Monday, 7 December 2015

बिलोली - त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा


त्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी अन्यथा आत्मदहनाचा इशारा 

* जिल्हाधिका-याच्या आदेशाला केराची टोपली
* उपअभियंत्यावर कार्यवाहीची मागणी
* संदिप कटारे यांचा जिल्हाधिका-यांना आत्मदहनाचा इशारा 

बिलोली  : ( यादव लोकडे  )

येथिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता कार्यालयाने जिल्हाधिका-यांच्या संविधान दिन साजरा करण्याच्या आदेशास केराची टोपली दाखवून सविधानाप्रति अनादर दाखवित संविधान दिनाकडे जाणीवपूर्वक पाठ फिरविल्याने संबंधित कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी अन्यथा अमरण उपोषणास बसणार असल्याचे निवेदन काँग्रेस अल्पसंख्याकचे बिलोली तालुकाध्यक्ष वलिओद्दीन फारूखी यांनी जिल्हाधिका-यांना निवेदनाद्वारे दि 30 नोव्हेंबर रोजी कळविले होते हे वृत्त विविध वृत्तपत्रात प्रकाशित झाले परंतु प्रशासनाने या दोषी अधिकाऱ्यांवर अद्याप ही कार्यवाही न करता सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असाल्याचे निदर्शनास आल्याने मनविसे चे जिल्हा उपाध्यक्ष संदिप कटारे यांनी त्या दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि 18 डिसेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दि 4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविले आहे.

बिलोली येथिल सार्वजनिक बांधकाम विभाग हे नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असते येथिल कार्यालयात गेल्या काही महिण्यांपासून माहिती विचारण्यासाठी गेलेल्या स्थानिक कार्यकर्त्यांना या कार्यालयात येथिल उपअभियंता व्हि व्हि शिंगनवाड , अभियंता शेंबाळे व नरवाडे हे नेहमीच कार्यालयात गैरहजर असतात याविषयी येथे उपस्थित अनुरेखक पि.एस.हिपरमोडे यांना याविषयी विचारणा केली असता येथिल अधिकारी सतत गैरहजर असल्याचे सांगत याबाबत दुजोरा दिला. महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने  सन 2008 साली संविधानाबद्दल जनजागृती व्हावी व संविधानाची शासकिय , निमशासकिय कार्यालयांना ओळख व्हावी या उद्देशाने संविधान दिन प्रत्येक कार्यालयात साजरी करण्याचे पत्रक काढले होते . याचउद्देशाने नांदेडचे जिल्हाधिकारी सुरेश काकाणी यांनी जिल्ह्यातील सर्वच विभागप्रमुख , शासकिय कार्यालयांना 26 नोव्हेंबर 2015 रोजी संविधान दिन साजरी करण्याचे आदेश देऊन त्यासंबंधीचे पत्रही संबंधित विभागाला पाठविले होते परंतु बिलोली येथिल सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता व्हि व्हि शिंगनवाड यांनी संविधान दिन साजरा करण्याच्या आदेशाला केराची टोपली दाखवून संविधानाप्रती अनादर दाखविले असल्याने त्यांच्यावर कार्यवाही करावी अन्यथा दि 20 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचे बिलोली काँग्रेस अल्पसंख्याकसेलचे तालुकाध्यक्ष वल्लिओद्दीन फारूखी यांनी जिल्हाधिकारी सुरेश काकाणी , चंद्रकांत पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री , सी.ए .थुल साहेब अनु जाती आयोग मुंबई , खासदार अशोकराव चव्हाण , सार्वजनिक बांधकाम कार्यालय नांदेड यांना निवेदनाद्वारे दि 30 नोव्हेंबर रोजी कळविले होते हे वृत्त दि 1 व 2 डिसेंबर रोजी स्थानिक विविध वृत्तपत्राचा वृत्त प्रकाशित झाले परंतु अद्याप ही या अधिकाऱ्यावर कुठलीही कार्यवाही करण्यात आली नाही तर सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात असाल्याचे निदर्शनास आल्याने मनविसे चे जिल्हा उपाध्यक्ष संदिप कटारे यांनी त्या दोषी अधिकाऱ्यावर तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि 18 डिसेंबर रोजी आत्मदहन करणार असल्याचे निवेदन दि 4 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे कळविले आहे. संबंधित अधिकारी कार्यालयात सतत गैरहजर असल्यामुळे या अधिकाऱ्यास शासनाचे परिपत्रक  वाचले असेल का ? वाचले असेल तर संविधान दिन साजरी का करण्यात आले नाही ? आज संविधान दिन आहे , हे  माहित नव्हते का ? स्थानिक लोकप्रतिनिधी अशा अधिकाऱ्यांकडे दुर्लक्ष का करत आहे ? शासन या अधिकाऱ्यावर कोणती कार्यवाही करेल याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

यादव लोकडे 
सगरोळीकर

No comments: