नांदेड ( सय्यद रियाज )
बिलोली तालुक्यातील सगरोळी येथील सेवा सहकारी सोसायटीची (5 एकर 8 आर) जमिनीची परस्पर विक्री करून आपलाच ताबा मिळविणा-यावर कार्यवाही करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहेसविस्तर वृत्त मौ. सगरोळी येथील सेवा सहकारी सोसायटी यांनी 14/ 03/1966 रोजी गट क्रमांक 535 मधील ( 5 एकर 15 आर लागवडी योग्य जमीन रजिस्टर नंबर 1016 ईश्वरबाई ग्यानोबायांच्याकडून खरेदी करण्यात आली या जमिनीवर दोन गोदामचे बांधकाम करण्यात आले .आजता ह्या जमिनी सह गोदामची किंमत कोट्यावधी रुपये ची असल्याने एका नामांकित व्यक्ति ( तथा) सोसायटीची चेअरमन या पदाचा फायदा घेत या जमीनीवर डोळा ठेवून आपल्या धाकाने आपल्याच नातलगाच्या एका अभिनव गृहनिर्माण बोगस संस्थेच्या नावाने कोणत्याही विभागाची परवानगी न घेता परस्पर रजिस्ट्री करून विक्री करण्यात आली याची विचारपूस करणा-यास ही जमीन व दोन गोदाम 99 वर्षासाठी करारावर देण्यात आली असे बोलून उडवाउडवी केली जाते पण वास्तविक पाहता या जमीन व गोदाम सेवा सहकारी सोसायटीचीच असून अभिनव गृहनिर्माण या संस्थेकडे 99 वर्षाच्या करारावर देण्यात आल्याचा कोणताही पुरावा गेली 6 महिन्यापासून उपलब्ध होत नसल्याने या जमीनीची परस्पर विक्री केल्याची असे निवेदनात उल्लेख केला आहे या वविषयीची31/8/2015 पासून संबंधित सहायक निबंधक कार्यालयास वेळोवेळी निवेदन पाठपुरावा करून सुद्धा कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही या अनुषंगाने संबंधित विक्री व खरेदी दारावर कार्यवाही करून सर्वी जमीन व गोदाम सेवा सहकारी सोसायटीच्या ताब्यात द्यावे अशी मागणी केली आहे अन्यथा 21 डिसेंबर 2015 पासून आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष शंकर गंगाधर महाजन यांनी एका निवेदना द्वारे दिला आहे .
No comments:
Post a Comment