~~~
[इतर]
२६- दुबई विश्व सुपर सीरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सायना नेहवालने विश्वविजेती कॅरोलिन मारिनचा केला पराभव 
२७- कोलकाता पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणाचा निकाला आज होणार जाहीर 
२८- सेक्स व्हिडीओ ब्लॅकमेल प्रकरणी फुटबॉलपटू करीम बेनझेमा याला फ्रान्सने राष्ट्रीय फुटबॉल संघातून निलंबित 
~~~~~~~~~~~~~~~
[नांदेड] 
२९- भोकर तालुक्यात शौचालयासाठी दोन कोटी पंचवीस लाख रुपयाचा निधी 
30- वाळूची तस्करी रोकण्यासाठी महासुलचे पथक तैनात 
३१- पाण्याची नासाडी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करा - विरोधी पक्षनेता बालाजी कल्याणकर 
३२- आसना बंधाऱ्याचे तीन दरवाजे फुटले, हजारो लिटर पाण्याचा अपव्यय 
३३- भोकर तालुक्यात बंधाऱ्यातील गळ काढण्याची मोहीम जोमात 
३४- महिला बचत गटांना पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन 
३५- शिक्षकांच्या नियुक्त्यांसाठी एस.एफ.आय.चे  जिल्हा परिषदेवर आंदोलन 
३६- जिल्ह्यात ६१ जणांना डेंग्यूची लागण, निष्क्रिय हिवताप अधिकाऱ्यांना सीइओनी झापले 
३७- भोकरमध्ये दोन गटात मारहाण, ३४ जणांविरुद्ध गुन्हे दाखल 
३८- आज नांदेड येथून सकाळी ०९.३० वाजता सुटणारी नांदेड - अमृतसर सचखंड एक्स्प्रेस   15:00 वाजता सुटेल. 
~~~~~~~~~~~~~~~
[सविस्तर]
३९- मुखेड येथे काळ्याबाजारात विकणारा राँकेलचा अवैध साठा जप्त, राँकेलमाफियाला सोडुन अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_27.html
~~~~~~~~~~~~~~~
४०- मुखेड - शरद पवार यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांतून साजरा करणार
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_88.html
~~~~~~~~~~~~~~~
४१- महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्या लढ्याला यश, शिक्षक एकीचा विजय
http://namaskarlivenanded.blogspot.in/2015/12/blog-post_83.html
~~~~~~~~~~~~~~~
 [वाढदिवस]
कांता चंदक, मिलिंद पवार, सौरभ पाटील, चंद्रकांत क्षीरसागर, चेतन भुतडा, चंदर अरोरा, चंद्रकांत लेडांगे, सोमनाथ मुंदडा, किशन फेताळे, मोईज खान, भवानीसिंग गहीलोत, काशिनाथ तिडके, रुपेश व्यास, संदीप बीरकलवार, जगदीश चंद्र, सागर चौधरी, सुभाष देशमुख, योगेश कोकुलवार,

महादेव मोरे
~~~~~~~~~~~~~~~
 [सुविचार]
माझं म्हणून नाही आपलं न्हाणून जगता आलं पाहिजे, जग खूप चांगलं आहे, फक्त चांगलं वागता आलं पाहिजे
[संदीप इंगळे, नमस्कार लाईव्ह वाचक]
~~~~~~~~~~~~~~~
एस.एस.एस. स्पोर्ट्स, न्युट्रीशएन, & फूड साप्लीमेंट्स
*  *  *  *  *  *  *
नामांकित कंपन्याचे  प्रोटीन, वेटगेनर, मासगेनर, स्पोर्ट्स एनर्जीडिंक्स
होमजिम, ट्रेडमिल, सायकल, इलेप्टीकल, बॉडी मसाजर, स्टीमबाथ, संपूर्ण साहित्य मिळेल.
सर्व वयोगटातील पुरुष-महिला व मुले-मुलींसाठी
आहारविषयक परिपूर्ण माहिती, जिमसेटप, इंटरीअर, कोचिंग, बॉडी बिल्डींग इत्यादी विषयी मोफत मार्गदर्शन व सल्ला
पत्ता- ८५, अशोक नगर, भाग्यनगर, अभ्युदयबँकेच्या पाठीमागे, नांदेड.
मो. - 7768824322, 8483899333
<संपूर्ण महाराष्ट्रात होम डिलिव्हरी उपलब्ध >
~~~~~~~~~~~~~~~
जाहिरात]
शुभेच्छा पाठवा, जगभरात कुठेही
फ्लॉवर एन फ्लॉवर्सच्या माध्यमातून
....संपूर्ण भारतात व जगभरात.....
संपर्क- 9423785456, 7350625656
~~~~~~~~~~~~~~~
नमस्कार लाईव्हचे १२०० ग्रुप पाहण्यासाठी लिंक क्लिक करा
http://goo.gl/3kzoqN
नमस्कार लाईव्हवर जाहिरात देण्यासाठी संपर्क करा
9423785456
8975495656

No comments: