Friday, 11 December 2015

महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्या लढ्याला यश, शिक्षक एकीचा विजय



महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीच्या
ऐतिहासिक लढ्याला यश
शिक्षक एकीचा विजय
शिक्षणमंत्री नामदार विनोद तावडे यांनी विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यात येणार असल्याची केली सभागृहात अधिकृत घोषणा .
महाराष्ट्र  राज्यातील विना अनुदानित शाळांच्या विविध प्रश्नांवर समितीने विविध प्रकारची 124 आंदोलने केली.
दिनांक 5 डिसेंबर पासुन सेवाग्राम ते नागपूर पायी दिंडी काढण्यात आलेली दिंडी 8 डिसेंबर रोजी नागपुरात विधानभवनावर महामोर्चाच्या रूपात येऊन धडकली . आंदोलनात सहभागी पदाधिकारी आणि शिक्षक / शिक्षिकांनी सलग दोन रात्री रस्त्यावर थंडीत कुडकुडत काढल्यानंतर आज दिनांक 10 डिसेंबर 2015 रोजी दिवसभरात  चाललेल्या खलबतामधुन शेवटी शिक्षक आमदार ना. गो . गाणार यांनी राजीनामा अस्र उगारले .
नंतर शिक्षणमंत्री मा. नामदार विनोद तावडे यांनी महाराष्ट्र राज्य ( कायम ) विना अनुदानित शाळा कृती समितीच्या मागण्या मान्य केल्या .
त्यामुळे
1) सर्व अनुदानपात्र घोषित विना अनुदानित शाळांना प्रचलीत नियमानुसार येत्या अर्थसंकल्पीय वर्षापासून अनुदान देण्यात येणार .
2) अघोषित शाळांच्या याद्या एका महिन्याच्या आत घोषित  करून त्यांनाही या सोबतच अनुदान सुरू करण्यात येणार .
3) मुल्यांकन बाकी राहिलेल्या शाळांना लवकरात लवकर संधी देण्यात येईल.
4) अघोषित उच्च माध्यमिक शाळांच्या याद्या घोषित करून अनुदान या सोबतच देण्यात येईल.
या मागण्या मान्य झाल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समितीचे उपाध्यक्ष मा . खंडेराव जगदाळे  यांनी मा आमदार रामनाथ मोते , आमदार ना. गो गाणार, आमदार कपिल पाटील, आमदार निलेश राणे,  माजी आमदार भगवान आप्पा साळुंखे, समितीचे अध्यक्ष तात्यासाहेब म्हसकर , शेखर भोयर , अजय भोयर,    कार्यवाह अरूण मराठे, सचिव पुंडलिक रहाटे , मुंबई विभागीय अध्यक्ष प्रशांत रेडिज , औरंगाबाद विभागीय अध्यक्ष प्रदीप सावंत , सचिव विलास चांदणे, अमरावती विभागीय अध्यक्ष सुधाकर वाहुरवाघ , नंदकिशोर धानोरकर, अमितभाई प्रसाद,  सुरेश सिरसाट,  विनोद केणेकर ,  यांच्यासह सर्व जिल्हा अध्यक्ष , पदाधिकारी व हजारो शिक्षकांच्या  उपस्थितीत जाहीर केले.
महाराष्ट्र राज्य (कायम) विना अनुदानित शाळा कृती समिती

No comments: