Monday, 7 December 2015

मुखेड - शिधापत्रिका धारकांनी आधार नोंदणी करावी - संतोष वेणीकर जिल्हा पुरवठा अधिकारी




मुखेड :- रियाज शेख
        सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या संगणकीकरणाच्या कार्यक्रमांतर्गत डाटा डिजीटायजेशनचे काम पुर्ण करण्यात आले आहे. या सार्वजनिक व्यवस्थेमध्ये आधार क्रमांकाचा वापर करणे आवश्यक असल्याने मुखेड तालुक्यातील शिधापत्रीकाधारकांनी आधार नोंदणी करावी असे आवाहण जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी दिली. 
     मुखेड तहसील कार्यालयच्या वतीने पुरवठा विषयक आढावा बैठकीचे आयोजन चौधरी फँक्शन हाँल येथे करण्यात आले होते. मंचावर जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर, तहसीलदार सुरेश घोळवे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी मांडवगडे, जिल्हा तपासणी अधिकारी काकडे, नायब तहसीलदार व्हि. टी. गोविंदवार उपस्थित होते.
     तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक यांना जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष वेणीकर यांनी सांगीतले की, सर्व स्वस्त धान्य दुकानदारांनी आपल्या दुकानाशी संलग्न सर्व शिधापत्रीका धारकांचे आधारक्रंमाक, बँक खाते, कुटुंबातील जेष्ठ महिलांचे फोटो, शिधापत्रीकाधारकांनी शिधापत्रीकेचे संगणकीकरण करुण घ्यावे व आपल्या शिधापत्रिकेला कुटूंबातील सदस्यांचे आधारकार्ड व बँक खाते जोडावे असे आवाहण केले.
>    सद्या दुष्काळी परस्थिती असुन सर्व स्वस्त धान्य दूकानदारांनी अन्न सुरक्षा यादीतील सर्व लाभार्थ्यांना 100% धान्याचे वाटप करावें कोणताही लाभार्थी वंचित राहू नये. अन्न सुरक्षा योजनेतील लाभार्थींना धान्य मिळाले नसल्याचे निदर्शनास आल्यास कठोर कारवाई करणार असल्याची सुचना दुकानदारांना देण्यात आली. 
> या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधीर रावळकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन पेशकार एस.एस.ढगे यांनी मानले. यावेळी तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार, केरोसिन परवानाधारक, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.

No comments: